अंत:प्रेरणा

Submitted by _सानिका_ on 28 June, 2020 - 11:44

अस म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे...पण ते अपयश आपल्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आलंय आणि आपण ते किती गांभीर्याने घेतो हे ही तितकंच महत्त्वाचं असत...
लहानपणी आपल्याला एखादी गोष्ट येत नाही.. एखाद गणित सुटत नाही...हे सुध्दा एक प्रकारचं अपयश च नाही का..पण आपण त्याकडे एवढ seriously बघत नाही.. किंवा ते आपण पटकन स्वीकारतो आणि पुढे जातो..लहानपणी जर अपयश आलं तर जास्तीत जास्त गंभीर विचार म्हणजे आपल्याला सगळे चिडवतील हाच असतो..पण जसे आपले विचार प्रगल्भ होतात तसे एखाद अपयश आपल्या जास्त जिव्हारी लागत...
आपल्या करीयर च्या महत्त्वाच्या टप्प्यावर जर अपयश आल तर त्यावर आपण किती गंभीरपणे विचार करू...किंवा या वेळी आपले विचार किती वेगळे असतील...
काहीही झालं तरी या अपयशावर मात करायला च पाहिजे..किंबहूना तुम्ही त्याच विषयावर थांबून चालतच नाही...उलट ही च ती वेळ असते स्वतः ला सिध्द करण्याची..आपली क्षमता ओळखण्याची... जिद्दीने आपल ध्येय साध्य करण्याची...
अपयश स्वीकारणं नक्कीच सोप नसत..पण तरीही ते स्वीकारून पुढे जायला पाहिजे... जर तुम्हाला एकच जोक दहा वेळा सांगितला तर दहाव्या वेळेला नक्कीच तुम्ही हसणार नाही...मग एकाच problem वर दहा वेळा का रडायचं.. आयुष्यात अपयशी वाटायला लागलं की माणसानं फिनिक्स पक्ष्याला स्मरावं...राखेतून ही पुन्हा नवीन जन्म घेतो तो फिनिक्स पक्षी... अस म्हणतात की एखाद्या गोष्टीची तुम्ही दहा हजार तास प्रॅक्टिस केली तर त्यात तुम्ही मास्टर होता...मग थांबायचं कशाला...
पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागा..आपल्या कामावर श्रद्धा ठेवा..देवावर विश्वास ठेवा..ज्या गोष्टी होतात त्या चांगल्या साठीच होतात... Be positive and be inspired...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users