श्रेयस की प्रेयस : Kotlar Way !

Submitted by Silent Banker on 22 June, 2020 - 10:55

श्रेयस की प्रेयस : Kotlar Way

कोविड १९ विषाणूने जगावर लादलेला करोना अणि त्यातून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जगभरात लागू झालेले "lockdown " यामुळे आरोग्य विषयक समस्या ही एका गहन आर्थिक प्रश्नात रूपांतरित झाली । साहजिकच आता "पुनश्च हरिओम " म्हणून जगरहाटी रुळावर येत असताना या संकटाचा आवाका अणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देशोदेशींच्या सरकारने राबविलेले उपक्रम किंवा घोषित केलेली वित्तीय मदत (Packages ) याचा बराच गाजावाजा सध्या आपण माध्यमांमध्ये ऐकतो आहोत। भारताबद्दल बोलायचे तर आपल्या सरकारच्या रुपये २० लाख कोटीच्या आत्मनिर्भर package वर प्रचंड चर्चा झाली। मोदी भक्तांसाठी "वित्तीय तूट नियंत्रणात ठेऊन जाहिर केलेले ते स्मार्ट package" आहे तर मोदी विरोधकांसाठी "प्रत्यक्ष मदत न करता कर्जावर आधारित तोंडाला पाने पुसणारे package" आहे।

राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन याचा विचार केला तर करोनाच्या आधीचे अर्थकारण अणि जागतिक व्यापार उदीम याचे जे प्रारूप होते त्याच्याशी सुसंगत असे ते package आहे। भांडवलशाही अणि मुक्त व्यापार यावर आधारित जागतिकीकरण या व्यवस्थेचा पायाच मुख्य:त दोन घटकांवर आधारित होता

नैसर्गिक साधनसंपत्ति अमर्याद आहे या अंधविश्वासावर (?) आधारित , स्वस्त कच्चा माल अणि देशोदेशीचे स्वस्त कामगार यांच्या बळावर अव्याहत वेगवेगळ्या वस्तू अणि सेवांचे उत्पादन(Ability to produce ) करत राहणे
त्या वस्तू अणि सेवा खरेदी करणारा ग्राहक अणि त्याची उपभोग घेण्याची( Ability to consume ) वृत्ती अमर्याद आहे। ती तशी रहावी यासाठी जाहिरातींच्या क्लुप्त्या अणि कर्ज काढून "जिओ जी भरके " चा नारा मदतीला आहेच।
"Deferred Gratification" ते " Instant Gratification" हे बदललेले आजचे जीवनसूत्र जन्माला आले ते याच धर्तीवर । सुखमय जीवनाची व्याख्या अर्थातच भौतिक सुखांच्या पार्श्वभूमीवर होऊ लागली। काटकसरीने संसार करुन आयुष्याच्या संध्याकाळी जमेल तेवढी भौतिक सुख उपभोगायची (Deferred Gratification) हा विचार मागे पडून "या सुखांनो या " ऐसे म्हणत उधारीवर ( Credit) का होईना पण सुखांना आलिंगन देण्याची आणि जगण्याचा आनंद हा "आज आत्ता इथे "(Instant Gratification) घेण्याची प्रथा रूढ़ झ ा ली।

अश्या स्वप्नाच्या दुनियेचा अजून एक नियम असतो की ती स्वप्ने दाखवून , तुम्ही पण ती पूर्ण करू शकता असे सांगणारा एक ड्रीममर्चेन्ट जरुरी असतो. ते ड्रीममर्चेन्ट होते जगातील मातब्बर मार्केटिंग गुरू अणि त्यांचे अस्र होते "4P's ऑफ़ मार्केटिंग" : Product ( उत्पादन ), Price ( किंमत अणि ते घेण्यासाठीचे कर्ज पर्याय ), place ( वितरण व्यवस्था ) अणि promotion ( जाहिरात ). पहिल्या दोन गोष्टी जागतिकीकरणाने सहज साध्य करून दिल्या। वस्तू विकणाऱ्या कंपन्यांनी वितरणाची जबाबदारी पेलली अणि ही संसाधन सज्जता विक्री (sales ) अणि नफा ( Profits ) याच्यात रूपांतर करण्याची कामगिरी पार पाडली या ड्रीममर्चेन्ट लोकांनी।

