कोविड कोंडवाडा

Submitted by गुरूदीप on 18 June, 2020 - 15:14

"कोविड कोंडवाडा"

नकोत नुसत्या भिंती आणि नकोत बंद खिडक्या,
फक्त एक कवडसा खोलीमध्ये आणि कोंडणारा वारा.
उजाड रान, उजाड गाव, मृत्यूच्या किंकाळ्या,
श्व़ासागणिक,‌गुदमरणारा जीव, स्मशानाचा उंबरठा.

थांबलेली जल धरा आणि नियतीच्या उत्तूंग घिरट्या,
स्पर्षांची वजाबाकी इथे आणि पुरून उरणारा दुरावा.
गोठलेले डोळे अन् नजरा, पाशवी युक्त्या सैतानाच्या,
एकागणिक एक, दिसागणिक अनेक, संसार मोडणारा.

परत सुरूवात नव्याने, प्रकृतीस न विसरता हे मनुष्या..
मी सर्वशक्तिमान अट्टहासी , भोवेल हा अहंपणा.
आता वेळ सावरायची आणिक सावध तयारीची,
परत संधी नसे तुजला, काळ वेशीवर टपून बसलेला.
.......परत संधी नसे तुजला, काळ वेशीवर टपून बसलेला

- दीप (गुरुदीप) 18.06.2020

Group content visibility: 
Use group defaults