राज ठाकरे, हे सारे काय चालले आहे?

Submitted by Sandy_Joggy on 29 April, 2009 - 15:12

मी मराठी आहे. गेली काही वर्षे सोडली तर मी मुंबईकर ही आहे. माझे माझ्या शहरावर खूप प्रेम ही होते, होते कारण माझे प्रेम होते ती मुंबई निरळीच होती. माझ्या लहान पणची. तो काळ असा होता की दादर टीटी हून आम्ही कुटुंबीय महिन्यातुन २ ते ३ वेळा तरी संध्याकाळी बाबुलनाथ चौपाटी ला बसने जाउ शकायचो. आता असा काळ आणि ती मुंबई ही राहिली नाही. आताची संध्याकाळची गर्दी पाहून कुणी असा विचार ही करायला धजावणार नाही.

तुमच्या मनसे च्या घूसखोरांच्या प्रश्ना मध्ये दम आहे. या आधी ही मुंबई चा यथेच्छा उपभोग घेऊन तिचे वाटोळे करणारे लोक होतेच. मग त्यात राज्यातले राजकारणी होते, दिल्ली कर ही होते, महापालिकेतले राजकारणी होते, सरकारी अधिकारी ही होते. बिल्डर मंडळी विसरून कसे चालेल? पण हा प्रश्न वा प्रॉब्लेम हा आपल्या उम्बरठ्या बाहेर होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता हा प्रॉब्लेम आपल्या अस्तित्वाला आव्हान देण्या इतका मोठा झाला आहे. आता असे म्हणून मी संकुचीत पानने वागतो आहे का? मला काय सेक्युलारीझम समजत नाही का? सारे भारतीय माझे बंधू भगिनी नाहीत का?

महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. अगदी परिपूर्ण नसले तरी इथे कुणाही भारतीयाला सुरक्षीत वाटेल असे तर आहेच. बिमारू राज्यांशी तुलना केल्यास तर स्वर्गच आहे असे म्हणता येईल. अगदी नुकत्याच मुंबई वरील हल्ल्या नंतर सुद्धा. आपण सार्‍या ना या राज्याचा अभिमान आहे. पण आपण आपले राज्य चांगले असल्याची, प्रगत असल्याची किंमत मोजत आहोत का? कुणी विचार करतेय का की इथल्या पायाभूत सुविधा इथल्या गर्दीला साजेश्या आहेत का?
अश्या एका कुटुंबाचा विचार करा ज्याचा कुटुंब प्रमुख ४ जणाना पोसू शकतोय, आणी आता त्याच्या कुटुंबात आपण दर महिन्याला २ माणसे वाढवत गेलो तर त्या कुटुंबाची अवस्था काय होईल? किती दिवस असे कुटुंब धड जगू शकेल? मुंबईची आता अशी अवस्था झाली आहे. आणी पाठोपाठ पुणे, नाशीक सारख्या शहराचीही लवकरच होईल.
खरा प्रॉब्लेम हा आहे की खरे प्रोब्लेम्स कुणीही हताळत नाहीय. कारण या प्रॉब्लेम्स मागे आपल्या राज्यकर्त्यांचे खूप मोठे अपयश दडले आहे.

