चारोळ्या

Submitted by Snehalata on 31 May, 2020 - 01:19

चारोळ्या

1) आयुष्यही कधी
स्वप्नागत जगावे
ओहोटी असताना वाळूवर उमटून
भरतीच्या प्रवासात मिटून जावे

2) असंख्य वळणे अनेक घाट
कधी खोल डोह
तर कधी सोनेरी काठ
हीच तर खरी जीवनाची वाट

3) मैत्री म्हणजे जणू
अळवावरचा मोती
कळलं त्याच्यासाठी सोनं
नाही कळलं तर माती

4) प्रेमाचे बंध जुळतात
कळत नकळत
खरच सांग तुला नाही कळत
कि कळून नाही वळत

5) वादळं सर्वांवरच येतात
हा नशिबाचा नाही रोष
तुला टिकताच येत नाही
यात वादळाचा काय दोष

स्नेहलता

Group content visibility: 
Use group defaults