कविता - गुरू!

Submitted by मधुमंजिरी on 6 July, 2020 - 06:12

गुरू मुखे म्हणा!!

मार्गदर्शन करणारे
सहज सापडतात आजूबाजूला
अगदी न शोधता देखील-
सल्ला देतात सहजपणे,
चुका तर दाखवतातच
बरोबर काय ते पण सांगतात,
त्यांच्यामते।
पण मग तरीही शोध सुरू राहतो-
*गुरूचा*!
मनावरील मळभ दूर करून
गाभाऱ्यात लख्ख प्रकाश टाकणारा,
स्वार्थाची चढलेली पुटं काढून
निस्वार्थी नजर देणारा,
भौतिकतेच्या मायाजाळातून सुटका
करून अध्यात्मिक मार्ग दाखवणारा,
पारमार्थिक प्रगती साधण्यासाठी
मनाची मशागत करणारा,
आप्त स्वकीय वा परकीय,
प्रत्येकातील उत्तम ते निवडून
वाईटाकडे दुर्लक्ष करायला शिकवणारा।
एखादा वटवृक्ष, कल्पवृक्ष, बोधीवृक्ष
व्रतस्थ !!!

© सौ मंजुषा थावरे (५.७.२०२०)

Group content visibility: 
Use group defaults