सगळ्यात मोठे अपयश या बिमारू राज्यांमधील राज्यकरत्याचे आहे. का नाही या बिहारी लोकाना त्यांच्या राज्यात काम मिळत? का नाही या लालू वा मुलायम ने या साठी काही केले? का नाही या लोकाना त्यांच्या राज्यात काही पायाभूत सुविधा पाहायला मिळत? उद्योग धंदे मिळत? आता या अपयशा वर पांघरूण ही घालायला हवे. मग सुरू होते छ्ट पूजेचे राजकारण. राहुल राज च्या मृत्यूचे भांडवल. तेच ते राजकारण मूळ मुद्द्या पासून लोकांचे लक्ष दुसरी कडे वळवण्यासाठी. लोकभावना चेतवाण्यासाठी.
या प्रॉब्लेम चा मुद्दा असेल तर, राज ठाकरे, आम्ही सारे तुमच्या बरोबर असूच. तसे पहिले तर, तुम्ही नुकतेच शिवसेने मधून बाहेर पडळात तेव्हा ही तुमच्या बद्दल खूप सहानुभूती होती. एकटा शिळेदार खिंड लढवतोय असे चित्र दिसत होते. जेव्हा तुम्ही म्हणलात की मी इतर कॉंग्रेस च्या नेत्यांबरोबर रांगेत उभा राहून मॅडम ना सलामी नाही देऊ शकत, तेव्हाही खूप सहानू भूती वाटली होती. पण हळु हळु हा एकटा शिळेदार आपले वेगळेच रूप दाखवु लागला...

खालील प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला समाधान कारक देता आली तर या पुढे ही सारी मराठी जनता तुमच्या मागे राहील.

गेल्या काही वर्षां मध्ये या यूपी वा बिहार च्या लोंढयाला राहायला नव नवीन झोपड्या वा झोपडपट्ट्या का बरे तयार होत आहेत?

या झोपडपट्ट्याना वीज, पाणी कोण पुरवते आहे? हे सारे कायद्या च्या चौकटी मध्ये कोण बसवून घेत आहे?

हे स्थलान्तरीत मजूर हतबल आहेत कारण ते त्यांचे घरदार सोडून आपल्या कुटुंबाचे पोट भरण्या साठी काम मिळवयला इथे आले आहेत. या हतबल मजूरांपेक्शा या सार्‍याला प्रोटेक्षन देणारे जास्ता दोषी नाहीत काय?

आपण या प्रश्णाच्या मुळाशी जाऊन तो समजून घेतला आहे का? त्या मूळ मुद्द्याला कारणीभूत असलेल्यां विरुद्ध कधी आंदोलन केले आहे काय?

हे सारे प्रोटेक्षन देणारे काय उत्तर भारतीय आहेत काय? का यात मराठी ही आहेत?

तुम्ही हा मुद्दा धसास लावण्या साठी इथल्या सरकार विरुद्ध, रॅशन कार्ड्स देणार्यां विरुद्धा, महापालिकेच्या अधीकार्‍या विरुद्धा, झोपडी दादा विरुद्धा, पोलिसां विरुद्धा आंदोलन केले आहे का? मोर्च्या काढला आहे का? प्रचंड कर आणी पैसा मिळवून देणार्‍या मुंबईला या राजकारण्यानी योग्य तो परतावा दिला आहे का?

याना लोन्ढे अडवायचे नाहीत, तर निदान पायाभूत सुविधा तरी पुरेशा दिल्यात का?

तुम्ही या सार्‍या साठी कुणला जबाबदार मानता? याला ही शिवसेना जबाबदार आहे तर तुम्ही त्याच शिवसेनेमध्ये वीस वर्षे काय केले?

तुम्ही मूळ मुद्द्याला बगल देऊन सगळ्यात सोपा मार्ग पत्करला आहे, गरीब आणी असहाय जनतेला वेठी ला धरण्यचा. मारहाण करण्याचा, ज्यातून काही निष्पन्न होणे शक्यच नाही.

तुम्ही शिवसेना सोडून एकाही पक्षाला फारसे डिवचताना दिसत नाही. म्हणजे निवड्णूक संपल्या नंतर कुणशीही हात मिळवणी करायला आपण मोकळे, असे समाजावायाचे काय?

तुमच्या मुद्द्या मध्ये दम आहे पण तुमच्या कृती मध्ये तो दिसत नाही. असेच म्हणवेसे वाटते...

