अळवाचे पान

Submitted by mohini hedaoo on 25 June, 2020 - 05:34

अळवाचे पान!
मोहिनी किंहीकर हेडावू
कालचाच प्रसंग.मुलगा वय वर्ष पाच.त्याच्या सोबत व्यापार खेळत होते.गोटया  खेळताना कधी चाराचे दान पडायचे तर कधी सहाचे!खेळता खेळता मी जेल मध्ये गेले.त्याचे त्याला फार वाईट वाटले.तो कासवीस होऊन मला विचारतो,"आई ,तू जेल च्या बाहेर कधी येशील?".त्याला खेळात देखील मी जेल मध्ये गेलेले आवडले नाही. असे वाटते,तो संवेदनाशील आहे म्हणून आनंद मानू की ह्या गेंड्याच्या कातडीच्या जगात त्याचा कसा निभाव लागणार, म्हणून चिंता करू?"While playing with children,let them win' ह्या न्यायाने खेळत असताना  तो दोनदा जिंकला.त्याला त्याचा आनंद झाला पण क्षणभरच! नंतर तो म्हणाला"आई,आता तू जिंकशी ल,बर का!" तोच मला समजावत होता.मॅच फिक्सिंग च्या जगात तो कधी निखळ आनंदाने sportly खेळू शकेल का?कालचाच दुसरा प्रसंग! जेवताना त्याला घास भरवत असताना,माझे बोट त्याने चावले,मी त्याच्यावर ओरडले.नंतर जेवता जेवता तो म्हणाला," आई वरण किती चविष्ट झाले.तू मला खूप आवडतेस! वाटलं कधी आपण मुलांप्रमाणे निखळ,निरागसपणे आपल्या भावना व्यक्त करू.?
Be good, get better असा स्वार्थी विचार न करता,कधी मनात येईल "ते", मनाला वाटेल तेव्हा बोलू? केव्हा स्वतः च इगो सोडून दुसऱ्याच्या इगो चा  विचार न करता वागू? केव्हा?
सहावीत  असताना पाठ केलेली catalyst ची definition अजून आठवते."a substance which by it's mere presence alters the rate of chemical reaction without under going any chemical change'....असे आपल्याला कॅटालिस्ट सारखे जगता येईल का?वागता येईल का?
संसारात इतरांना सांभाळत स्वतःवर काही ( विपरीत) परिणाम न होऊ देता,जगता येईल? ... अळवाच्या पानासारखे! पाण्याचा थेंब त्याच्यावरून ओघळल्यावरही जणू काहीच न झाल्यासारखे, वागणारा! स्वतःचे वेगळे अस्तित्व सूर्यप्रकाशात दिमाखाने मिरवत!
मोहिनी किन्हीकर हेडावू

Group content visibility: 
Use group defaults

छोटंसं आणि छान आहे ललित. लेखनातील विचार आवडला.

(शीर्षकाचं स्पेलिंग दुरुस्त करायला हवं ना? शीर्षक वाचून मला वाटलं काही वेगळी कोकणी/कानडी वगैरे रेसिपी आहे. )