अंतर

Submitted by priyanka joshi on 19 June, 2020 - 15:57

(भारत अमेरिका )

जीव तुटतो तुटतो
अर्ध्या वर तो फिरतो
इथे काळोख आकाशी
तिथे लखखतो रवी

झाले फोन आता खूप
झाला विडिओ कॉल मग
तरी आतुर- आतुर
स्पर्श भेटीविना नाही

काही किस्से तुझे माझे
आत ह्रीदयी छापले
जरी डोळ्यात टिपूर
ठेव आवाज कणखर

सात समुद्र अंतर
काही केल्याने मिटेना
कंठ दाटून तो येता
ठेव हसत चेहेरा

काही सांगायचे होते
त्या गोऱ्या चांदोबाला
तुझा वेग आहे फार
मागे टाकी तू विमान

नभ आपरे पडले
तू वेग वान किती
मला पंखात बसावं
चाल जिथे माझी माती

घट्ट मिठीत घेईन
माझ्या आई-बाबा ला मी
कंठ दाताला तो जरी
मी पाणी रोखणार नाही

होईन चिमुकली परत
कुशीतली आई च्या रे
बाबा सांगीन गुपित
माझा मित्र चांदोबा रे

आता अंतरे आटली
तुझी काळजीचं मिटली
कधी आठवणच येता
आहे चंद्राचीच स्वारी

डोळे उघडावे जसे
तसे स्वप्न माझे विरे
चंद्र अबोल-अबोल
पृथ्वी गोल बाई फार

अंतराचे मोजमाप
नको कारवाया आता
जरी डोळ्यात टिपूर
ठेव आवाज कणखर !
ठेव आवाज कणखर!

Group content visibility: 
Use group defaults