करूणेचा सागर

Submitted by हर्षद साबळे on 1 July, 2020 - 00:22

जणु भासती हा सह्याद्रीचा कडा,

कर कटेवरी ठेवुनी विठुराया खडा,

लागे भक्तास पंढरीचा लळा,

टाळ मृदुंग हाती घेऊन मस्तकी टिळा ||

दरवळतो चंदनाचा वास बघा कसा,

पंढरीचा राजा विटेवरी उभा,

तूच भासे दाता, तूच मातापिता,

सगळ्या धरतीचा तूच कर्ता करविता.||

यंदा झाले तुझेच दरवाजे बंद,

कसा खेळू मग आषाढीचा रंग?

नाही वारी, नाही सोहळा रिंगणाचा,

तरीही विठुराया, ध्यास फक्त तुझ्याच अंगणाचा.||

हे करुणेच्या सागरा,

मागणे हेचि आता,

पाहू दे पुन्हा एकदा,

तुझ्या भक्तीचा रंग निराळा..||
1221.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users