वारी वियोग
अष्ठगंध भाळीचा आज जाहला उदास
तुळसीच्या माळेचाही हरवला सुवास
अबिराचा टिळा, झाकोळली भाग्यरेख
गळा दाटोनी गा आले,विठू वियोगाचे दु:ख
गातो अभंग संतांचे परी बोल झाले मुके
उमटेना विठू मनी निनादेना टाळ ठेके
आसावलो पंढरीसी जशी माहेराला लेक
कोण भरविल यंदा मज मायेचे भातुके ?
उपवास आषाढीचा निरंकार मी केला
कुठे स्नान चंद्रभागा, संत मेळा कुठे गेला
नाही नामाची पायरी, ओका ओका गोपाळपुरा
काय आगळीक देवा का मुकावे मी माहेरा
वाट पंढरीची कशी पुढे चालणे विसरली
पायधुळ माऊलीची नाही मस्तकी लागली
नाही गजर हरीचा नाही भक्तांचे मळे
नाही रिंगण सुखाचे, वाटेलाही वारीच्या घेरी आली
वाट अजूनही पाहते गाव,दिंडी येण्याची
चुलीला प्रतिक्षा आहे बेसन भाकरीची
राऊळही सुने सुने, नाही भजन कीर्तन
एकची विनंती देवा
कार्तिकीला तरी मज द्यावे आलिंगन, द्यावे आलिंगन
© दत्तात्रय साळुंके
29-6-2020
_/\_
_/\_
अचूक भावना व्यक्त झाल्यात
काय आगळीक देवा का मुकावे मी
काय आगळीक देवा का मुकावे मी माहेरा} अगदी आर्त..
आसा, प्राचीन खूप धन्यवाद...
आसा, प्राचीन
खूप धन्यवाद...
भावपूर्ण... ___/\___
भावपूर्ण...
___/\___
खूप भावपूर्ण __/\__
खूप भावपूर्ण __/\__
भातुके म्हणजे काय?
@ विनिता.झक्कास
@ विनिता.झक्कास
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद...
भातुके म्हणजे घास...
@ शशांक सर खूप धन्यवाद...
@ शशांक सर
खूप धन्यवाद...
खरच खूप भावपूर्ण
खरच खूप भावपूर्ण
__/\__
__/\__
वारी वारी जन्म मरणाते वारी
सुंदर!!
सुंदर!!
द्वैत
द्वैत
अनन्त_यात्री
महाश्वेता
खूप धन्यवाद....