खेळ

Submitted by VidulaM on 6 June, 2020 - 06:40

कैसा तुझा खेळ, सांग विठूराया
युगांची वहिवाट आज नाही

आस तव दर्शनाची, रुजलीसी खोल
डोळ्यांचे पारणे फिटणे नाही

रम्य पालखी सोहळा, भक्तीचा सागर
ज्ञाना-तुकोबांची परी भेट होणे नाही

रिंगणात धावण्या अश्व तो आतुर
वेगास त्याच्या "ती" गती नाही

वाळवंटी जमतसे संतांचा मेळा
चंद्रभागे स्नानाचा योग मात्र नाही

गर्जतसे राऊळ, नामाचा गजर
पंढरी अवघी आज सूनीच राही

घालतो साकडे तुला गे माऊली
घेई सर्व अमुचे अपराध पोटी

फिटू दे मळभ, सुर्योदय नव आशेचा
नव्याने वारी सामोरी येई

विदुला

Group content visibility: 
Use group defaults