आत्मनिर्भर

Submitted by प्रजननविरोधी on 14 June, 2020 - 22:48

KhalBaccha.PNG

श्वेतक्रांतीची प्रौढी शिरावर
स्वाद-चवींची खोड जिभेवर
धार तुपाची वाहे दिनभर
प्रौढ वयाची बाळे सुंदर
सृष्टि तयांची चाले दुधावर
पर-मातांच्या नग्न स्तनावर
वासरांची भग्न कलेवर
शोषणांची कथा निरंतर
मानव अथवा मानव-एतर
परी स्वप्ने ह्यांची, प्रगाढ थील्लर
होणार म्हणे मी आत्मनिर्भर

Group content visibility: 
Use group defaults