जगभरातील मार्केटिंग गुरू याचे वर्णन " Conspicuous Consumption ( महागड्या गोष्टींची खरेदी करून आपले सामाजिक स्थान उंचावणे ) असे करतात। यातून निर्माण झालेल्या " Conspicuous Consumption lifestyle " या जीवन शैलीची वैशिष्टे होती "4P's ऑफ़ Status Display Syndrome": Pride (अभिमान ), Prestige (सामाजिक स्थान ), possessiveness (मालकी हक्काची भावना ) अणि Power ( मुठ्ठी में दुनिया चा एहसास ).

.थोडक्यात काय तर "प्राप्तीचा आनंद " हा त्याच्या मुळाशी होता। भारतीय संस्कृतीत वर्णन केलेले " जीवनाचे प्रेयस म्हणजेच हाच प्राप्तीचा आनंद किंवा इन्द्रियांचे तुष्टीकरण "

या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात येईल की देशोदेशीच्या सरकारांनी दिलेली stimulus packages ही "कर्ज काढा & खर्च करा किंवा कर्ज काढ़ा & उत्पादन करा " या विचाराभोवती घुटमळताना आढळते। तरलता ( Liquidity ) वर आधारित ही घोषणा त्यामुळे माणसाच्या जीवन प्रेयसाला चुचकारून "Animal Spirit " निर्माण करण्याचा प्रयत्न करते।

करोना अणि त्यानंतर आलेले "lockdown " यामुळे माणूस स्व:त चा जीव वाचविण्यासाठी का होईना पण जो घरात कोंडला गेला तेव्हा कुठे "गरजा अणि चैन " यातील फरक ध्यानात येण्यासाठीचा मोकळा वेळ त्याला मिळाला अणि जगण्याचा आनंद हा "आज आत्ता इथे" घ्यायच्या अट्टाहास अणि आयुष्य हे एका "स्प्रिंट " सारखे धावण्याची खरेच गरज आहे का याचा विचार करण्याची संधी निर्माण झाली।

वर उल्लेखलेल्या ड्रीममर्चेन्ट पैकी एक अतिशय प्रसिद्ध नाव म्हणजे " फिलिप कॉटलर ".आधुनिक मार्केटिंगचे जनक अशी बिरुदावली सार्थपणे मिरविणारे हे महाशय यांचा नुकताच वायरल झालेला लेख। ज्यामध्ये कॉटलर यांनी सध्या चालू असलेल्या करोना आपत्तीचा व त्या निमित्त्याने ग्राहकांच्या विचारात होणाऱ्या बदलाचा (Consumer sentiment & behaviour) घेतलेला आढावा। "Status Display Syndrome" मध्ये अडकलेला ग्राहक "Lockdown " संपल्यानंतर ते चुकलेले "Animal Spirit " पुन्हा अनुभवण्यासाठी बाहेर पडेल अणि ज्याला "Revenge Shopping" म्हणतात त्यानुसार पुन्हा भरपूर खरेदी करेल अशी अटकळ लावली जात असताना कॉटलर यांचे विवेचन अणि पुढील काळात होऊ घातलेले बदल या बद्दलचे त्यांचे विचार नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे।

"The Sarasota Institute " या Think Tank ने कॉटलर यांचा हा लेख प्रसिद्ध केला , त्या नुसार ग्राहकचा प्रवास हा"Revenge Shopper" कडून " Rational Shopper " कड़े होईल असा प्राथमिक नित्कर्ष काढता येईल। करोना च्या संकटामुळे एकूणच आपले जीवन , आरोग्य , गरजेच्या वस्तू , नोकरीतील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर थोड्या कमी खरेदीकडेच लोकांचा कल असेल अणि या ग्राहक राजाला आपल्याला ४-५ गटात विभागता येईल।

