प्रेम करावं

Submitted by तुषार विष्णू खांबल on 3 June, 2020 - 14:47

प्रेम करावं

शब्दरचना :- तुषार खांबल

प्रेम करावं
पावसाचं जसं मातीवरचं
भेटताच मनाला सुगंध देणारं

प्रेम करावं
नदीचं जसं सागरावरचं
मिलनासाठी वेडीवाकडी वाट शोधणारं

प्रेम करावं
वेलीचं जसं झाडावरचं
घट्ट मिठीत धरून ठेवणारं

प्रेम करावं
भक्ताचं जसं देवावरचं
एका दर्शनासाठी आसुसलेलं

प्रेम करावं
शिंपल्याचं जसं मोतीवरचं
स्वतःच्या हृदयात जपून ठेवणारं

प्रेम करावं
लेखणीचं जसं कागदावरचं
जवळ येताच मनातलं व्यक्त होणारं

प्रेम करावं
माझं जसं तुझ्यावरचं
अव्यक्त तरीही अस्तित्व असणारं

Group content visibility: 
Use group defaults