एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग तिसरा.

Submitted by अजय चव्हाण on 10 June, 2020 - 05:40

भाग तिसरा - कंन्फ्यूजन

ये रास्ता है केह रहा अब मुझसे..
मिलने को है कोई कही अब तुझसे...

दिल को है क्यु ये बेताबी किससे मुलाकात होनी है..
जिसका कब से अरमाँ था..
शायद वही बात होनी है..

यु ही चला चल राही..
यु ही चला चल राही..

मी मस्त गाण्याच्या ठेकावर मनातल्या मनात डुलत होतो.
गाण्यातले ते शब्द हे कुण्या परक्याचे नसून जणू काही माझ्याच ह्रदयातले आहेत. सूर मनाला भिडत राहीले. शब्दही तालावर झुलत राहीले. बाहेर पावसाची रिमझिम, रस्त्यावरची हिरवळ आणि गाडीतल्या ए.सी.ची गार हवा आणि हे मस्त गाणं ह्यामुळे मनाला खुपच आल्हाददायक वाटतं होतं. असा प्रवास असला तर मी कितीही लांबचा प्रवास करायला नेहमीच तयार असेल.

एव्हाना आम्ही लोणावळा घाट क्रोस केला होता. हिटरलसुद्धा लॅपटाॅप बंद करून बाहेरील नयनरम्य दृश्याचा आस्वाद घेत होती.
दुर खिडकीतून कुठेतरी बघत काय विचार करत होती कुणास ठाऊक? आणि अचानकच तिने माझ्याकडे पाहीलं आणि प्रश्न विचारला.

"हर्षऽऽ तु कधी कुणावर प्रेम केलेस का रे?"

भरधाव गाडी चालू असताना अचानक ब्रेक मारावा आणि आपण वीतभर उंच उडावं. असाच काहीसा उंच तिच्या प्रश्नांमुळे मी उडालो होतो. हिटलरने साधासुधा नाही डायरेक्ट अणुबाॅम्बच टाकला होता. तिच्या एका प्रश्नाने दुहेरी आश्चर्याचा धक्काचा बसला होता मला. एकतर तिने पहिल्यांदाच मला एकेरी संबोधन वापरलं होतं आणि दुसरं म्हणजे "ती" असं काही मला कधी विचारेल असा स्वप्नातदेखिल मी विचार केला नव्हता. तरीही चेहर्यावर कोणतेच भाव न दाखवता मी प्रांजळपणाने "नाही" असं उत्तर दिलं.

का? तिचा पुढचा प्रश्न.

मी एक दिर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिलं -

"प्रेम करायला कुणीतरी असायलं हवं ना? आणि प्रेम असं करता येत नाही ते आपोआप होतं. एखाद्या व्यक्तीला पाहताक्षणीच ह्रद्याच्या तारा झंकारतात आणि तिच्या डोळ्यांत आपोआप आपण ह्रद्य हरवून बसतो. सध्यातरी असं कुणी भेटलं नाही. लेट्स सी आय अॅम वेटींग फाॅर समवन"

खरंतरं मला प्रेम झालचं होतं पण इतक्या लवकर कुणालाही ते सांगणं आणि खासकरून हिला सांगणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी वेळ मारून नेली.

"ओह!! भलताच राॅमेंटीक आहेस.."

आपल्या ओठांचा चंबू करत गोल मान फिरवत ती म्हणाली..

खरतरं आता मलाही तिला तोच प्रश्न विचारावासा वाटतं होता पण विचारू की नाही ह्या संभ्रमात मी अडकलो होतो पण एकंदरीत तिचा मूड बघून मी डेंरींग केलीच.

"मॅडम..तुमचं प्रेम वैगरे..." चाचरतच मी विचारलं..

"नाही!! मला काय वाटतं माहीतये का? तु म्हणतो तसं पाहिल्यावर तसं वाटणं आर्कषणही असू शकतं ना. आय थिंक खरं प्रेम असं सहवासातून होतं. स्वभाव, आवडीनिवडी, मने जुळली की प्रेम होतं आणि तेच प्रेम परिपक्व असतं. एकमेकांना ओळखणं महत्वाचं वाटतं मला आणि गाॅड नाॅज आपल्या आजूबाजूलाच असतात अशी माणसं किंवा असू शकतात फक्त त्यांना ओळखायला हवं. उगाच आपण कल्पना करून इतर ठिकाणी किंवा स्वप्नांत त्यांना शोधत राहतो. तसंही म्हणतातच ना, तुझं आहे तुझपाशी परी तु जागा चुकलासी" - कुठेतरी हरवत ती म्हणाली.

अशाच प्रेमाविषयी आपआपली मते आणि त्याविषयीच्या आमच्या गप्पा चांगल्याच रमल्या होत्या. आज पहिल्यांदाच का कोण जाणे ज्या नयनाला मी ओळखतो ती " ही" वाटतचं नव्हती. "ती" अशीही असेल हे मला माहीतच नव्हतं. मनमोकळेपणाने बोलणारी, काहीशी हळवी आणि मुख्य म्हणजे ऐरवी रूड वाटणारी ती आज मला साॅफ्ट स्पोकन वाटतं होती. गप्पा आणि विचारांच्या नादात पुणे कधी आलं हे कळलंच नाही. .
..............................................................................................................................................................................

