प्रेमाची फळं!

Submitted by चंद्रमा on 8 June, 2020 - 12:57

सखे इतके दिवस आपण घालवले सोबत
पण तुला नाही कळली माझ्या प्रेमाची कुवत!
आता तू तोडला माझ्याशी संबंध,
म्हणून घातले स्वतःवर निर्बंध!!

प्रिये तू आता एक काम करशील का.....
माहित आहे का तुला तुझ्यासोबत राहता-राहता!
मि घातला बराच पैसा खर्ची
आता माझ्या तोंडाला लागली आहे मिरची!!

त्यातले तू काही परत करशील का?
कॅन्टीन च्या समोस्याचे राहू दे
पण रेस्टॉरंट मधल्या पिझ्झाचे परत करशील का?
कोल्ड्रिं्स चे हवे तर राहू दे
पण पाइन ऍपल शेक चे परत करशील का?

तुझ्यासोबत राहून मी पुरता झालो कंगाल,
झालो आता वेडा-पिसा अन् वेड बंगाल!

हे प्रिये वाईट वाटून घेऊ नको,
दुनियादारित उतरलो आहे मी जसा!
मी दिसतो असा तसा
पण मला समजू नको तसा!!

अल्पेनलीबे चे राहू दे,
पण कॅडबरी चे परत करशील का?
स्लीपर चप्पल चे राहू दे,
पण पेन्सिल टोक संडल चे परत करशील का?

गुलाब पु श्पाचे असू दे,
पण बुके चे परत करशील का?
नाटकाचे वाटलं तर नको देऊ,
पण मल्टिप्लेक्स मधल्या पिक्चर चे परत करशील का?

काय करू प्रिये
हीच तर आहे जगाची रित!
मी जीवापाड प्रेम केले तुझ्यावर,
पण तुला नाही कळली प्रीत!!

लिपस्टिक चे राहू दे,
पण परफ्यूम चे परत करशील का?
रुमालाने राहू दे पण,
जीन्स आणि टॉप चे परत करशील का?

अश्या मी बऱ्याच वस्तूंची केली लिस्ट,
प्रेमामध्ये असते अशे बरेच ट्विस्ट!
का करावा मी प्रेमाचा विषाद;
जीवनाचा आनंद लुटावा मनमुराद!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हाडळीचा आशिक' मोलाचे म्हणजे त्यांनी वेळात वेळ काढून ही कविता वाचली आणि एक आपल्या विचारांची पिंक दिली.म्हणून आभारास्तव मोलाचे बोललो!
आणि तुमचे पण आभार काळजीपूर्वक प्रतिसादाचे निरीक्षण ‌केल्याबद्दल!

Pages