शरीरातला भ्रष्टाचार आणि तब्येतीवरचा अत्याचार

Submitted by उडन खटोला on 2 June, 2020 - 00:57

आपण काही खाल्लं तरी शरीराला 'ए.टि.पी.' म्हणजेच 'अडिनोसिन ट्राय फॉस्पेट' हे ऊर्जेच्या स्वरूपात लागते. 'एटीपी' याला आपल्या शरीराची "एनर्जी करंसी" असे संबोधले गेले आहे. ह्याला मी 'खरी कमाई' म्हणतो अथवा "व्हाईट मनी". वाचत रहा तुमच्या लक्षात येईल कि घामाचा पैसा म्हणजे काय. तुम्ही काही खा, शरीराचा प्रयत्न असतो कि त्याला 'ग्लुकोज'च्या पातळीवर आणून रक्तात मिसळुन देणे, व त्यापासून 'एटिपी' तयार करणे. गहू, ज्वारी, भाकरी, तांदुळ, भात काही खाल्लं जिच्यामध्ये 'स्टार्च' आहे त्याचा 'ग्लुकोज' होणारच. सोबत प्रथिने (प्रोटिन्स) महत्वाचे म्हणून कडधान्य, पालेभाज्या सोबत खाव्या लागतात . जास्त ग्लुकोजला नियंत्रित ठेवण्यासाठी शरिरातील दुसरे रसायन म्हणजे 'इन्सुलिन'. शरीरच तसे बनलेले आहे आणि रक्तातलं 'ग्लुकोज'च आपण डायबिटीज कंडिशनमध्ये तपासतो.

जास्त खाल्ल्यावर जास्त ग्लूकोज तयार होणार, व आवश्यकतेपेक्षा जास्त जमा झालेले ग्लुकोज हे तुमच्याच शरिरातली तुमचाच "ब्लॅक मनी". त्याच वेळेला 'पॅन्क्रियाज' ह्या अवयवातुन इन्सुलिन हे रसायन तयार होऊन जास्तीच्या ग्लुकोजला इन्सुलिन 'लिवर' नावाच्या 'कोऑपरेटिव बँकेत' पाठवायला सुरुवात करते. इथे खरी मजा आहे. इन्सुलिन, "ब्लॅक मनी" साठवण्यासाठी फक्त 'लिवर' च्या बँकेवरच अवलंबुन न राहता, शरीरातले वेगळे वेगळे अवयव (वेगवेगळ्या बँकेत खाते) आणि महत्त्वाचे म्हणजे, आपली पहिल्यापासून सुलभरित्या उपलब्ध व प्रिय 'स्विस बँक' म्हणजे 'अडीपोज टिश्यु' इथे आपल्या शरीराचे 'ब्लॅक मनी' साठवतो. एखाद्या अतिजाड माणसाला बघितला तर जिथे जिथे जाडी आहे तिथे तिथे त्याच्या 'ब्लॅकमनी' साठलेल्या बँका दिसतात.

गुगलमुळे आज कोणीही जास्त शुगर म्हटंल कि लगेच इन्सुलिनशी इतक्या सहजरित्या जोड्या लावतात जसेकी मोझार्ट आणि संगीत. पण इन्सुलीनचे काम इतक्या सोप्या आणि सहज रित्या शरीरात असले असते तर मेडिकल सायन्सला काही कामच राहिले नस्ते व मोजार्ट सगळ्यांनाच कळाले असते. इन्सुलिन जेव्हा आपले 'ब्लॅक मनी' म्हणजे शुगर ~ 'लीवर' कडे पाठवतो तेव्हा लिव्हर ते कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपात साठवून ठेवतो, व शरीराला जेव्हा उपवासाचे वेळेला शक्ति लागते तेव्हा हेच 'एस्ट्रा शुगर' रक्ताला परत करतो, पण त्याची सुद्धा एक क्षमता आहे. जास्त उपवास केल्याने व बेशिस्त आणि अनियमित खाल्ल्याने जास्त ब्लॅक मनी साठवून जाड होण्याची दाट शक्यता आहे ते मी पुढे सांगणारच.