१. Life Simpler: जगण्यासाठी उपयुक्त आणि गरजेच्याच वस्तू वापरण्याकडे या लोकांचा कल असेल। ते कमी अन्न किंवा वस्तू विकत घेतील। त्यांच्याकडे जे साठविलेले , विकत घेतलेल्या गोष्टींपैकी ज्या वस्तू वापरल्या जात नाहीत त्याचा ते त्याग करतील। नवीन वस्तू किंवा सेवा विकत घेण्यापेक्षा " वापरावर आधारित खरेदी "( Pay per Use ) कडे त्यांचा अधिक ओढा असेल।

२. Degrowth Activist : "Status Display Syndrome" व तो पूर्ण करण्यासाठी सतत उत्पादन यामुळे मर्यादित नैसर्गिक संसाधने संपण्याचा धोका हे लोक व्यक्त करतात। भौतिक सुखे मर्यादित राखून , आपल्या गरजा कमी करण्याकडे यांचा कल दिसतो।

३. Climate Activist: यात प्रामुख्याने निसर्ग प्रेमी , पर्यावरणवादी यांचा समावेश होतो। भौतिक सुखे , ती पूर्ण करण्यासाठी सतत होणारे उत्पादन , त्यातून होणारे प्रदुषण याचा आपल्या वातावरणावर विपरीत परिणाम होत आहे। पुढील पिढीसाठी स्वच्छ हवा , पाणी या उपलब्ध करून द्यायच्या असतील तर "GDP(सकल राष्ट्रीय उत्पन्न )" बरोबरच किंबहुना जरा जास्तच "GDW- Gross Domestic wel -fare ( सकल लोकांचे कल्याण )" कडे लक्ष्य द्यावे लागेल। त्यासाठी ओघाने सध्याची उपभोग संस्कृति बदलून उपयोगयुक्त जीवनशैलीकड़े वाटचाल ही या लोकांना अत्यंत महत्त्वाची वाटते।

४. Food Choosers: " Be Vegan"( शाकाहारी बना ) या ब्रिगेडचे लोक या गटाचे भाग आहेत। फ ळे , भाज्या यावर आधारित आहाराचे समर्थन करणारे हे लोक " जीवो जीवस्य जीवनम " या जंगलाच्या व्यवस्थेला विरोध करत अन्नासाठी प्राणीहत्या कमी करावी अशी आग्रही भूमिका घेतात।

५. Conservation Activist : पूर्वी आपल्याकडे जुन्या वस्तू दुरुस्त करून वापरण्याची जी पद्धत होती त्याचे समर्थन करणारे लोक या गटात मोडतात। कमी पण टिकाऊ गोष्टी बनविण्याकडे यांचा विचार दिसतो। जाहिरात क्षेत्रात ज्याला "Planned Obsolescence" म्हणतात ज्यातून मग " limited edition "वॉच किंवा कपडे किंवा कारची मॉडल्स यांचे अवडंबर माजते त्याला या लोकांचा विरोध आहे। या जाहिरात क्लुप्त्यांमुळे "सतत नाविन्याचा & त्यातून चुचकारले जाणारे "4 P's of Status Display Syndrome" चा धोका जगाला आहे असे या लोकांचे म्हणणे आहे। थोडक्यात "Exclusivity " पेक्षा " Endurance & durability" गरज यांना जास्त वाटते।

थोडक्यात ग्राहकाची वाटचाल " Rational Consumer" कडे होईल असे कॉटलर यांना वाटते। करोनाच्या पार्श्वभूमीवर एकूणच जीवन , आरोग्य , कुटुंब यांचा सारासार विचार होत असताना भौतिक सूखे अणि त्यातून होणारा प्राप्तीचा आनंद या पेक्षा जीवनाचा खरा अर्थ समजावून घेण्याकडे कल वाढत जाईल असे एकंदर चित्र आहे। जीवनाचा खरा अर्थ म्हणजे अधात्म्य किंवा भौतिक गोष्टींचा त्याग अशी काहीशी समजूत होण्याची शक्यता आहे तर ते तसे नसून जीवन ध्येय , त्यासाठीचे प्रयत्न , त्याच्या यश अणि अपयशाच्या कहाण्या असा सुरस प्रवास अपेक्षित आहे। भारतीय संस्कृतीत त्याला " जीवनाचे श्रेयस " असे म्हटले जाते।

