विठू माझा

Submitted by Aditiii on 3 July, 2020 - 03:20

सभामांदिरी मज अणीले
ना कोणाला वाटे लाज
दुःख माझे कोणा नकळे
काल असुदे वा आज

सर्वांकडे पाहिले मी
आणि करुणा भाकीली मी
कोणाला न फुटला पाझर
दुःख माझे हेच निरंतर

कोणी मजला त्राता नाही
सागरात मी बुडून जाई
तरी ना थांबे माझा श्वास
कोणावर ठेवू विश्वास

आप पर झाले सर्व समान
कोणी न राखी माझा मान
अपमानाचे तप्त निखारे
पदरी घेता फिरले वासे

तोच एकला आता राहिला
त्यालाच मी पुकारते
भक्ताच्या रक्षणास मी
भगवंताला बोलवते

कोणी न मजला देई थारा
तुच एकला मज आता
हरी माझा विठू माझा
तुच माझा प्राण सखा

जाण व्यथा तूच माझी
तूच आता मला सावरी
दुःख माझे पोटी घेऊनी
पाखर घालावी प्रेमाची!!!

Group content visibility: 
Use group defaults