सहजासहजी जेव्हा पेशींपासून लिव्हरमध्ये हा ब्लॅक मनी जातो, तेव्हा त्याला नेणारे कुरिअर कंपनीचे नाव अाहे "एच.डी.एल", साहजिकच त्यांना "गुड कोलेस्ट्रॉल" असे आपण म्हणतो. पण लिव्हरची एक मर्यादा आहे आणि त्याच्या पलीकडे तो सुद्धा ओव्हर झालेली ब्लॅक मनी परत पाठवण्यासाठी स्वत:ची एक हवाला कुरिअर कंपनी चालवतो ज्याचे नाव आहे "एल.डि.ल". काळा पैसा रक्तात परत आला की त्याला आपण म्हणतो "बॅड कोलेस्ट्रॉल". डायबिटीज वाल्यांनी जेव्हा कोलेस्ट्रॉल तपासणी केली तेव्हा या दोन्ही कुरिअर कंपनीचे रिपोर्टवर नाव, गाव, पत्ता व काम छापुन येतेच, तपासुन बघा जरा. ट्रान्झॅक्शन लिमिट्स ठरलेले आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे.

आता इन्सुलीन, चोर बाजारी करणा-या सारखे, फक्त एकाच कंपनीवर अवलंबून राहत नाही. जे जास्त अतिश्रीमंत असतात म्हणजे जास्त 'कचरा' खातात, रागवू नका "कचराच" म्हणतोय मी कारण, मागच्या १५ दिवसांपासुन बेंगळुरु विद्यापिठात, इथल्या शास्त्रज्ञांना व संशोधकांनां मी ऐकत बसलो आहे, फार तळमळीनं सांगताहेत ते आणि मी जेव्हा त्यांना विचारले की चांगल्या आरोग्य व आहाराचा मंत्र काय? तर त्यांनी फक्त एका ओळीमध्ये सांगितलं ~ "ईट लेस लिव मोर". बात कु समझो बांगडु. तर जे जास्त 'कचरा' खातात व जास्त "ब्लॅक मनी" जमा करण्याच्या नादात जगतात, ते काय त्यांचे सिद्धांत कि "एक दिन सबकु मरनेकाच है" ~ बरोबरच अाहे, कारण त्यांच्याकडे स्विस बँकचे 'लाईफ मेंबरशिप असतो आणि त्याच्यात कोलेसटेरॉल भरुन "अडीपोस टिश्यु" तैयार करित राहतात. आता प्रश्न आहे कि हा "अडीपोस टिश्यु" शरीरात कुठे कुठे आहे ~ हा शरीराच्या त्या प्रत्येक भागामध्ये आहे जिथे तुमची चरबी कमी होत नाहीये. स्वतःला चिमटे घेऊन बघा जरा.

छोटी चाचणी सांगतो करून बघा. दोन्ही हातांच्या बोटांचा चिमटा करा व आपल्या कमरेचा नंतर सामोरुन पोटाचा चिमटा घ्या. चाळीशीनंतर कितीही 'सिक्स पॅक' 'एटपंँक' वाला असला तरी चिमट्यात काहीतरी बसतच आणि जे आणि जितकं बसतंय ते आहे तुमच्या शरीराचा 'ब्लॅक मनी' म्हणजे 'अडिपोज टिश्यु', आणि हो बायकासुद्धा आले बरं का ह्या धंद्यात. गम्मत सांगू का बापहो, तुम्ही मेले तरी ही 'अडिपोज टिश्यु' जात नाही कारण ते तुमच्या शरीराचा एक अवयव बनून गेला आहे. चाळीशीनंतर अतिव्यायामाने फक्त ह्या ब्लॅक मनीला छोटासा आकार देता येतो पण काढता येत नाही. तांत्रिक दृष्ट्या कुतर्क करायचेच असले तर हो ते काढता येईल, त्याला मरणाचा उपवास करावा लागेल, ज्याला मी "अण्णा हजारे मॉडेल ऑफ फ़ास्टिंग" असं म्हणतो जिथे शेवटी हा "अडिपोज टिश्यु' व माणूस दोन्ही मरून जातात. चाळीशी नंतर काहिपण केल्याने ढेरी कमी होत नाहि (अन होणार बी नाय~माईंड ईट) ह्याचे कारण हेच "अडिपोज टिश्यु". भरोसा नाय तो गुग्गल करो ना!

