पुस्तकं का वाचावे?

Submitted by प्रा. राहुल भिम... on 26 June, 2020 - 06:29

माणसाच्या मानसशास्त्रातली एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, "आपल्या सानिध्यात असलेल्या पाच व्यक्तीचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव असतो." आई-वडील, समाज, नैसर्गिक, पशु-प्राणी, शिक्षण आणि पुस्तकं वाचन. पुस्तकं म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तींचा आपल्याशी सवांद असतो. संपूर्ण जगात वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञ व लेखक व्यक्ती पासून ते जगात घडलेल्या सामान्य-असामान्य घटना, एखाद्या महान माणसाने लिहिलेले त्याचे विचार व आत्मचरित्र, एकाद्याचं प्रवासवर्णन इत्यादी बरच काही.

आता मला सांगा, जर आपल्याला इतक्या वेगवेगळ्या व्यक्तींचा, घटनांचा, विषयांचा, ऐतिहासिक, भौगोलिक, तिन्ही काळांचा विचार किंवा तज्ञ व्यक्तींचा सहवास मिळत असेल तर वाचायला हवे की नको? शेवटी हा सहवास, आवड व सवय आपल्याला कळत-नकळत घडवत असते. एकदा शिवाजी सावंतांच (मृत्युंजय), सानेगुरुजीचं (श्यामची आई), डॉ. राजेंद्र कुंभार सरांचं (वाचुन दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा), वपु काळेंच (मोडेल पण वाकणार नाही), डॉ. नरेंद्र जाधव सरांचं (आमचा बाप आन आम्ही) इत्यादी कथा, कादंबरी, आत्मकथा, आत्मचरित्र, हास्यकथा, विनोदीकथा, आवांतर वाचनाची पुस्तके वाचा. उदा. अंगावर खरचटनारही नाही पण कर्ण, सानेगुरुजी, बालक-पालकांच अनुभव घ्याल. तसच एखादं मानासशात्र, ऐतिहासिक, भौगोलिक व वैज्ञानिकवरच पुस्तक वाचाल तर १०० वर्षाच संशोधन १०० पानात मिळेल.

एखाद्या महान व्यक्तीच आत्मचरित्र वाचाल तर त्याच जीवन आणि विचारंच सानिध्य मिळेल. एकद्या व्यक्तींचं प्रवासवर्णन वाचाल तर आयुष्यातील वळणात आलेले काटे व फुले दिसतील. बालक-पालकांचं हास्यकथा व विनोदीकथा वाचाल तर घरसंसार आणि जडणघडण कळतील. आता तुम्हीच सांगा अजून काय पाहिजे!

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.............काही सुचना असेल तर द्यावे........हिच विनंती

वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या मूडनुसार वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं प्रचंड आवडून गेलेली आहेत.. काही पुन्हा पुन्हा वाचली आहेत तर काही एकाच पानानंतर कायमची थांबवून टाकली आहेत.. पण पात्र कधी भरेल असं वाटत नाही, नाही भरलं तर चांगलंच आहे म्हणा.. त्यामुळे जरा मोकळा वेळ मिळाला की शोधाशोध चाललेलीच असते.. Happy