तुझा दिवस कुठे अडला आहे

Submitted by प्रितु_१४ on 26 June, 2020 - 05:14

तुझा दिवस कुठे अडला आहे
प्रितु_१४

विसर आपल्या प्रेमाचा
आता तुला पडला आहे
आनंदात असशील तू
तुझा दिवस कुठे अडला आहे

नेहमी करायची मीच कॉल
तुझा कधीच यायचा नाही
व्हाट्सअप्प वरचे मेसेज वाचून
उत्तर देखील द्यायचा नाही

जे मगितलेस ते देत गेले
पैसा असो की असो शरीर
सत्य उमगले जेव्हा मला
झाला होता खूप उशीर

जे हवं ते मिळालं तुला
शमली तुझ्या मनाची भूक
प्रेम केलं मी जीवापाड
ही आयुष्यातली मोठ्ठी चूक

चेतनाशून्य हा देह माझा
आता सरणावर पडला आहे
तरीही आनंदातच असशील तू
कारण तुझा दिवस कुठे अडला आहे

Group content visibility: 
Use group defaults