स्वप्न

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:37

तुझे ते नयन भोळे
      त्यात साठवले सागर निराळे।
त्या सागराच्या उसळणाऱ्या
         अथांग लाटा ।
त्यात शोधीत होतो
    मी प्रेमाच्या वाटा।
वाट शोधीत असताना
     भिजलो मी मनोमनी।
तुझ्या नजरेच्या
     एका कटाक्षानी,
वाटलं मला सोडिले तु
      प्रेमाचे बाण त्या छणी।
बाणांनी भेदताच मनाला
      झालो मी घायाळ राणी।
या घायाळ मनाला
       औषध एकच असावं।
आयुष्यात नाही जरी,
      स्वप्नात तुझं रूप दिसावं।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान