ती रात्र

Submitted by सचिन चंद्रकांत ... on 23 May, 2020 - 12:50

.... ती रात्र ....

चांदण्याच्या रात्री,
स्वप्न मी बघत होतो...

का कोणास ठावूक,
मी आज तिला बघत होतो...

रात्रीच्या त्या अंधारात,
मी उघड्या डोळ्याने तिला रेखाटत होतो...

काळ्याकुट्ट प्रकाशात,
मी माझ्या स्वप्नांचे रंग भरत होतो...

ना होती तिची नि माझी ओळख
पण त्या रात्री मी तिला,
स्वप्नात माझ्या बघत होतो...

✒️सचिन चं लावणे....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही यापेक्षा चांगले लिहू शकता असे तुमच्या वरील चार ओळी पाहून वाटले. अजून थोडी मेहनत घ्या. तुमच्यात पोटेंनशियल दिसते आहे.

तुम्ही दिलेल्या सूचनांचा नक्की विचार करतोय, लिहण्याचा प्रसंग पहिलाच आहे तरी तुम्ही मला योग्य त्या कंमेंट देऊन प्रोत्साहन वाढवत आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार...

छान!
लिहित राहा..

काळ्याकुट्ट प्रकाशात>>>
इथे प्रकाशात ऐवजी प्रदेशात म्हणायचं आहे का?

छान! छान!!
एखादी दणदणीत कथापण येऊ द्या आता.