जात इतकी महत्वाची का असते?

Submitted by अमृताक्षर on 14 May, 2020 - 14:38

अदिती एक सुशिक्षित आणि सुंदर मुलगी होती. नुकतीच तिला सरकारी नोकरी लागली होती. चार वर्षांपूर्वी ती अमृत ला भेटली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. अमृत सुद्धा सरकारी बँकेत चांगल्या पदावर नोकरी ला होता. दिसायला ही चार लोकात उठून दिसणारा..दोघांचं आता लग्नाचं वय झाल होत..अदिती पंचवीस ची तर अमृत एकोणतीस चा झाला होता..दोघं वेल सेटल होते दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न पाहिली होती त्यामुळे आता घरी सांगायला काही हरकत नाही असे वाटून दोघांनी आपल्या घरी सांगितले.. पण जेव्हा घरच्यांनी विरोध केला तेव्हा अमृत थोडा घाबरला..इतकी चांगली मुलगी असताना सुद्धा घरचे विरोध करतील अस त्याला अजिबात अपेक्षित नव्हत.. त्याचे बाबा जेमतेम चवथी पर्यंत शिकलेले एक शेतकरी होते गावात त्यांचा मान सन्मान होता. आंतरजातीय विवाह केला तर लोक समाज काय म्हणेल या भीतीने आंतरजातीय विवाहाला ते तयार झाले नाही. त्यांच्यासमोर घरी कुणी काही बोलू शकत नव्हते तरी अमृत ने खूप प्रयत्न केले पण शेवटी त्यांनी आजारी पडून इमोशनल ब्लॅकमेल करून अमृत ला दुसऱ्या मुलीसोबत लग्नाला होकार द्यायला लावला.. तर याउलट अदितीची फॅमिली एज्युकॅटेड आणि उदारमतवादी होती तिचे बाबा शिक्षक होते. खूप पुस्तके त्यांनी वाचली होती. त्यांच्या जुन्या विचारात खूप बदल झाले होते त्यामुळे आंतरजातीय विवाहाला आई बाबा विरोध करणार नाही अशी अदितीची ठाम समजूत होती पण थोडाफार विरोध त्यांनी सुद्धा केलाच..नंतर मात्र अमृत ची चांगली नोकरी आणि समजूतदार प्रेमळ स्वभाव पाहून नाईलाजाने त्यांनी लग्नाला होकार दिला होता...
पण शेवटी अमृत त्याच्या आई बाबासमोर काहीच बोलू शकला नाही इंजिनिअर असलेल्या मोठ्या भावाने सुद्धा त्याला सपोर्ट केला नाही आणि शेवटी घाई घाईत एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरीला असलेल्या मुलीसोबत घरच्यांनी त्याच लग्न ठरवल..
सुरवातीला अमृत आणि अदितीला घरच्यांच्या या निर्णयाचा खूप त्रास झाला रोजच रडणं भांडण चालूच होत पण हळूहळू त्यांनी आपली मन मारून एकमेकांना विसरून जायचा निर्णय घेतला आणि नाखुशीनेच एकमेकांशिवाय आपल्या आयुष्यात पुढे जायचं ठरवल..अदितीला अमृतची खूप आठवण यायची पण त्याच आता लग्न ठरलय हा विचार करून ती आपल्या बंद खोलीत मन मोकळं रडून घ्यायची आणि मग चेहऱ्यावर खोटं हसू आणून घरचे लग्नाला जे स्थळ आणतात ते पहायची.
हळूहळू अमृतने सुद्धा प्रियंका सोबत जुळवून घ्यायची तयारी दाखवली..आपल्या घरच्यांनी निर्णय घेतला आहे तर तो योग्यच असेल असे वाटून अदितीला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कायमच बंदिस्त करून तो एका नव्या मुलीसोबत संसाराची गाडी हाकायला तयार झाला..पण थोड्याच दिवसात त्याच्या लक्षात आल की आपण जितका प्रयत्न या नात्यासाठी करतोय तितका प्रयत्न प्रियंका करत नाहीये..ती बोलताना शांत असते तिला कधीच कुठल्या गोष्टीत उत्साह नसतो उगाच जबरदस्ती बोलायचं म्हणून ती बोलते आठ आठ दिवस फोन सुद्धा करत नाही..अमृत तिला खूप बोलत करण्याचा प्रयत्न करतो पण ती काहीच बोलत नाही. अदितीला विसरून एका नवीन आयुष्याची सुरवात करून सुद्धा प्रियंका च उदास राहण अमृतला मनातून पोखरून टाकत..तो हिम्मत करून घरच्यांना तिच्यासोबत लग्न न करण्याबद्दल बोलतो..पण समाज काय म्हणेल या भीतीने जमलेल लग्न मोडायला घरचे तयार होत नाही हा दिवस दिवस घरच्यांना समजून सांगतो की मी तिच्याबरोबर खुश राहू शकणार नाही. या लग्नात तिची मर्जी नाहीये तुम्ही दुसरी कुठली पण मुलगी शोधा पण जबरदस्ती लग्न लाऊन आमच्या दोघांचं आयुष्य खराब करू नका..पण घरचे काही एक ऐकत नाही.. लग्ना नंतर होईल सगळ ठीक अस म्हणून थोड्या दिवसात त्यांचं लग्न लाऊन दिलं जात..प्रियंका तशीच उदास चेहऱ्याने नवीन घरात प्रवेश करते..ती कितीही तुटक वागत असली तरी अमृत तिला खूप समजून सांभाळून घेतो..एका मैत्रिणी सारखं तिला बोलत करण्याचा प्रयत्न करतो पण लग्नाला दोन महिने होऊन सुद्धा तिच्यात काहीच बदल होत नाही..ती कुठल्याच गोष्टीत काहीच पुढाकार घेत नाही. रात्री अमृतने तिला प्रेमाने जवळ घेतले तर ती प्रेता समान पडून राहते नीट बोलत नाही या सगळ्यामुळे अमृत खूप डिस्टर्ब होतो. घरच्यांना कळवतो पण घरचे
लग्न लाऊन बाकीच्या जबाबदारीतून कधीच मुक्त झालेले असतात.. अमृत कितीही समजूतदार असला तरी एक दिवस तिच्या अशा अलिप्त वागण्यावरून दोघांची खूप भांडण होतात..अमृत म्हणतो तू बोलशील नाही तर मला कस समजेल काय प्रोब्लेम आहे..तू एकदा सांग तरी मी माझ्या परीने तो सोडवून पाहिलं..पण ती नेहमीसारखी काहीच न बोलता झोपी जाते.
अमृत चिडून बाहेर हॉल मधे झोपायला निघून जातो..
सकाळी नेहमीप्रमाणे उठून तो बाथरूम कडे जातो..तिथे प्रियंकाच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल प्रेत पाहून सुन्न होऊन जातो..तिने हाताची नाडी कापून घेतलेली असते.. तशा ही अवस्थेत तो स्वतःला सांभाळतो..विचित्र मनःस्थितीत बेडरूम मध्ये येतो.. ड्रेसिंग टेबल वर एक चिठ्ठी त्याला दिसते तो ती भरभर वाचून काढतो..

