पहिला पाऊस

Submitted by द्वैत on 2 June, 2020 - 07:31

पहिला पाऊस

अजूनही मी तोच तराना का गुणगुणतो
खिडकीमध्ये जेव्हा पहिला पाऊस येतो

क्षणभर करतो कामे सगळी बाजूला अन
गरम चहाचा घोट जरा रेंगाळत घेतो

भिजतो जेव्हा पहिल्यावहिल्या पावसामध्ये
असे वाटते पुन्हा नव्याने पावन होतो

वठलेल्या खोडाला फुटते नवी पालवी
तशी मनाला नवी उभारी पाऊस देतो

कुठे वयस्का परी स्तब्धता मिळे तलावा
कुठे लहान्या परी प्रवाह खळखळ वाहतो

खुशाल ठेवा तुम्ही अत्तरे कुपीत तुमच्या
मृदगंधाची उधळण पहिला पाऊस करतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users