इंद्रधनुष्य

Submitted by आर्ट आर्च on 26 June, 2020 - 07:38

हवा कुंद होती,
अन् वारा,
पडला होता सपशेल;
अगदी,
डिपाॅझिट जप्त झालेल्या उमेदवारागत.

विज कडाडली,
तिनं आभाळाकडे पाहिलं;
दाटून आलेले ढग,
रिते होऊ लागले.
त्या धारा, चिंब करून गेल्या.

आणि मग,
पल्याड,
मोकळ्या माळावर
- आभाळाच्या भाळावर,
किरणानी रेखलं,
एक इंद्रधनुष्य
सप्तरंगात ओथंबलेलं
एक इंद्रधनुष्य

Group content visibility: 
Use group defaults