माणसाच्या आयुष्यात कायम प्रेयस ( प्राप्तीचा आनंद : Consumerism ) अणि श्रेयस ( जीवनाचा अर्थ व ध्येय ) यांचे द्वंद चालू असते। प्रेयस हे नेहमीच विलोभनीय असते कारण त्यातून इन्द्रियांचे तुष्टीकरण सहज होते। जीवनात काय गरजेचे आहे , त्याचा अर्थ काय हे म्हणजे श्रेयस।

करोनाच्या पार्श्वभूमीवर आज साजरा होणारा " Yoga Day " आरोग्याचे , "Father's Day" हे कृतज्ञता व्यक्त करण्याचे अणि " Solar Eclipse " हे विज्ञानाचे प्रतिक मानले तर तो "Celebrate " करून "प्रेयसाला " चुचकारण्यापेक्षा ते रोजच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवून जीवनाचे श्रेयस शोधण्यासाठी केला तर तो निश्चितच स्वागतार्ह बदल ठरेल।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोटलर यांच्या मूळ लेखाची लिंक मिळू शकेल का?
Father's Day, Mother's Day, Valentine Day हे असे प्रकार मुळात मार्केटिंगमुळेच उदयास आले आहेत.

चांगला लेख! श्रेयस आणि प्रेयस या भारतीय संकल्पनांना जोडून घेतल्यामुळे आपल्याकडच्या वाचकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचेल असे वाटते.
कोरोना मुळे जर असे काही शाश्वत बदल घडून आले तर फारच उत्तम होईल.
कोटलर यांचा मूळ लेख इथे उपलब्ध आहे -
https://sarasotainstitute.global/the-consumer-in-the-age-of-coronavirus/

अर्थात ग्राहक राजाची ताकद जितकी अमर्यादित वाटते तितकी ती नसते. If the model of externalizing environmental costs has to be reset to a more sustainable model that relies on circular economy, changes in the policies are must. It's therefore very important to have a ruling government that is able to take the correct stand. असे लोकनेते निवडून येण्यासाठी लोक तितके जागरूक हवेत. नुसता ग्राहक राजा जागा होऊन उपयोग नाही, मतदार राजा पण सतत जागृत हवा.
आपल्याकडे बरोब्बर साडेनऊ वर्षे आहेत.

लेख आवडला आणि बरीच नवीन माहिती कळाली .
>>"गरजा अणि चैन " यातील फरक ध्यानात येण्यासाठीचा मोकळा वेळ त्याला मिळाला अणि जगण्याचा आनंद हा "आज आत्ता इथे" घ्यायच्या अट्टाहास अणि आयुष्य हे एका "स्प्रिंट " सारखे धावण्याची खरेच गरज आहे का याचा विचार करण्याची संधी निर्माण झाली। >> +१

लेखन आवडले.

.थोडक्यात काय तर "प्राप्तीचा आनंद " हा त्याच्या मुळाशी होता। भारतीय संस्कृतीत वर्णन केलेले " जीवनाचे प्रेयस म्हणजेच हाच प्राप्तीचा आनंद किंवा इन्द्रियांचे तुष्टीकरण ">>>>>प्राप्तीचा आनंद फार काळ टिकत नाही हे पक्के लक्षात आले आहे हळूहळू. उलट अनावश्यक खर्चाने समाधान नष्ट होते ह्यावर विश्वास बसत चालला आहे.
कोरोना मुळे जर असे काही शाश्वत बदल घडून आले तर फारच उत्तम होईल.....मलाही आशा आहे जिज्ञासा.
धन्यवाद.

मस्त आहे लेख. असेच होवो. अतिश्रीमंत आणि अतिगरीब असे टोकाचे गट सोडले तर मधल्या गटातच हे बदल घडून येतील असं वाटतंय.

सुंदर लेख. Happy
विचार करायला लावणारा...