मुलांचा आदर्श आहार

Submitted by प्रा. राहुल भिम... on 24 June, 2020 - 10:59

Prof. Rahul Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. No. ९५०३२०३६९५

images.jpg

मुलांच्या वाढत्या वयानुसार आहार बदलत जाते. मुलांना काय खायला द्यावे? काय देऊ नये? असा प्रश्न सगळ्याच पालकांना पडलेला असतो. नेमके कोणते आहार पोष्टिक व आदर्श आहे याची कल्पना बऱ्याच पालकांना नसते. परिणामी बाजारातली कृत्रिम खाद्यपदार्थ व खाद्यपेये मुलांना देण्याकडे त्यांचा कल असतो. बाजारातले तयार असलेले कसले तरी डबाबंद दुध पावडर, पोष्टिक आहार डब्बा, पेय, दुधपाकीट, डब्बाबंध पावडर इत्यादी अन्न घरी आणतात व मुलांना देणे हेच आधुनिकतेचे लक्षण आहे. आज समाजात बऱ्याच पालकवर्गांचा समज झाला आहे. त्यातूनच या डबाबंद अन्नाचे फॅड वाढते.

पैसा खर्च होतो पण मुलांना जे खरोखरच खाद्य व आहार मिळायला पाहिजे ते मिळत नाही. तेव्हा अशा बाजारातील तयार/रेडीमीट अन्नाच्या मागे न लागता घरातच उपलब्ध होऊ शकणारे खाद्य पदार्थ मुलांना घरगुती पध्दतीने खायला घालणे जास्त पोष्टिक व सोयीस्कर ठरते. म्हणूनच आहारतज्ञ, बालरोगतज्ञ, बालडॉक्टर इत्यादी नेहमी काही विशिष्ट खाद्य पदाथार्चा आग्रह धरत असतात. पुर्वी आदिवासी व जंगलात राहणाऱ्या मुलांना कुपोषणाचा सामना करण्यासाठी नेमके काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा त्यांच्या आहारामध्ये व खाण्यामध्ये बाजारात मिळणार्‍या भाज्या, दुध पावडर, कंद, मूळ आणि फळे असावीत असा आग्रह धरला गेला. परंतु बाजारातले फळे, दुधपावडर, कंद-मूळ आणि भाज्या फारच महाग असतात याची जाणीव पालकांना झाली.

त्यावर एका आहारतज्ञाने जंगलात, शेताच्या बांधांवर रस्ताच्याकडेने उगवणार्‍या अशा काही भाज्यांची, फळे, कंद-मुळांची उदाहरणे दिली. त्या भाज्या, फळे, कंद-मुळ केवळ स्वस्तच असतात असे नाही तर मोफत मिळतात आणि मुलांच्या आहारामध्ये पोष्टिक खाद्यपदार्थ म्हणुन उपयोगी पडतात. खाण्याची भाजी, फळे, कंद-मूळ म्हणून त्यांच्याकडे लोकांचे लक्ष गेलेले नाही. पण बाजारात मिळणार्‍या कोणत्याही महाग भाजी, फळे पेक्षा या मोफतच्या फळे व भाज्यांमध्ये जास्त पोषणद्रव्ये व पोष्टिकद्रवे असतात. तीच अवस्था फळांची, कंदांची, मुळांची, फुलांची असते. सफरचंद, संत्री, मोसंबी, इत्यादी अशा महागड्या फळांपेक्षा जास्त पोषणद्रव्ये रानामध्ये व जंगलामध्ये अशी कितीतरी रानफळे, रानफुले, जंगलातील कंद-मूळ आहेत की ज्यांच्यामध्ये पेरू, आंबा, सीताफळ, रामफळ, बोर, बीट, गांजर, मुळा, काकडी, काजु, बदाम, चिक्कु, नारळ, जांबून, केळी, सुर्यफुल, फणस इत्यादी पोष्टिक आहार मोफत उपलब्ध असतात. ही फळे, कंद-मूळ, फुले आणि ह्या भाज्या व्यावसायिक विचार केला असता दुर्लक्षित असतात. कारण त्यांची चव चांगली नसते. पण कोणत्याही चवदार आणि महागड्या फळे आणि भाज्यांपेक्षा त्यांचे पोषक सार्मथ्य मात्र मोठे असते. मुलांना आहार देतांना पोष्टिकत: पाहणे गरजेचे आहे.

बाजारात तयार असलेले खाद्यपदार्थपेक्षा नैसर्गिक खाद्यपदार्थ मुलांना आहारामध्ये देणे. हसत-खेळत पोष्टिक खाद्यपदार्थ बनवु या व हसत-खेळत मुलं वाढवु या!

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users