गुगल आणि इंटरनेटच्या जगात जगतांना..

Submitted by प्रा. राहुल भिम... on 28 June, 2020 - 02:41

Prof. Rohidas Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. No. 9503203695

माहितीतंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेटच्या जगात जगतांना व रमताना ई-वर्ल्ड कसं मॅनेज करायचं? हे जाणून घ्यायला हवं. आज संपुर्ण जगच गुगलमय झालं आहे. सगळीकडे इंटरनेट, स्मार्टफोन व संगणकणी शिरकाव केला आहे. आज नवनवीन माहिती घेतली तर बर्‍याच कामांमध्ये सुकरता येईल. इंटरनेट व गुगल वापरतांना जागरूकतेची गरज आहे. तुमच्या स्मार्टफोन, ई-मैल इनबॉक्समध्ये नको असलेल्या एस.एम.एस., मेल्स, नोटीफिकेशन पडलेल्या असतात. जंक, स्पॅममध्येही बरंच काही पडीक असतं. अकाऊंट ओपन करून नको असलेल्या एस.एम.एस, नोटीफिकेशन, मेल्स डिलिट करून टाका. महत्त्वाच्या एस.एम.एस., मेल्स, नोटीफिकेशन एका फोल्डरमध्ये ठेवा. स्पॅम मेल डायव्हर्ट करा.

अनावश्यक नोटीफिकेशन व ईमेल्सना अनसबस्क्राईब किंवा ब्लॉक करा. व्हाट्सअप,फेसबुक, व्ट्टिर, युट्युब, टेलिग्राम, इंस्टाग्रामही मॅनेज करायला शिका. टेलिग्राम व फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर वर्षानुवर्षं आपण त्या व्यक्तीशी बोलतच नाही आणि ओळखत नाही. अशा फ्रेंड्सना अनफ्रेंड करून टाका. नको असलेल्या पोस्ट्स, फोटो, एस.एम.एस., नोटीफिकेशन डिलिट करा. इंस्टाग्राम व ट्विटरवरची फ्रेंडलिस्टही र्मयादित असू द्या. रात्री झोपण्याआधी इंस्टाग्राम व टेलिग्राम तपासा. व्हॉट्सअपवरचे नको असलेले व्हिडिओ, फोटोही, एस.एम.एस., नोटीफिकेशन डिलिट करून टाका किंवा नको असलेले नंबर ब्लॉक करून टाका. पीसी, संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोनवरचे फोटो, व्हिडिओ, चित्रपट किंवा गाणी सेव्ह करण्यासाठी गुगल ड्राईव्ह, आयक्लाऊड, पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, एमएस स्काय ड्राईव्हसारख्या सेवांचा वापर करा. यावर नवा फोटो किंवा गाणं आपोआप सिंक होऊ शकते. गाणी आयपॉडवर टाकता येतील. यामुळे मेमरी जास्त खर्च होणार नाही.

स्मार्टफोनमधील कॅलेंडरसाठी व्हिज्युअल हा ऑप्शन निवडा. इव्हेंट्ससाठी वेगवेगळ्या रंगांची निवड करा. पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल तर वेगळ्या याद्या करा. नवनवीन अप्प्स माहितीप्रमाणे व उपयोगीतेप्रमाणे इंस्टोल करा.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक एक डिटेलमध्ये सांगणार का?
प्रत्येक गोष्टी फायदे/तोटे आहेत. किंवा अडचणीही आहेत।
उदाहरणार्थ गाणी विडिओ ड्राईववर टाकणे. क्लाऊडवर टाकणे. हे डेटाखाऊ काम आइफोनवाल्यांना करावे लागते. मेमरी कार्डच नसते त्यांच्या डिवाइसमध्ये.