गुलमोहर: 

याला ही शिवसेना जबाबदार आहे तर तुम्ही त्याच शिवसेनेमध्ये वीस वर्षे काय केले? >> पक्षशिस्त पाळली! राज सेनेत होता तेंव्हा त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता हे त्याने (अगदी रडवेल्या चेहर्‍याने) अनेकदा सांगितलेले आहे. त्याला सांस्कृतिक कार्यक्रम जसे, जॅक्सन, आयोग्राफी हे उद्योग करण्यास मुभा होती... आंदोलन कोणते कराय्चे ते ठरवायला बाळासहेब असत, अन ते रास्त होते.
मग पुढे बाळासाहेबांची जागा उद्धव घेऊ लागला तेंव्हा राज ने बाहेर जाय्च निर्णय घेतला......नव्हे, उद्धव च्या महवाकांक्षा जाग्या झालया तेंव्हा राज ला अक्षरशः हाकलुन लावण्यात आले....

अन मनसे ने केलेल्या सर्व आंदोलनांना प्रसिद्धी मिळत नाही, फक्त, अमराठी/प्रांतवादी आग लावता येईल अश्याच आंदोलनाला मेडिया उठाव देतेय. जर दोष द्यायचाच तर तो पीत पत्रकारितेला वा सवंग करमणुकीप्रमाणे चालणार्या न्युज चॅनेल ला जास्त द्यावा लागेल.....

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, अन म्हणुन ह्य अप्रकाराला सेनेचे नगर्सेवक जास्त कारणीभुत आहेत... पन तिकिट देताना होणारी देवाण घेवाण लक्षात घेता.. सेनेचे वरिष्ठ ह्यात काही करु शकतील असे वाटत नाही.

राणे बाहेर पडले तेंव्हा, जर तोंड उघडशील त याद राख, असा दम त्यांनी उद्धव ला दिला, अन म्हणुन उद्धव राणेंवर टिका करताना आजही दचकतो!

असो, मी मनसे चा कार्यकर्ता नाही. पण राज च्या भुमिकेत अन वैयक्तीक प्रश्नात काहीतरी दम आहे असे वाटते म्हणुन हे पोस्ट..... )

>>>> तेव्हा राज ठाकरे कुठे होते?
त्यान्च्यावर भारतभरातून लादलेल्या "फौजदारी दाव्यान्चे" काय करावे याकरता वकिलान्शी चर्चा करीत असावेत बहुधा! Wink
मिरजेत जाऊन "आधीच झाल थोड अन व्याह्यान धाडल घोड" या उक्तिप्रमाणे, नव्याने दावे लावुन घ्यायला हवे होते असे म्हणता काय?

त्यान्च्यावर भारतभरातून लादलेल्या "फौजदारी दाव्यान्चे" काय करावे याकरता वकिलान्शी चर्चा करीत असावेत बहुधा!
मिरजेत जाऊन "आधीच झाल थोड अन व्याह्यान धाडल घोड" या उक्तिप्रमाणे, नव्याने दावे लावुन घ्यायला हवे होते असे म्हणता काय?))))))))) माझ्या म्हणन्याने काय होणार?

>>>> माझ्या म्हणन्याने काय होणार?
त्यान्च (तुम्ही देऊ शकत असलेल) एक मत नक्कीच कमी होणार, अन तुमच्या विचारान्चा/म्हणण्याचा प्रसार झाला तर अजुन मते कमी होणार! Proud

>>>> त्यान्च (तुम्ही देऊ शकत असलेल) एक मत नक्कीच कमी होणार, अन तुमच्या विचारान्चा/म्हणण्याचा प्रसार झाला तर अजुन मते कमी होणार! >>>> हे मात्र नक्कि होणार,

अखन्ड हिन्दुस्थान.................. Happy काय करणार 'तो' भारत घेऊन ? त्यांची प्रत्येकाची १०-१५ पोरं कोण पोसणार ? वेगळा घरोबा झाला ते बरेच झाले... नाहीतर आजच्या आपल्या १०० कोटीत '५५ कोटी' तेच झाले असते........... Happy

ज्यांना राज चा इतका पुळका आहे त्यन्च्यासठी ---
राज चे पोलिटिकल विचार नक्की काय आहेत? ते तुम्हाला माहीत आहेत म्हणून ते चांगले राजकारणि वाटतात का तुम्ही भवनीक आवाहाने बघून ठरवता आहात?

