"तुझ्यासाठी"

Submitted by Snehalata on 29 June, 2020 - 03:32

"तुझ्यासाठी"

एक क्षणभंगुर देखावा
कि मनाचा विसावा
हरखून खेळ मांडावा
कोणी लाथाडून जावा

हीच का रीत माझ्याच्यासाठी?
मग का धडपड जगण्यासाठी?
आसवांची उभारी मनासाठी
आशेचा डोलारा किनाऱ्यासाठी

सोनेरी भविष्य अजमावण्यासाठी
काटेरी वाट चालण्यासाठी
फुलांचे देखावे नजरेसाठी
बोचणारे काटे हातासाठी

गोड आठवणी जपण्यासाठी
धगधगते निखारे जळण्यासाठी
तरीही आशा आहे जगण्यासाठी
कारण आयुष्य मी जपलंय
फक्त " तुझ्यासाठी"

स्नेहलता

Group content visibility: 
Use group defaults