श्रद्धा

Submitted by दवबिंदू on 20 May, 2020 - 10:34

श्रद्धा

नाही ऐकले कीर्तन,
नाही म्हंटले भजन, नेमाने.

नाही घेतले दर्शन,
नाही केले पूजन, नेमाने.

नाही केले नवस,
नाही केले उपवास, नेमाने.

नाही वाचले पोथीपुराण,
नाही केले नामस्मरण, नेमाने.

हात मी जोडतो देवा, भक्तिभावे.

श्रद्धा असे ही एक मनात,
तुझे सानिध्य अवतीभवती.

पाठीराखा तू कधी,
कधी तू सोबती,
दाखवण्या वाट
कधी तू पुढती.

- दवबिंदू

Group content visibility: 
Use group defaults