सत्यवानाची वटपौर्णिमा (लघुकथा)

Submitted by तुषार विष्णू खांबल on 5 June, 2020 - 15:57

सत्यवानाची वटपौर्णिमा
शब्दरचना - तुषार खांबल

आज सकाळपासून मिहिरची लगबग सुरू होती. बाजारात जाऊन त्याने वडाची फांदी, पूजेला लागणारी फळे आणि इतर साहित्य खरेदी केले. सर्व खरेदी झाल्यावर ती घरी आला.
घरी आल्यावर सर्व सामान एका बाजूला ठेवून तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. फ्रेश होऊन त्याने कपाटातील नवीन शर्ट काढला. मागच्याच महिन्यात वाढदिवसासाठी मनिषाने त्याला गिफ्ट केला होता. तयार होऊन त्याने मोबाईल सुरू केला आणि वाटपौर्णिमेच्या पूजेचे व्हिडिओ पाहू लागला.तसे तर तो मागील १०-१२ दिवस काही नीटस जेवला नव्हताच; पण आज त्याने मुद्दाम उपवास ठेवला होता.
काही वेळाने उठून त्याने खिडकीतील तुळस घरात घेतली. त्यात आणलेली वडाची फांदी रोवली. इतर पानांवर फळे ठेवली. यूट्यूब वर पाहून त्याने त्या वडाची पूजा सुरू केली. सात फेरे त्याने पूर्ण करून वडाला आणि देवाला हात जोडले. इतक्यात त्याचा फोन वाजला.
हॉस्पिटल मधून कॉल आला होता. मानिषाची आजची शेवटची कोरोना टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आली होती. पुढील दोनच दिवसात तिला डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात येणार होते. या सत्यवानाची ही वटपौर्णिमा आज सफल झाली होती.

Group content visibility: 
Use group defaults

ओके!

छान ..

>>>त्याने त्या वडाची पूजा सुरू केली. सात फेरे त्याने पूर्ण करून वडाला आणि देवाला हात जोडले. >>>> मला वाटलेलं की उलटे फेरे घातले की काय.