किन्नर

Submitted by रूपाली विशे - पाटील on 27 May, 2020 - 10:21

किन्नर

नाही आम्ही आनंदाने
नाचवित तुम्हां पुढे हाथ
मजबूर आम्ही पोटासाठी
जेव्हा दैवानेच नाही दिली साथ

स्पर्श आमचा तुम्हांसाठी
जणू अंगावर पडलेली पाल
नशिबाने दिला धोका अन्
निसर्ग खेळला उलट चाल

यल्लमाचे भक्त आम्ही
आनंदाने तिला वंदती
असे निर्दयी जग तुमचे
मुखी आमच्या आम्हां निंदती

सोहळ्याच्या तुमच्या लागे
तुम्हां गोड आमची वाणी
क्षणभंगूर असे सन्मान तो
जणू काही अळवा वरचे पाणी

तुम्ही म्हणता किन्नरांचा
वंगाळ असे शाप
तरिही डसायला आम्हां
लपलेत समाजात जहरी साप

निसर्गाने केले नकळतपणे पाप
देवा... हा किन्नराचा जन्म गेला वाया
पुर्नजन्मी तरी घाल माझ्या
झोळीत संपूर्ण न्यायाचे माप

सौ. रूपाली गणेश विशे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कविता तर छान आहेच
पण त्याहून ही समाजाची तृतीय पंथी लोकांकरीता असलेली वागणूकिच खूप चांगलं वर्णन केले तुम्ही

सोहळ्याच्या तुमच्या लागे
तुम्हां गोड आमची वाणी
क्षणभंगूर असे सन्मान तो
जणू काही अळवा वरचे पाणी

व्वा छान.......