प्रिय अमृत,
मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय मला हे सगळ आधीच तुम्हाला सांगून द्यायला पाहिजे होत पण मी जर सांगितलं असत तर तुम्ही लग्नाला नकार दिला असता आणि आई बाबाने परत माझ्यावर आरोप अत्याचार केले असते.
माझं एका मुलावर खूप प्रेम होत. आम्ही सहा वर्ष सोबत होतो तो एका नामांकित कंपनीत मॅनेजर होता..घरची परिस्थिती खूप चांगली होती. त्याच्या घरच्यांनी मला सून म्हणून स्वीकारलं होत पण माझ्या घरच्याचा आंतरजातीय लग्नाला विरोध होता. मी त्यांना खूप समजावले की तो वेल सेटल आहे त्याच्या घरचे चांगले आहेत तो चांगला मुलगा आहे पण घरच्यांना तो दुसऱ्या जातीचा आहे इतकंच फक्त दिसत होत. बाबा तर म्हंटले तुझ आपल्या जातीच्या एखाद्या भिकाऱ्याशी लग्न करून देईल पण त्याच्याशी करून देणार नाही.
महेश च्या घरच्यांनी पण आई बाबांना खूप समजावले पण त्यांनी काहीच ऐकल नाही आणि माझं जबरदस्ती तुमच्याशी लग्न करून दिलं..मी अजिबात खुश नव्हती तुमच्या आधी जी मुले मला पाहून गेलीत मी त्यांना सगळ्यांना माझं प्रेम प्रकरण सांगितलं आणि त्यांनी नकार दिला म्हणून आईने मला खूप मारले..तिने आत्महत्या करायची पण धमकी दिली त्यामुळे नाईलाजाने मी तुम्हाला काही न सांगता लग्नाला तयार झाली..माझं महेश वर खूप प्रेम होत त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा मी तुमच्या संसारात रमु शकली नाही..माझ्या लग्ना नंतर महेश खूप खचून गेला होता त्याने आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला..त्याच आणि तुमचं, दोघांचंही आयुष्य माझ्यामुळे खराब झालं होत मग मी सुखाने कशी जगू शकणार होती. मला एक गोष्ट चांगलीच समजली आहे की या समाजात माणसापेक्षा माणसाच्या जातीला किंमत आहे. प्रेमा पेक्षा माणसाच्या समाजातील स्थानाला महत्त्व आहे. कुठला मुलगा किंवा मुलगी कितीही चांगली असली तरी आधी जात पाहून मगच लग्न जमविणाऱ्या या समाजात किती तरी प्रियंका आणि महेश जिवंतपणी मेलेली आहेत. आपले पोर बाळ खुश आहेत की नाही या पेक्षा चार लोक आपल्याला काय म्हणतात हेच जास्त महत्वाचं झालंय. मी अशा समाजात नाही जगू शकत मी जातेय एका दुसऱ्या दुनियेत जिथे कदाचित जात पाहून माणसं जोडली जाणार नाहीत. जिथे कदाचित जात न पाहता जीवापाड प्रेम करणे हे पाप नसेल.. जिथे कदाचित माणसाच्या जातीपेक्षा माणसाला जास्त किंमत असेल.
शक्य झाल्यास मला माफ करा.
तुमची होऊ न शकलेली अभागी
प्रियंका

' अहो ऐकता का आई ची तब्येत थोडी ठीक नाहिये मी थोडे दिवस घरी जाऊन येऊ का..?'
काही गरज नाहीये लग्ना नंतर मुलगी परकी होऊन जाते इतकं पण कस समजत नाही तूझ्या आई बाबांना..त्यांचं ते बघतील तू आपला संसार सांभाळ आधी..
सागर च नेहमीसारख अस तोडून बोलण ऐकुन अदितीच्या डोळ्यात पाणी आल.. स्वतःसाठी इतक्या आवडीने बनवलेला चहा तिला आता तिच्या संसारासारखाच बेचव भासत होता. तशीच गॅलरी मधे येऊन ती रस्त्यावरून जाणारी गर्दी न्याहाळत बसली..तीच मन मात्र भूतकाळात रेंगाळत होत.
बाबांचा अपघात झाला तेव्हा आठ दिवस दवाखान्यात तिच्यासोबत सावली सारखा उभा राहून हिम्मत देणारा अमृत नकळत तिच्या नजरेतून सुटून अलगद गालावर ओघळला होता.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सडलेली समाजव्यवस्था आहे. निसर्गदत्त प्रेमाने नाते जिथे बनते त्याला अफेअर/भानगड म्हणतात. बदनामी होऊ नये म्हणून त्या नात्यालाच पुढे बलात्कार ठरवायला सुद्धा कमी करत नाहीत. आणि सामाजिक जबरदस्ती करून दोघांचे लग्न लावतात आणि त्याला विवाहबंधन असे गोंडस नाव देतात.

छान आहे कथा

प्रेमविवाहाला जातच काय तर कुठल्याही कारणास्तव विरोध करणे हे अनाकलनीय आहे.

कथा आहे का सत्यकथा.. हे माहिती नाही मला.. पण एक खरंय अशा मनस्थितीत जगण खुप कठीण असत.. एकीकडे जिवापाड प्रेम करणारा माणुस हवा असतो. तर दुसरीकडे आईवडील..

अमृत सारख्या माणसावर विश्वास ठेवला हीच अदितीची चूक झाली.......
जो माणूस स्टॅन्ड नाही घेऊ शकला तो पुढे काय करू शकला असता.....
अदिती चे नशीब चांगले आहे - वाचली ती....

मस्त लाईफ पार्टनर बघून तिने लग्न करावे ... परत अमृत च्या नादाला लागू नये....

मला वाईट प्रियांका चे वाटत आहे... सगळा राग अमृत ने त्या बिचारी वर काढला असणार.... तिचे जुने लफडे होते वगैरे रचलेल्या कथा असू शकतात अमृत च्या ... परत अदिती च्या मनात सॉफ्ट कॉर्नर यावा म्हणून....

कथा स्वतःची आहे ना ?
छान आहे. पॅरा पाडत जा. ठिपक्यांची नक्षी काढायची गरज नाही.

हम्मम.... वाईट झाले.

अदिती नोकरी करतेय असे वर लिहिलेय. तिने नवऱ्याला सोडून परत आईबाबांकडे जावे, सासरी काय होतंय ते सांगावे.
ते समजून घेतील, आधीही समजून घेतले होते. आणि अमृतला परत भेटावे. दोघांनी एकत्र येण्याचा विचार सुरू करावा. एकदा फटका बसल्यावर आता आईबाबा मध्ये येणार नाहीत.

बाकी जात वगैरे बद्दल काहीही बोलणे व्यर्थ आहे. मायबोलीवर लोकांची बोटे झिजली या विषयावर बोलून पण अजून कोणी माझे मतपरिवर्तन झाले असे लिहिणारा बघितला नाही. मनातून जात नाही ती जात.

