शालेय विध्यार्थांना ऑनलाइन शिक्षणाची गरज व सवय

Submitted by प्रा. राहुल भिम... on 12 June, 2020 - 12:02

Prof. Rahul Bhimrao Rathod
DELNET- Network Assistant
Mob. No. 9503203695
E-mail: rbbrathod@gmail.com

भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मार्च अखेरपासून अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आला. याचा मोठा अभूतपूर्व परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला. अगोदरच खबरदारीचा उपाय म्हणून देशातील व राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. कोरोना लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रात आलेल्या व्यत्ययाने शैक्षणिक संस्था मधील मुलांना शिक्षण हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. जगात अनेक देशांनी या समस्येवर मात करण्यासाठी प्रसार माध्यमाचा किंवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून झुम, ई-मिटिंग, फेसबुक, व्हिडीओ कॉलिंग, स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, संगकण, व्हिडिओ-ऑडीओ मिटिंग, यूट्यूब, ई-ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय, दूरचित्रवाणी अशाविविध माध्यमांतून मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये. विध्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यातील संभाषण खंडित पडू नये. शिक्षणाची साखळी सुरु राहावी म्हणून विविध शैक्षणिक संस्था अशाप्रकारचे उपक्रम सुरू केले. स्मार्टफोनधारकांमुळे ऑनलाइन वर्गतासिका, गृहपाठ, मिटिंग, ई-वाचनसाहित्य, व्याखाने, कार्यशाळा, परिषेद, अभ्यास/वाचन याचबरोबर फेसबुक, व्हिडीओ कॉलिंग, स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, संगकण, व्हिडिओ-ऑडीओ मिटिंग, यूट्यूब, ई-ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय, दूरचित्रवाणी, सोशल मीडिया, ई-मित्र हे सर्व लोकांच्या सवयीचे किंवा गरजेचे झालेले आहे. आपल्या भारतात खेडेगावापासून तर शहरापर्यंत बरेच लोक किंवा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाद्वारे आपले शिक्षण घेत आहे. सध्या ऑनलाइन किंवा डिजिटल अभियानाचा एक भाग म्हणून अनेक शाळा, महाविद्यालये,विद्यापीठ, विशेष संस्था, संस्था इत्यादी शैक्षणिक संस्था ऑनलाईन अभ्यासक्रम घेणे-देणे, ऑनलाइन वर्गतासिका, ऑनलाइन व्याख्याने, ऑनलाइन मिटिंग, ऑनलाइन कार्यशाळा-परिषद किंवा ई-स्वरूपातील ई-वाचन साहित्य उपलब्ध करून देत आहे. खरेच ऑनलाईन अभ्यासाची शालेय लहान मुलांना गरज आहे का? बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहे. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन (कोचिंग) वगैरे वगैरे पण यात तुमच्या लक्षात येते आहे का? मुले बरेच तासनतास स्क्रीनसमोर आहेत ते आणि त्यामुळे स्क्रीनसाठी मुलं पॅनिक होत आहेत ते. खंर आहे कि लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे. पण काही पालकांनाही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाइन वर्ग तासिका करतात, ऑनलाईन अभ्यास करतात, ऑनलाइन अभ्यास केलेलं शिक्षकांना स्मार्टफोन व संगणकावर पाठवतात, ई-पुस्तके वाचतात, शिक्षकांचे व्हिडीओ व्याख्याने ऐकतात-पाहतात, अशाविविध गोष्टी मुलं ऑनलाइन करतात. त्याचबरोबर समाजमाध्यमावर फोटोही काढतात, एस.एम.