पावसा....पावसा....

Submitted by दवबिंदू on 17 June, 2020 - 05:25

पावसा...पावसा...

पावसा... पावसा...
रिमझिम ये...
फुलांना, वेलींना गोंजारत ये.

पावसा.. पावसा...
सरींवर सरी पडू दे...
ओंजळीत पागोळ्या झेलू दे.

पावसा... पावसा...
मुसळधारा बरसू; दे...
बागडणर्‍या मुलांना चिंब भिजू दे.

पावसा... पावसा...
वार्‍याला सोबत घेऊन ये...
धारेत सोडली होडी माझी,
पुढे पुढे जाऊ दे.

पावसा... पावसा..
घे विसावा क्षणभर,
वाटेतला वाटसरू,
सुखरुप पोहचू दे ठिकाणावर.

मग पावसा,
धो धो घारा कोसळू दे...
नद्या, तलाव भरून जाऊ दे...
झरे लहानमोठे खळाळून वाहू दे.

- दवबिंदू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults