एक ज्योत विझताना...

Submitted by दवबिंदू on 24 May, 2020 - 08:41

एक ज्योत विझताना..

एक ज्योत विझण्याआधी...
क्षणभर थरथरली.
उरलंसुरलं तेलवात एकवटून...
किंचित मोठी झाली.
लख्ख त्या उजेडात...
जिवलगांचे चेहरे...
अखेरचे डोळ्यांत साठवून घेत
शांत झाली.

- दवबिंदू

Group content visibility: 
Use group defaults