आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं

Submitted by मनोजकुमार देशमुख on 26 May, 2020 - 03:37

हातात हात धरून
अक्षर गिरवणारं
यशाच्या आनंदात
पाठीवरून हात फिरवणारं
आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं

आनंदात आपल्या
एकरूप होत हसणारं
गालावरचे अश्रू
हळुवार पुसणार
आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं

ज्याच्या जवळ मनातलं
सार बोलता येईल
जीवनाचं पुस्तक
बिनधास्त खोलात येईल
आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं

श्रावणाच्या पावसात
सोबत भिजणारं
प्रेमाच्या ओलाव्याने
कुशीत येऊन निजणारं
आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं

म्हातारपणी सोबतीला
काठी बनून चालणारं
मेल्यावर प्रेताच ओझं
खांदयावर पेलणारं
आयुष्यभर माणसाला कोणी तरी हवं असतं

Group content visibility: 
Use group defaults