समजा आपण त्यांचे विचार मान्य केले मराठी बद्दल चे , तरी त्या विचारांच्या त्यातल्या त्यात जवळ कुठला पक्ष येतो , कॉंग्रेस की शिवसेना ?

मग याचे नगरसेवक मुंबई आणि पुण्यात कॉंग्रेस बरोबर का बसतात? म्हणजे याना स्वतहाच्या भावना जास्ता महत्वाच्या वाटतात. त्या साठी हे बळि कुणाचा देणार? जनतेचा?

शिवसेना जरी आपण थोडी जबाबदार मानली मुंबई च्या स्थती साठी, तरी त्या मुळे डाइरेक्ट कृपाशंकर शी हात मिळवणी करायची? हे कसले लॉजीक आहे?

म्हणजे आपल्या मुलाने एखादी गोष्ट ऐकली नाही म्हणून थेट शत्रु च्या मुलाला दत्तक घेण्य सारखे वाटते :-). आपल्या मुलाला दटवा, एखादा फटका द्या पण हे म्हणजे ... Happy

१) फारच राग आलेला दिसतोय. इतके भावनिक होऊन राजकारण कराय्चे नसते. भावनेवर लोकांना खेळवायचे असते.
२) नवीन पक्षाचा नवा विचार आहे. सगळे राजकीय पक्षांची उद्दिष्ठे समान असल्याने कोण तरी कुणाच्या तरी जवळ जाणारच....... राज च्या भाषेत, गेली ४० वर्षे राज्याने एकाही नव्या पक्षाला उभे राहताना पाहिले नाही (तो राष्ट्रवादी ला पक्ष मानत नाही) त्यामुळे लोकांना हा तमाशा वाटतो आहे....
३) राज विरोधक आहेत, अन मुंबई अन पुणे त कॉन्ग्रेस ही विरोधक आहे. उलटा प्रश्न विचारु?,,,, सेना मुंबईत वेगळी अन पुण्यात राष्ट्रवादी सोबत का बसलेली आहे? राग येत असेल त उत्तर देणे बंधनकारक नाही.
४) कृपाशंकर अन तत्सम ल्लोकांशी डाइरेक्ट मिळव्णी उद्धव ची आहे, तो एकदम प्रस्थापित राजकारण करतो आहे. लवकरच पक्ष संपवेल असे दिसतेय.

म्हण्जे.. लढाईत, शत्रुचा शत्रु तो आपला मित्र, हे सुत्र असते......... सोप्प्पे आहे.
********************
पवार साहेबांनंतर राष्ट्रवादीचे अन बाळासाहेबानंतर शिवसेनेचे काय जे होईल त्या परिस्थितीत मनसे हेच उत्तर होउ शकेल.......! असा माझा अंदाज आहे.

<<पवार साहेबांनंतर राष्ट्रवादीचे अन बाळासाहेबानंतर शिवसेनेचे काय जे होईल त्या परिस्थितीत मनसे हेच उत्तर होउ शकेल.......! असा माझा अंदाज आहे.>>

चंपकशी सहमत.

शरद

लोकांना केवळ मुद्दा भावत नाही तर त्या मुद्द्याबाबत असलेली कळ्कळ व प्रामाणिकता व आग्रही वृत्ती!
राज ठाकरेकडे ती आहे. शिवाय बदलायला राजला वाव आहे तर शिवसेना बदलली की संपली. म्हणून मनसेला भविष्य आहे. शिवसेना प्रस्थापित पक्ष बनला आहे व अजूनही बाळासाहेबांच्या करिष्म्यावर अस्तित्व टिकवून आहे त्यामुळेच शिवसेनेचे भवितव्य धोक्यात आहे तिच गत राष्ट्र्वादीची आहे. त्यामुळे भविष्यात कॉग्रेस, भाजपा, मनसे व अन्य असेच चित्र राहील
हे आपले माझे मत

अहो इतके त्रयस्थ पणे राजकारणा कडे पाहु नका. शत्रूचा शत्रु म्हणजे आपला मित्र वगैरे पवार साहेबांनी किव्वा च्व्हाण साहेबानी म्हणणे वेगळे आणि सुद्न्य मतदरानी म्हणणे वेगळे. त्याना त्यांचे डावपेच खेळत बासूद्या कारण ते हे सारे सत्तेसाठी करत आहेत. पण निदान आपण तरी मतदारांनी या डावपेचानचे कौतुक करण्यापेक्शा या कडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. मुंबई वा पुण्याचा विचार हे कॉंग्रेस वाले कधीही करत नाहीत. शेतकर्यांचा विचार हे करत नाहीत. याना फक्त आपले सहकारचे नेटवर्क, साखर कारखाने, बँका, पत पेढ्या यातच इंट्रेस्ट आहे.
एक्सप्रेस वे ३ वर्षात कुणि बनवला? ४० ब्रिड्जस कुणी बनवले ५ वर्षात?
आणी गेल्या १० वर्षात किती नवीन इनफ्रास्ट्रक्चर तयार ज़ाले?
यांचा डाव हाच आहे. राज च्या निमित्ताने लोकांचे लक्ष मूळ मुद्द्या वरून दुसरीकडे वळवायचे आणि कॉंग्रेस विरोधी मते फोडायची. बिचारे नव तरूण मतदार सगळ्यात सोपे भुलावयला. त्याना राज ची भाषा भुलवते. मधल्या मधे फायदा कुणाचा ?
डावपेचानचे कौतूक करू नका, देशाचे काय त्या मुळे होते आहे ते पहा.

कालाय तस्मै नम:

मला वाटते यावर काळ हाच एक उपाय आहे Wink
वाट पाहा आणि काय होते त्याला साक्ष राहा. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे इथे नेटवर शब्दांच्या तलवारी चालवण्यापेक्षा प्रत्यक्ष फ़िल्डवर उतरा, काम करा.

वाट पाहा आणि काय होते त्याला साक्ष राहा. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे इथे नेटवर शब्दांच्या तलवारी चालवण्यापेक्षा प्रत्यक्ष फ़िल्डवर उतरा, काम करा.>>

हे अगदी बरोबर बोललात.

मराठी सिनेमांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जर मराठीत डब करण्यात आला तर गाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे असा इशाराच मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ट्विट करत ‘मिशन मंगल’ सिनेमा मराठीत डब करण्यास तीव्र विरोध केला आहे.

-------

पटले नाही, कितीतरी ग्रामीण लोकांना मराठीत सिनेमा समजला असता.

ओरिजिनल मराठीच दाखवायचे, मग रामायण महाभारत हे तरी मूळचे मराठी होते का ?

ह्या सर्व प्रश्नांना मराठी लोक च जबाबदार आहे .
राम मंदिर, पाकिस्तान ,काश्मीर,चीन,,मुस्लिम अतिरेकी असल्या फालतू गोष्टीत मराठी लोकांनी बिलकुल लक्ष द्यायची गरज नाही .
फक्त मराठी हाच विचार असला पाहिजे

कोण किती प्रामाणिक/लबाड आहे हे जनतेला माहीत आहे. जनतेतही गट आहेत आणि ते आपला स्वार्थ साधतात.
राजकारणी नेता मागे पडण्याचे कारण त्याची आईडिआ जनतेला पटली नाही किंवा दुसरे नेतेही या स्पर्धेत आहेत त्यांनी यांना रिंगणाबाहेर ढकलले आहे.
बाहेरचे आत, आतले शहराबाहेर हे फक्त मुंबईसच लागू नाही. जगातल्या सर्व मोठ्या शहरांस लागू आहे. रिओ किंवा शांघाय इकडेही हेच आहे.