बालक-पालकांमध्ये विसंवाद नव्हे तर सुसंवाद हवा!

Submitted by प्रा. राहुल भिम... on 29 June, 2020 - 02:54

मुलाचं जडणघडण उत्तम होण्यासाठी घरात व समाजात सुसंवाद होणे अतिशय गरजेचे असते. मुलांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक व बौद्धिक व्यक्तीमत्वाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी पालक सतत धडपड करून जागरूक असतात. त्यातूनच अनेकदा पाल्यावर कठोर, मारहाण, रागवणे, शिक्षादेणे, किंवा जबरदस्तीही केली जाते. यातूनच आपल्या पाल्याची आवडी-निवडी, इच्छा-आकांशा, योग्य-अयोग्य काय आहे? हे जाणून घेण्याकडे पालकांचं काही अंशी दुर्लक्ष होतं.

पाल्य एकाद्या बाबीत जेव्हा यश मिळवतात तेव्हा पालकांकडून पाल्यावर आणखी यश मिळविण्याचा दबाव टाकला जातो. या सर्व बाबीत पाल्याचं यश पालक विसरून जातात आणि प्रोत्साहन देण्याचं पण विसरून जातात. याचा दुष्परिणाम होऊन बऱ्याचदा बालक तणावग्रस्त, उदास, हतास बनू लागतात. खंरतर आपल्या पाल्याला प्रत्येक गोष्ट व विषय आली पाहिजे, हा पालकांचा अट्टाहास व महत्वकांक्षा असते. नुसतं त्या गोष्टीचं ज्ञान व माहिती आलं पाहिजे नव्हे तर पाल्यांनी त्या गोष्टीमध्ये निष्णात झालं पाहिजे ही पालकांची इच्छा व अट्टहास असते.

मात्र प्रत्यक्ष शिकतांना प्रत्येक गोष्ट व विषय अर्धवट शिकतात. त्यामुळे कोणतीच गोष्ट व विषय पूर्णपणे शिकता येत नाही अशी बालकांची अवस्था होऊन जाते. सध्याच्या धावपळी जगात व स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या पाल्यानं सर्वात पुढे असावं किंवा जावं, अशी इच्छा-आकांशा पालकवर्ग नेहमी बाळगत असतात. पण त्याच्या आवडी-निवडी, इच्छाशक्ती वेगळ्या असू शकतात. ही बाब लक्षात घेतल्यास बालक-पालक यांच्यात विसंवाद नव्हे तर सुसंवाद वाढेल. त्यामुळे योग्य जडणघडण व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळेल.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users