स्वप्न

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:07

रात्रीच्या हिंदोळ्यावर
पहाटेच्या छणी,
स्वप्न तुझं दिसतय
कसला ध्यास मणी।
आयुष्यात नाही जरी,
स्वप्नात तू दिसावी
माझ्या मणी एकच इच्छा
उरली असावी।
म्हणुन का प्रत्येक स्वप्नात
फक्त तूच दिसावी।
किती तरी स्वप्न पहिली
तुझ्या स्वप्नाचा भासच निराळा ।
आयुष्य प्रसन्न होतेय
आणि वाढवितो जिव्हाळा।
प्रत्येक स्वप्नात मला
तुझं वेगळं रूप दिसतंय।
पाहून त्या प्रत्येक रुपाला
तुझ्यावरचं प्रेम अजूनच वाढतंय।
नंबर ही डिलिट करण्याचं
केला मी विचार।
पण प्रत्येक प्रयत्नात
मागे वळले हात वारंवार।
विसरण्याचा मी केला
बहुदा प्रयत्न ।
पण आठवण करून देतात
तुझे ते स्वप्न ।
( अरविंद )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users