प्रेमपाऊस

Submitted by तुषार विष्णू खांबल on 1 June, 2020 - 16:51

प्रेमपाऊस

शब्दांकन : तुषार खांबल

भरून आलं आभाळ, मी सावरून बसलो,
हातामधली सर्व कामे, आवरून बसलो

ढग आणि विजेचा, सुरु झाला सुरेख खेळ
भिजावं कि राहावं असंच, मनात सुरु घालमेल

गडगडाटाच्या नादासंगे, थेंब बरसू लागले
न राहून माझे मन, भिजाया तरसू लागले

खिडकी मधुनी पाऊस पाहताना, नजरेस ती दिसली
काय सांगू मित्रांनो, मनात घर करून बसली

नजरेस नजर भिडली, काळीज खलास झाले
क्षणार्धात मन माझे, प्रेमपावसात न्हाले

Group content visibility: 
Use group defaults

छानच कविता. काल इथे अगदी रोम्यांटिक वातावरण होते. मायबोलीवर आपले स्वागत. अजून लिहीत चला.