कवितेने मन शांत करावे, धीरच द्यावा!

Submitted by बेफ़िकीर on 7 July, 2020 - 04:37

कवितेने मन शांत करावे, धीरच द्यावा!
=====

कवितेने का चकित करावे शब्दकळेने?
वृत्ताच्या का अचूकतेचे अजीर्ण व्हावे ?
का कवितेने धुमसत ठेवावे हृदयांना?
नुसते वर्णन रम्य निसर्गाचे का व्हावे?

कविता खिशात हात घातला की लाभावी
ऐन प्रसंगी हृदय रेलता यावे तिजवर
मनातल्या तान्हुल्यास पाजावे कवितेने
तहान लागावी कविता रचण्या, म्हणण्याची

कवितेच्या लोण्यावर आत्मा घसरत जावा
अंमल दैनंदिनीवरी हा पसरत जावा
एक श्वास आणावा कवितेने असला जो
देहातुन निघताना करीत कसरत जावा

कवितेने मन शांत करावे, धीरच द्यावा
=====

-'बेफिकीर'!
(१३.५३ - ७ जुलै २०२०)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेच्या लोण्यावर आत्मा घसरत जावा
अंमल दैनंदिनीवरी हा पसरत जावा
एक श्वास आणावा कवितेने असला जो
देहातुन निघताना करीत कसरत जावा>>>>वाह..

>>कविता खिशात हात घातला की लाभावी
ऐन प्रसंगी हृदय रेलता यावे तिजवर<<
क्या बात है! बहोत खुब!! बढिया!!!