बालक-पालक चिंताग्रस्त

Submitted by प्रा. राहुल भिम... on 25 June, 2020 - 04:37

Prof. Rohidas Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. No. 9503203695

pressure-300x167.jpg

आपल्या देशात शैक्षणिक व परीक्षेच्या काळात म्हणजे मार्च अखेर महिन्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणून केंद्र-राज्य सरकारने संपूर्ण देशभर संचारबंदी करून करून लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात, कॉलेज, विध्यापीठ, संस्था, ग्रंथालय बंद करण्यात आले आहे. तेव्हा देशातील व राज्यातील बारावीची परीक्षा संपली होती. मात्र आपल्या राज्यात दहावीची परीक्षा चालुच होती. मात्र शेवटचा एक पेपर पण लॉकडाऊन लागू झाल्यामुळे रद्द करण्यात आलं. याचबरोबर शालेय व महाविद्यालयीनच्या सर्व वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. देशात व राज्यात सर्वत्र संचारबंदी, नाकाबंधी असल्यामुळे कोणाला घराच्या बाहेर पडता येत नव्हते. लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे बाजारपेठ, कारखाने, दुकाने, औद्योगिक क्षेत्र सारेच प्रभावित झाले आहेत. त्याचबरोबर सर्वच शैक्षणिक क्षेत्रदेखील बंद झाले आहेत.

दरवर्षी पंधरा एप्रिलपयर्ंत सर्व वर्गांच्या शालेय परीक्षा संपतात आणि नवीन (उन्हाळी) शिकवणी वर्गाला १५ जून रोजी प्रारंभ होत असतो. मात्र कोरोनाविषाणूमुळे खासगी शिकवणीवर्ग बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या काळजीने शिक्षणाच्या भविष्याविषयी असलेले अनिश्‍चिततेने बालक-पालक चिंताग्रस्त आहेत. विशेष करून जे आता दहावी आणि बारावी वर्गात प्रवेश घेणार आहेत. अशा मुलांचा आतापयर्ंत अभ्यासक्रम चालू होऊन अर्धापेक्षा अधिक जास्त पाठय़क्रम व अभ्यास संपलेले असतात. पण सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे त्या मुलांना घरी बसून ऑनलाईनद्वारे पाठ्यक्रम, अभ्यास, गृहपाठ, व्याख्याने इत्यादी करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याकडे बऱ्याच घरात मुलं पालकांचे ऐकतात असे नाही. पाठांतर, गृहपाठ व अभ्यास करा म्हटल्यावर कसा करू आणि काय करू? या प्रश्नांने ते पालकांनाच हैराण करून सोडतांना दिसत आहे. यासाठी राज्य सरकार पर्यायी मार्ग म्हणून ऑनलाइन शिक्षण व अभ्यासक्रमावर भर देत आहे.

ऑनलाईनवर उपलब्ध होणारे शिक्षण व अभ्यासक्रम देखील बालक-पालकांच्या डोक्याला एक काळजी बनून गेले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी बालक-पालकांनकडे लॅपटॉप, मोबाईल, संगणक, स्मार्टफोन असणे आवश्यक असते आणि त्यात इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणे गरजेचे आहे. खंरतर ते मुलांच्या हातात पडले की अभ्यास, व्याखाने कमी आणि टिक टॉक, गेम, व्हिडीओ, गाणे, कार्टून व इतर ऑनलाईन गेम खेळण्यात त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असल्यामुळे ते देखील एक डोकेदुखीच झालेले आहे. उदा. आमच्याकडे रेहान-अरमान नावाचा मुलगा आहे त्यांना अभ्यास कर म्हटलं कि तो मोबाईल हातात घेतो. थोड वेळ ऑनलाइन व्याख्यानं ऐकतो नंतर परत गेम खेळायला लागतो.
ऑनलाईन शिक्षणामुळे व अभ्यासक्रमामुळे अनेक बालक-पालक त्रस्त झाल्याचे दिसून येते. ऑनलाईनवर देखील अनेक प्रकारचे अभ्यासक्रम व लिंक मिळत असल्याने बालक-पालकांची अवस्था गोंधळल्यासारखी निर्माण झाली आहे. शिक्षण विभागासमोर देखील यावर्षी अभ्यासक्रम, पाठयक्रम आणि त्याची अंमलबजावणी याबाबत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याची सोडवणूक करून बालक-पालकांना दिलासा देण्याचे काम करणे कठीणच बाब आहे. कारण देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचे संकट पुढील काही दिवसात व महिन्यात संपेल असे चिन्ह दिसत नाही.

आज आपण जे काही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आहोत ते सर्व नियम शाळा, महाविध्यालय, कॉलेज, विध्यापीठ, संस्था सुरू झाल्यानंतरही शिक्षक, विध्यार्थी तसेच तेथील इतर कर्मचार्‍यांना पाळावे लागणार आहेत. कदाचित यामुळे शैक्षणिकसंस्था आणि खासगी शिकवणीच्या वर्गात शिक्षकांच्या व विध्यार्थांच्या संख्येवर अनेक र्मयादा येण्याची शक्यता राहू शकतात. त्यामुळे ज्या शैक्षणिक संस्थेत भरपूर शिक्षक, विद्यार्थी शिक्षण देत-घेत आहेत त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना आता मास्क आणि सॅनिटायझर याचा पुरवठा देखील व्यवस्थापकांना करावा लागणार आहे. शैक्षणिक संस्थेची वेळ तीच असली तरी शाळेच्या शिकवणीचा वेळ कमी करावा लागणार आहे.

या सर्व बाबींचे नियोजन शिक्षण मंडळाकडून आणि शैक्षणिकसंस्था व्यवस्थापकांनी योग्यरित्या केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव न होता तो नियंत्रणात राहू शकेल.अन्यथा संसगार्मुळे शिक्षक, विद्यार्थी व ईतर कर्मचारी मोठय़ा प्रमाणात प्रभावित होऊन शैक्षणिक संस्था कोरोनाबाधित हॉटस्पॉट होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहू शकते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users