समीप चांदण्यात.

Submitted by अजय चव्हाण on 20 May, 2020 - 09:09

मीप चांदण्यात माझ्या चंद्र होऊन जा..
तुझ्याविना अर्ध आयुष्य माझं, पुर्ण तु होउन जा ...
कधी गुंतलेले मन हे माझे, थोडे तुझे देऊन जा..
नाही जमलचं तुला तर हे बंध सोडवून जा..

कधी एकाकी तु आठवलीस तर स्वप्न ठेऊन जा..
नसलीस भोवती तरीही माझं हसणं पाठवुन जा..
कातरवेळी अशा संध्याकाळी, मला ओलांडून जा..
ओलंडताना दिसलेले तुला अश्रू माझे पुसुन जा..

डायरीतल्या पानांवर त्या कोमेजलेलं फुल फुलवून जा.
मोरपंख विस्कटलेला तो अजुनही, थोडं सावरून जा..
पाषाणह्रदी ह्या भावना जपतोय, दाह सोसून जा..
मनाच्या ह्या नदीकाठी स्थितप्रज्ञ मिनल होऊन जा..

- अजय चव्हाण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद किशोर, तायडे, सामो, रूपाली, भरत.

@भरत समीप म्हणजे जवळ, निकट

जवळच्या चांदणयात माझ्या चंद्र होऊन जा.. ह्या अर्थाने लिहलं आहे..

अजुन बरेच प्रश्न पडण्याआधी उत्तरे देतो..

स्थितप्रज्ञ - Self Collected

मिनल - अलौकीक रत्न, खडा.

Nice

वा सुरेख !
मीनल म्हणजे कोण हे विचारणार होतो
पण उत्तर मिळाले आहे