काही काही माणसं कधी कधी खूप कन्फ्युज करतात मला..
त्यांच बोलणं वेगळं, त्यांच दिसणं वेगळं आणि असणं तर खुपच वेगळं. आउटर कॅरेक्टर वरून आपण काही आराखडे बांधत असतो आणि त्यानुसार आपण काही गृहीतके ठरवलेली असतात पण कधी कधी त्यांच असं इनर वेगळचं कॅरेक्टर समोर येतं आणि ठरवलेली गृहितके कोलमडू लागतात आणि मग कंन्फ्यूज व्हायला होतं. असचं काहीसं कन्फ्युजन मला मॅडमच्याबाबतीत झालं होतं. काल गाडीत ती माझ्याशी एखाद्या जिवाभावाच्या मैत्रिणीने बोलावं अगदी तशीच ती माझ्याशी बोलत होती. कदाचित कामाच्या व्यापात तिला कधी व्यक्तच होता आलं नसेल किंवा ती व्यक्त होत नसेल. काल ती चुकून माझ्यासमोर व्यक्त झाली. मी विचार करत होतो. तिच्या मनात नक्कीच काहीतरी माझ्याविषयी होतं..तिने मलाच का इथे येण्यासाठी निवडलं? त्यादिवशी माझ्याऐवजी दुसर्‍याने हात पकडला असता तर कदाचित तिने तिथेच त्याच्या कानाखाली आवाज काढला असता पण मला फक्त तिने कॅबिनमध्ये घेऊन थोडे सुनावले होते. नदिकिनारी सूर्यभक्त सूर्याला अर्घ्य देऊन सूर्याची पूजा करतात वरून जाणार्‍या कावळ्याला वाटतं की लोक आपलीच पूजा करत आहेत. कदाचित माझंही त्या कावळयासारखं झालं असेलं. कदाचित असं काहीच नसेल. नुसतेच मनाचे खेळ हे सारे..

नोंद: भाग थोडा छोटा झालाय हे मान्य आहे पण भाग योग्य पाॅईंटवर संपायला हवेत म्हणून थोडं आवरतं घेतलं आहे.

कथेचे सर्व हक्क अबाधित

क्रमशः

images (7).jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

छोटा तर झाला आहेच पण तुमची इच्छा.... पण पुढील भाग जरा लवकर येउ द्या.... फिट्टमफाट...
क्षमस्व... शाखा नाही आवडत. (चक दे आणि स्वदेस मध्ये खुप आवडला ही गोष्ट वेगळी )

अज्ञातवासी : धन्यवाद तु दिलेली सूचनेचा विचार करून..पुढचा भाग त्या पद्धतीने लिहेल.

तायडे: जवळजवळ जाणारं करेक्टर आहे हे मान्य पण इतक्या लवकर गेस नको करूस. पहिल्यांदा लव्ह ट्रॅगलवर फोटो हवा होता तेव्हा काजोल आवडते म्हणून कुछ कुछ होता हैचा टाकला होता.. परत नंतर त्याचचं स्वदेसमधलं गाणं आहे म्हणून हा फोटो टाकला

नौटंकी: धन्यवाद तुम्ही सगळ्या भागांवर आवर्जून प्रतिसाद देतायेत. चांगल वाटतं.

धन्यवाद उर्मिल ताई.

धन्यवाद रूपाली.

धन्यवाद आबासाहेब.

धन्यवाद प्रविण : हो नक्की. पुढचा भाग मोठाच लिहणार आहे.
शाखा मलाही फारसा आवडत नाही .. स्वदेस, चक दे, डिअर जिंदगीत आवडलेला. पहिल्यांदा लव्ह ट्रॅगलवर फोटो हवा होता तेव्हा काजोल आवडते म्हणून कुछ कुछ होता हैचा टाकला होता.. परत नंतर त्याचचं स्वदेसमधलं गाणं आहे म्हणून हा फोटो टाकला.

महाश्वेता धन्यवाद : डोन्ट वरी पुढच्या भागात दिसणार नाही..ह्या भागात टाकलाच आहे तर चालवून घ्या.

कथा वाचली नाही. मी क्रमशः कथा पुर्ण होण्याआधी वाचत नाही. शाहरूख गूगल केले आणि ईथे आलो Happy पण आता शाहरूख दिसलाय तर पुर्ण झाल्यावर हि वाचावीच लागणार असे दिसतेय. Happy

कटप्पा प्रतिसादासाठी धन्यवाद. अमोल पालेकर?? Happy

बाय दवे प्रेम हे कधीच मिडल क्लास, लाॅ क्लास नसतं... प्रेम हे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं..पाडगावकर सांगून गेलेत..

ऋन्मेऽऽष नक्की वाचा आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

बाय दवे प्रेम हे कधीच मिडल क्लास, लाॅ क्लास नसतं... प्रेम हे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं..पाडगावकर सांगून गेलेत..
>>>
इसके लिये एक लाईक तो बनता है Happy

छान चालू आहे .
नयना काजोल आणि गौरी राणी असे वाटतेय.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

अजयजी
वाचतोय . छान आहे , किती भाग आहेत?

धन्यवाद अज्ञा.

धन्यवाद निलिमा, गौरी नयनाची मैत्रीण आहे स्टेशनवरची "ती" गौरी नाही..

धन्यवाद बिपिनजी.