मी आणि एकटेपणा

Submitted by तुषार विष्णू खांबल on 14 June, 2020 - 15:49

मी आणि एकटेपणा
शब्दांकन - तुषार खांबल

नावाजलेला कलाकार मी
झगमगाटात या भटकत आहे
कंटाळून या खोटेपणाला
आज फासावर लटकत आहे

खरं तर या जगात मी नाही एकटा
एकटेपणाच्या सोबत आहे
हळूहळू एकएक पाऊल
मरणाकडे चालत आहे

खचलेल्या मनःस्थितीत मी
आत खोलवर रुतत आहे
हसरा जरी चेहरा माझा
तरी आतमधून तुटत आहे

स्वप्नांकडची माझी वाटचाल
हळूहळू मंदावत आहे
जगण्यासाठीची माझी उमेद
त्याच्या सोबत थंडावत आहे

पैसा-अडका, धनदौलत
सारेच होते पाठीशी माझ्या
नात्यांमधली श्रीमंती मात्र
आज नव्हती गाठीशी माझ्या

अवघडलेल्या या
मृत्यूचं माझा यार आहे
त्याला भेटण्यासाठीच आता
गळफास हा तयार आहे

जवळ घेताच ते मृत्यूचे पाश
लक्षात आली माझ्या कलेची साथ
मी आणि एकटेपणा मिळून कलेसोबत
करणार आता नैराश्यावर मात

Group content visibility: 
Use group defaults

Sincere request please change title. Many people are already struggling with mental health issues. Such writing may trigger and push them to the deep end. Write a disclaimer at lease for people to seek help if feeling too sad and at an emotional dead end. Namra vinanti

Done