एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग नववा.

Submitted by अजय चव्हाण on 24 June, 2020 - 00:20

भाग नववा - हेल आॅफ अ डे.

21 नोव्हेंबर, वेळ सकाळी 7:30. नयना आरशासमोर उभं राहून तयार होत होती. आज ती खुप खुश होती. तिचा वाढदिवस आहे म्हणून नाही तर तिला आज मनोमन खात्री होती की, आज हर्ष तिला प्रपोज करणार आहे आणि म्हणूनच आज ती 'सातवे आसमाॅ पर' काय ते म्हणतात ना त्यावर होती.

कालच तिने हर्ष काय करतोय म्हणून सहज आपल्या कॅबिनमध्ये असलेल्या पिसीवरून सीसीटीव्ही चेक केला होता. अधून-मधून ती नेहमीच करायची. तिने बघितले की संपूर्ण ऑडिटोरियम मस्त गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजवलाय आणि हर्ष प्रोजेक्टरवर विडीयो प्लेय करतोय. स्पष्ट असं काही दिसतं नव्हतं आणि ऐकूही येत नव्हतं. त्यामुळे प्रोजेक्टर स्किनवर नक्की काय चालू आहे हे तिला कळत नव्हतं. मग तिच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि काॅमन ड्राईव्ह मध्ये साठवलेल्या व्हिडिओज मधून तो व्हिडिओ शोधून थोडं थांबत, थोडं फास्ट फाॅरवर्ड करत ती पाहू लागली. काही तिचे खास फोटो आणि पिकनिकला हर्षने घेतलेले काही सेल्फीज होते. बॅकग्राउंडला छानसं म्युझिक. नेमका तेव्हाच एक महत्वाचा काॅल आलेला त्यामुळे तिचं थोड दुर्लक्षच झालं होतं आणि काॅल ठेवून झाल्यानंतर तिला पी.सीवर 'आय लव्ह यु' चे मोठे लाल अक्षरातले शब्द उमटलेले तिला दिसले होते. काही कळायच्या आत पटकन तिने तो व्हिडीओ बंद केलेला.

हे सगळं आता आठवून ती स्वतः शीच मनोमन हसली होती. आज तिने छानशी ठेवणीतली तिच्या आईची गुलाबी साडी नेसलेली. प्रत्येक वाढदिवशी आईची आठवण आणि आशिर्वाद म्हणून हिच ती साडी नेसायची. छानसा हलका मेकअप करून तयार झालेली. साडीत नयना एखाद्या परीसारखीच भासत होती. साडीचा एक पदर हाताने सावरत हवेत खेळवत स्वतःशीच -

"आज मैं उपर..आसमाॅ निचे..आज मैं आगे..जमाना है पिछे"

हे गाणं गातं ऑफिसला जायला निघाली.

............................................................................................................................................................................................................................

नयना ऑफिसला पोहचली तशी तिचं खुपच छान स्वागत झालं होतं. संपूर्ण ऑफिस मस्त सजवलं होतं.. रिसेप्शनवर तर फुलांचे बुके आणि ग्रीटिंग्सचा खच पडला होता. ऑफिसतला प्रत्येकजण येऊन विश करून जात होता. कॅबिनमध्ये पोहचल्यावर तिने दिर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवर बसली. नयनाला खुप छान वाटतं होतं. तिच्या मनात फुलपाखरे भिरभिरत होती.. उगाचच फिरत्या खुर्चीवरून तिने एक गिरकी घेतली आणि तेवढ्यातच हर्षचा फोन आला.

"नयना आज ऑडीमध्ये एक अर्जंट मिटींग ठेवलीय तु आलीस तर सुरू करू" पलीकडून हर्षने सांगितलं तसं ती स्वतःशीच हसली.

"बच्चू..सब पता है हमें.. सबके सामने बाॅस को प्रपोज करोगे?" स्वतःशीच पुटपुटत ती ऑडिच्यादिशेने जणू काही माहितच नाही अशा अर्विभावात जाऊ लागली.

ऑडीमध्ये नयना पोहचली तेव्हा गुलाबाच्या पाकळ्या अलगद लहरत येऊन तिच्या अंगावर सांडू लागल्या आणि स्पीकरमधून -

"हॅप्पी बर्थ डे टू यू..
हॅप्पी बर्थ डे टू यु नयना..
हॅप्पी बर्थ डे टू यू"

समोरच्या स्क्रिनवर तिच्या खास क्षणांचे फोटो झळकत होते त्यात काही हर्षने पिकनिकला घेतलेले सेल्फीजसुद्धा होते. तिच्या ह्रदयाची धडधड आता वाढली होती.. ज्याची इतकी वर्षे वाट पाहीली तो क्षण आता जवळ आला होता पण जसं नयनाला वाटलेलं तसं काही घडलचं नाही. स्क्रिनवर 'आय लव्ह यू' च्या ऐवजी 'व्ही लव्ह यू' चे शब्द झळकत होते. केक कापला तसा सगळ्यांनीच टाळ्या वाजून परत विश केलं. काही लोकांनी गिफ्टसपण आणलेली. सगळ्यात शेवटी हर्षने तिला विश केलं आणि छानसं गिफ्टही दिलं. पाकिटावर "टू द ब्रिलीयंट बाॅस, टू गाईड, टू फिलोसोफर अॅण्ड टू बेस्टेस्ट फ्रेंड" असं लिहलेलं. ती वाचतच होती इतक्यात हर्षने अजुन एक गिफ्ट दिलं. नयना प्रश्नार्थक नजरेने पाहणार तितक्यातच हर्षने सांगितलं.

"हे अनुराधातर्फे"

"का? ती नाही आली आज?" नयनाने गिफ्ट घेत विचारलं.

