प्रजातिवाद

Submitted by प्रजननविरोधी on 13 June, 2020 - 22:26

शोषितांच्या यातनांना
द्या जरा ध्यान तुमचे
मुकजीवांच्या आरोळ्यांना
द्या जरा कान तुमचे

बोचताही किंंचीत काटे
वेदनेचे स्तोम तुमचे
सुख घेण्या क्षणभराचे
घेतेलेले जीव त्यांचे

वेगळ्या मातेस झाले
काय हे पाप त्यांचे ?
भोगण्या जन्मास आले
काय ते शाप तुमचे ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users