एस करतात, ऑनलाइन व्हिडीओ पाहतात, हास्यकथाचे ऑनलाइन व्हिडीओ पाहतात, सेल्फी काढतात, स्वत:च मोबाईल चालु बंध करतात इत्यादी. खंरतर हि कला अतिशय छान आहे. पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय? मुलांचे डोळ्याचं आजार, मानसिक आजार, लठ्ठपणा, जेवण कमी-जास्त करणे, चिडचिड करणे, जास्त नबोलणे, सर्रास स्क्रीनसमोर राहणे इत्यादी होत आहे. खंरतर शालेय मुलांना शिक्षकांची व पालकांची गरजच वाटेनाशी होत आहे. सगळीच माहिती व मनोरंजनाचे व्हिडीओ इंटरनेट व यूट्यूबवर आहे अशी समज दिवसेंदिवस मुलांना होत आहे. कशाला माहिती डोक्यात साठवून घ्यायची असेही मुले सहज म्हणतात. ऑनलाइन शिक्षण पद्धत अतिशय योग्य आहे. मुलांना ऑनलाइन शिक्षण पद्धत अतिशय प्रमाणात आवडत पण आहे. कारण त्यांना नेहमी संगणक, स्मार्टफोनवर राहता येत आहे. त्यामुळे मुलं सर्रास ऑनलाइन अभ्यासात व्यस्त असतात. मुलं दिवसाला ठरलेला अभ्यास काही काळातच पुर्ण करतात. त्यांना आता ऑनलाइन शिक्षण घेतांना व देतांना शिक्षणाची किंवा वाचनाची सवय व गरजेचा धडा लक्षात येत आहे. मुलं खंरतर पहिले पासूनच काही प्रमाणात ऑनलाइन वाचतच होते. फक्त फरक एवडा होता त्यावेळी मुलं अभ्यासव्यतिरिक्त वाचत होते. आज अभ्याससोबतच ईतर ई-साहित्य पण वाचत आहे. याउलट त्यांच्या समोर संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट, फेसबुक, ई-मिटिंग, व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब, व्हिडीओ कॉलिंग अशाविविध साधनांनी लहान मुलांच्या डोक्यात इतक्या झपाट्याने आदळतंय की ती मुलं बिचारी कावरीबावरी झाली आहेत. त्यात आताची परिस्थितीमुळे मुलं २४ तास घरात आहेत. मग मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईल, संगणक इत्यादी प्रसारमाध्यमे आलेच. मुलांच्या कल्पकतेला, सृजनतेला, विचारशक्तीला, स्वातंत्र्यला आपण वेळ देत आहोत का? अनेक तत्त्ववाद्यांचे, शिक्षण तज्ज्ञांचे असे मत आहे. शांततेत अनेक तत्व सृजनता फुलते म्हणुन मुलांना शांतता द्या. त्यांना रिकामा वेळ द्या. त्यांच्या सोबत नवनवीन खेळ खेळा. मुले स्वतःच आपले खेळ निर्माण करतील, विज्ञानाचे प्रयोग करतील, नवनवीन शोध लावतील किंवा नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करतील. खंरतर शालेय मुलं जेव्हा खेळ निर्माण करतात, शोध लावण्याचा पर्यंत करतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने अभ्यासच करत असतात. ऑनलाइन शिकवण्यापेक्षा स्वतःच्या चुकांतून, अनुभवातून, विचारातुन, कल्पकतेतून किंवा मनातुन एकादी गोष्ट शिकण खूप मोलाचे असते. सानेगुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, अब्दुल कलाम यांचे फक्त गोड़वे न गाता त्यांची शिक्षणपद्धती अमलात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. खंरतर मुलांना ई-स्वरूपातील पुस्तके उपलब्ध करून देणे. जेणेकरून मुलं आवडीनुसार व सवयीनुसार वाचन करतील. ऑनलाइन शिक्षणाबरोबरच मुलांना घरात वेळ देणे पण अतिशय गरजेचे आहे. विज्ञान क्षेत्रात, कला क्षेत्रात, ललितकला क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांच्या उत्कर्षाचा पाया त्यांच्या आई वडिलांनी उभा केला आहे. पालक तबलावादक आहेत मुलाला शिकवा, आई छान स्वयंपाक करते तर शिकवा. याचबरोबर अक्षर सुंदर असणे, रांगोळी छान काढणे, कपाट नेटके लावणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, बुद्धिबळ, नवा व्यापार शिकवणे इत्यादी. त्याचबरोबर मुलांना मनाचे श्लोक, गीतापठण, निबंध लेखन, गणित, तुमची मातृभाषा शिकवणे फार गरज आहे. ऑनलाइन पद्धतीने गाणी, नृत्य, अक्टिंग, नक्कल, करायला लावणे. बालक-पालकांनी एकत्र कविता लिहिणे, गोष्ट सांगणे किंवा गाण्याची भेंडी खेळणे इत्यादी. थोडक्यात शालेय मुलांना ऑनलाइन शिक्षण देतांना किंवा घेतांना दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे. त्याच बरोबर त्यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रसारमाध्यमे देणे-घेणे पण गरजेचे आहे. नाहीतर ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या नादात त्यांना स्क्रीन सवय लागु शकते. ऑनलाइन वर्ग तासिका असतांना पालकवर्गांनी त्यांच्या सोबत असणे, त्यांना काही ऑनलाइन तासिकेत अडचण येत असल्यास सोडवणे, त्यांना चांगले ई-साहित्य उपलब्द करून देणे, स्मार्टफोन, संगणकचा योग्य वापर करणे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users