"नयना विसरलीस का? आज तिचाही बर्थ डे आहे आणि आज ती सुट्टीवर आहे." हर्षने सांगितल.

"अरे हो यार..विसरलेच.. थॅन्क्स सांगितल्याबद्दल..नंतर करते काॅल" - नयना.

"काही फायदा नाही..सकाळपासून ट्राय करतोय..लागत नाही. ती फॅमिलीसोबत तिच्या फार्महाऊसवर गेलीय सेलेब्रेट करायला."
हर्षने माहिती पुरवली.

"ओह..अच्छा! इतकंचं म्हणून नयना आपल्या कॅबिनमध्ये परत आली.

खरंतरं जे तिला अपेक्षित होतं तसं काही घडलंच नव्हतं त्यामुळेच तिचा थोडासा हिरमोड झाला होता. ती कॅबिनमध्ये बसून विचारच करत होती. उगाचचं जास्त विचार मनात येऊ नयेत म्हणून ती गिफ्टची पाकीटे फोडून पाहू लागली. सर्वात आधी तिने हर्षचं गिफ्ट उघडलं. बाॅक्सच्या आतमध्ये महागडा पेन आणि खुप सुंदर कस्टमाईज केलेली डायरी होती. नंतर तिने अनुराधाच गिफ्ट उघडलं. अनुराधाने तिला खुपच सुंदर पेंटीग गिफ्ट केलं होतं. नयनाला अनुराधाच गिफ्ट खुपच आवडलं. ते गिफ्ट बघून त्यातल्या त्यात तिचा मूड थोडा ठिक झाला.

थोड्या वेळाने परत हर्ष तिच्या कॅबिनमध्ये आला..

"नयना कसं वाटलं सरप्राईज आणि माझं गिफ्ट..?"

"मस्तच ..खुप छान ..थॅन्क्यू सो मच हर्ष."

अजून एक सरप्राइज आहे तुझ्यासाठी ..

"काय?" आता हर्ष तिला प्रपोज करतो की काय? असं वाटून
मनोमन तिची पाकळी फुलली आणि नकळतच तिने जास्तच उत्साहाने विचारलं.

"नयना सर्वात आधी तुलाच सांगतोय. माझी ड्रिम गर्ल भेटली मला आणि यु नो व्हाॅट तिने मला कालच होकार दिलाय" हर्षने काहीसं लाजत तिला सांगितलं.

नयनाला हे ऐकून खुप मोठा धक्काच बसला होता..कुणीतरी हिंदोळ्यावर बसवून झुलावावं आणि मस्त रमत असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कुठेतरी पडावं.. असचं वाटलं तिला.. क्षणार्धात तिच्या कोमल ह्रद्याला तडे गेले होते.

"अभिनंदन!! कौन है वो खुशनसीब लडकी?" स्वतःला सावरत चेहर्यावर खोटा आनंद दाखवत तिने विचारलं.

"गेस करशील? तु ओळखतेस तिला" - हर्ष.

"नाही..मला कसं गेस करता येणार? तूच सांग"

अनुराधा! एखादं सिक्रेट ओपन करावं तसं हर्षने सांगितलं

नयनाला हे ऐकून तर अजूनच धक्का बसला. ती मनातल्या मनात कुठेतरी हरवूनच गेली.

मग त्याने तिला कसं काल ऑडीमध्ये प्रपोज केलं.. तिने कसा होकार दिला हे सगळं सांगितलं आणि तिच्या नकळत ऑफिस वापरलं ह्याची माफिसुद्धा मांगितली..

"तुमच्या दोघांच्या नव्या सुरूवातीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
आय अॅम हॅप्पी फाॅर यू" इतकचं नयना कसंबसं म्हणू शकली.

..............................................................................................................

आजचा वाढदिवस नयनाला कायमच लक्षात राहीलं. खरंतरं कुणासोबतही असं घडू नये आणि वाढदिवशी तर नक्कीच नाही.
पण घडणारं हे घडतचं आणि ते थांबवणं कुणाच्याच हातात नसतं.
आजच्याच दिवशी तिचं ह्रदय तुटल होतं..तिने पाहिलेल्या कित्येक स्वप्नांचा चकणाचुर झाला होता. खरंतरं तिला खुप रडावसं वाटतं होतं पण वाढदिवशी रडू नये म्हणून तिने ते दाबून ठेवलं होतं..
जे काही घडलं ते तिला स्वप्नातही कधी असं होईलं असं वाटलं नव्हतं. तिला कुणाबरोबर तरी मन मोकळं करावसं वाटतं होतं.
ओरडावसं वाटत होतं..प्रेमभंगाच्या यातनेचा आक्रोश करावासा वाटत होता आणि म्हणूनच रात्री गौरीला घरी बोलवून सगळं सांगितलं होतं..गौरीने तिला धीर दिला. खरंतरं गौरीला तिला खुप काही ऐकवायचं होतं पण हि ऐकवायची नाही तर सावरायची वेळ आहे हे समजून ती नयनाला सावरायचा प्रयत्न करत होती.

क्रमशः

भाग आठवा - https://www.maayboli.com/node/75191

टिपः कथेचे सर्व हक्क अबाधित.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम..... मस्त कलाटणी दिली आहे कथेला...... आता नयन पुन्हा पहिल्या प्रमाणे वागणार का..... अनुराधाला हर्ष पासून दूर करण्याचा प्रयत्न करणार की त्यांच्या आनंदात सामील होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.... पुढील भाग लवकर प्रकाशित करा

नयनासाठी वाईट वाटलं आणि तुझे याद ना मेरी आई किसी से अब क्या कहना... हे गाणं आठवलं. छान आहे हा हि भाग...

प्रेमभंगाच दुःख वाईटच.... नयना किंवा अनु एकी च्या नशिबात होतंच. आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत