दुष्टचक्र

Submitted by Varsha sahane on 22 May, 2020 - 05:04

संकट कोरोनाचे
----------------------

निःशब्द झाले सारे
पसरली करूण शांतता
दृष्ट नजर कुणाची
लागली या सुंदर जगता

सुखाने बागडणारे जग
दृष्टचक्रात सापडले
जणू काही उमललेले
फुल कोमेजून गेले

पसरला इतका रोग की
कशानेच रोखता येईना
भावनिक आव्हान करूनही
जनता मनावर घेईना

पोलीस लेकरं बाळ सोडून
कामावर आले
डॉक्टर, नर्स जनतेसाठी
मी हि माणूस हे विसरून गेले

पिंजऱ्यातले पक्षी स्वच्छंद
तर मानव बंदिस्त असे हे घडले
भयभीत मनी, जीवलगांच्या
काळजीत सारे मग पडले

स्वातंत्र्य जगण्यातले हरवले
जगभर लॉकडाऊन झाला
कधी संपेल हा तांडव
खळखळणारा झरा आटून गेला

Group content visibility: 
Public - accessible to all site users