पुस्तकं हेच गुरु

Submitted by प्रा. राहुल भिम... on 18 June, 2020 - 05:38

Prof. Rahul Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. No. 9503203695

पुस्तकं हा असा भंडार आहे कि त्यामध्ये संपुर्ण विश्वाची माहिती साठवलेली आहे. आपण जितका उपयोग करू तितकेच समृध्द आणि ज्ञानी-ध्यानी होत जाऊ. पुस्तकं जन्मलेल्या बाळापासून तर अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असते. त्याचबरोबर त्यामधून मिळालेलं ज्ञान आणि शब्द साठा हे तर पायापायात उपयोगी पडत असते. मग यामध्ये वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, भौतिक, रसायनिक, औषधशास्त्र, अंकशास्त्र, ऐतिहासिक, राजकीय, नैसर्गिक याआदी विविध विषयांवरील पुस्तकं एकत्रित पाहिले तर पुस्तकांचे स्वतंत्र, महत्व, विविधता व आगळेवेगळे विश्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटते.

पुस्तकं आपल्या आयुष्याला एक नवी आशा व दिशा देण्याचे काम करतात. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यातिन्ही काळाची माहिती फक्त आणि फक्त पुस्तकं रुपातुनच आपण घेत असतो. बालवयापासूनच पुस्तकं आपल्या सोबत असते. पुस्तकाचं संस्कार हे बालवयापासून मुलांनावर करतात. त्यामुळे पुस्तकं हे जीवनावश्यक आहे असे मानायला व पुस्तकं हेच प्रथम गुरु आहे असेही मानायला काहीच हरकत नाही. पुस्तकातुन मिळालेलं ज्ञान कधीही वाया व फुकट जाऊ शकत नाही. बालवयापासून कळत-नकळत पुस्तकांच परिणाम आपल्यावर होत असतात. यामध्ये वैचारिक व काल्पनिक गोष्टी ऐकायला, लिहायला, पाहायला व वाचायला मिळत असतात.

घरात पालकांकडून किंवा आजी-आजोबांकडून पारंपारिक व काल्पनिक गोष्टी ऐकायला मिळतात. लहानपणी आवडणाऱ्या गोष्टी घरातील मंडळी पुस्तकातुन शिकवत असतात. त्यामध्ये कथा, आत्मकथा, चरित्रकथा, बालकथा, बालकथासंग्रह, हास्यकथा, विनोदीकथा, विनोदिलेख, हास्यलेख इत्यादी पुस्तकातुन गोष्टी सांगत असतात. त्यामुळे एकप्रकारे वाचन संस्कार तर होतेच पण पुस्तकाचं महत्व व गरज पण लक्षात येत असते. मग संस्कृत श्लोक, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे बालवयातच मुखोद्गत होत असते. गुरु हे एक व्यक्ती असते. खंर जर पाहिले तर कोणीही असु शकते. व्यक्ती आपल्याला योग्य मार्गदर्शन करते, योग्य सल्ला देते, योग्य दिशा दाखवते, योग्य संस्कार देते इत्यादी. मग तसचं पुस्तकं दुसर-तिसर काय करतात तर यापेक्षा जास्तचं आपल्यला देत असतात.

माणसाने वर्तमानकाळात व भविष्यकाळात आयुष्यात काय करावे, का करावे, काय करू नये हेच पुस्तकंच सांगतात. विशेष म्हणजे पुस्तकामध्ये लिहिलेले ज्ञान, अक्षर हे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही काळात लागु पडते. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवतगीता त्या काळी अर्जुनासाठी जितकी उपयुक्त होती तितकीच ती आजच्या २१ व्या शतकातही आहे.

लेखक जेव्हा एखाद लिखाण करतात त्यावेळी संपूर्ण ज्ञानाचा व शब्दाचा वापर करून लिखाण करतात. पुस्तकं लिहण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपला आयुष्य खर्ची घातलेला आहे. त्यांनी खर्ची घातलेला वेळ व ज्ञान आपण अगदी काही वेळात (आठवड्यात) आत्मसाथ करून घेऊ शकतो. आपण एकलव्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ‘पुस्तकं हेच गुरू’ मानले पाहिजे. पुस्तके गोळा करायला पाहिजे. पुस्तकाचं एक छोटेस खजिना किंवा होम ग्रंथालयच बनवायला पाहिजे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users