आता जरा मोजार्टचा संगीत बघूया. इन्सुलिनला फक्त शुगर डाऊन करणे एवढेच काम नाही, त्यो फार कलाकार हाय. अरे हो ते "डाऊन करणं" हे सुद्धा चुकीचं आहे बरंका. ते 'डाऊन' किंवा 'अप' असं काही करतच नाही तर, फक्त वेगळ्या वेगळ्या जागी ते साठवून ठेवत असते. जास्त झालेला शुगर पाहिले 'लिवर'कडे नंतर सर्व "अडिपोज टिश्युं" मध्ये आणि नंतर वेगळ्या वेगळ्या अवयवात आणि नसलंच तर रक्तातच, and then! ऑल फिनिश.

इन्सुलीनची दुसरी बदमाशी म्हणजे लिव्हरला शुगरचे चरबीमध्ये रूपांतर करण्यासाठी लाच देणे, आणि लिव्हरच तसं करणे, अन तुम्ही फ़क्त खात जा, आई मिन बघत जा. इन्सुलिनची तिसरी महत्त्वाची बदमाशी म्हणजे 'अडीपोज टिश्यू' मधल्या चरबीचा रूपांतरण परत ग्लुकोजमध्ये न होऊ देणे, म्हणजे वाढलेली चरबीला मरेपर्यंत वाढलेलीच ठेवणे. अौर खाओ ठाकुर, खुब खाओ, आखिर जीना किसलिये?

आता शेवटचा भाग ~ जर तुम्ही व्यवस्थित आणि नियमित खाल्लं, तर इन्सुलीन हा रसायन हिरो 'विजय' अमिताभ बच्चन सारखा आहे. अन जंक फूड, अनियमित अथवा अति जास्त खाल्लं तर तो अचानक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सारखा होतो. तुम्ही खाल्लेल्या व न खाल्लेल्या प्रत्येक आहाराचा हिशोब तो ठेवतो. जास्त उपवास व अनियमित खाल्ल्यावर अता खरी बदमाशी 'लिव्हर' करतो. हो "बंबई का डॉन कोण तो भिकू म्हात्रे" असा म्हणतो आणि तो अचानक 'इन्सुलिन'चं ऐकणं बंद करतो व स्वतः 'एलडीएल' सगळीकडं पाठवायला सुरुवात करतो. मग काय अपली नुसती बोंबा बोंब, स्वत:ला चकरा, नंतर डॉक्टरकडे चकरा, स्वत:ला सोडुन डॉक्टरला शिव्या, हा डॉक्टर बरोबर नाही, ते डॉक्टर बरोबर नाही इत्यादी इत्यादी. डॉक्टरला काय बोडकं कळणार आहे कि आपण किती खाल्लं अन काय खाल्लं, पिलं ते. हे तर आपण सांगतही नाही डॉक्टरांना.

असेच पस्तीशी चाळीशी गाठली कि बीपी शुगर च्या गोळ्या, हार्टच्या गोळ्या घेत बसून आपण फार्मास्युटीकल कॅपिटल, डायबिटीक कॅपिटल होऊन सांगत फिरू की हम है इंडिया, दुनिया में नंबर वन. अन न मरता उरलेच तर पारितोषिके द्यायला युनेस्को आहेच की. अरे मी म्हणतो शारीरिक काम करा व घाम काढा आणि हे सर्व दूर करा. घाम गाळल्याने ग्लुकोजचा एटीपी होतो जी आपली खरी ऐनर्जी करंसी आहे. घामाचा पैसा म्हणजे हेच ....!

हरी ओम !

( आधारित )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dhanyawad

लेखन शैली अतिशय उत्तम.
तुमच्या सारखं डॉक्टर रुग्णाला समजून सांगायला शिकले तर भारत हा स्वस्थ भारत होईल.
सर्व रोगापासून मुक्त

थोडक्यात व्यायाम हा एकमेव उपाय.

मी आत्ता वयाच्या तिशीत आहे. मी आत्तापासून चांगल्या आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी व्यायामाव्यतिरिक्त?