ही सत्यकथा नाहीये..माझं अजून लग्न झालेलं नाही..स्वतःच्या नावाचा उपयोग करून एखादी कथा लिहावी अस खूप मनात होत.. सगळ काही चांगल असताना केवळ जात दुसरी आहे म्हणून लग्नाला विरोध होऊन कितीतरी लोकांचे आयुष्य खराब होताना पाहिलेत त्यामुळे हा प्रश्न पण सारखा मनात रुंजी घालत होता की एखाद्या व्यक्तीपेक्षा त्याची जात च इतकी महत्वाची का ठरते..?
म्हणून ही कथा लिहिली..

बाकी जात वगैरे बद्दल काहीही बोलणे व्यर्थ आहे. मायबोलीवर लोकांची बोटे झिजली या विषयावर बोलून पण अजून कोणी माझे मतपरिवर्तन झाले असे लिहिणारा बघितला नाही. मनातून जात नाही ती जात..>>>>> कटू आहे पण खरच सत्य आहे..कधी हे सगळ बदलेल काय माहित..

कथा थोडी स्टीरिओटाइप वाटली. म्हणजे अमृत आणि अदिती दोघे एकदम परफेक्ट असणं आणि स्वजातीत लग्न केल्यावर दोघानाही विचित्र / नालायक पार्टनर मिळणं.

त्यांना स्वजातीत लग्न करून समजूतदार/ किंवा किमानपक्षी नॉर्मल पार्टनर्स मिळाले. पण मुळातच प्रेम दुसऱ्या कोणावर असल्याने त्या संसारात मन न रमणे, सुख न वाटणे हे दाखवलं असतं तर इतकी स्टीरिओटाईप (ब्लॅक अँड व्हाईट) झाली नसती .

जात नाही ती जात वगैरे वाक्यांनी उगाच जातीच्या या किड्याचा डायनासॉर केला आहे.
जात न मानणे फार काही विशेष नसते. कोणीही ती आपल्यापुरता सहज झुगारू शकतो. जातही आणि धर्मही. पण ती जन्मापासून चिकटते ती आयुष्यभर सोबत घ्यावीच लागते म्हणत आपण केवळ आपल्याच मनातील जातीयवादाची ज्योत तेवत ठेवतो.

छज्जा.. मला नीट सांगता नाही येत आहे.
मे बेड स्टीरिओटाईप च्या ऐवजी मी जनरलायझेशन हा शब्द वापरायला हवा होता.

मला म्हणायचं आहे की जसं आंतरजातीय प्रेमविवाह केल्यावर १००% चांगलाच जोडीदार मिळतो असं नाही त्याचप्रमाणे स्वजातीत अरेंज मॅरेज केल्यावर अगदी नालायक / विचित्रच जोडीदार मिळतो असंही नाही.

कथेत प्रियांका किंवा सागर.. एकजण तरी नॉर्मल दाखवायचा. माझ्या माहितीत अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे मुलींनी अशी सो कॉल्ड मनाविरुद्ध (आई वडिलांनी आत्महत्येची धमकी वगैरे दिल्याने) आपला कंडम बॉयफ्रेंड सोडून स्वजातीत वेल सेटल्ड मुलाशी लग्न केले आणि त्या स्वतः मान्य करतात की त्या खरोखरच सुखी आहेत.

हा आता.. त्यांना त्यांच्या आधीच्या बॉफ्रे चा विसर पडला किंवा त्या त्यांच्या नवऱ्यासोबत १००% सुखी आहेत म्हणजे ते प्रेम खरं नव्हतंच असं कोणी म्हणणार असेल तर प्रश्नच मिटला.

बाकी प्रेम समजून उमजून करता येत नाही.. होऊन जातं वगैरे आपण वाचतो. 'लव्ह ऍट फर्स्ट साईट' वाल्या प्रेमामध्ये मध्ये प्रेमाचा भाग किती आणि शारीरिक आकर्षणाचा किती हे ठरवणं अवघड आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे मुलींनी अशी सो कॉल्ड मनाविरुद्ध (आई वडिलांनी आत्महत्येची धमकी वगैरे दिल्याने) आपला कंडम बॉयफ्रेंड सोडून स्वजातीत वेल सेटल्ड मुलाशी लग्न केले आणि त्या स्वतः मान्य करतात की त्या खरोखरच सुखी आहेत.
>>>>

हो हे असे होते बरेचदा.
अर्थात खरोखरच सुखी आहेत की मनात काही खंत आहे हे ज्याचे त्यालाच ठाऊक असते.

दोन अनुरूप, वेल सेटल आणि वयाची पंचविशी पार केलेली लोक जर लग्न करू इच्छित असेल तर फक्त जात दुसरी आहे म्हणून समाजाच्या भीतीने घरच्यांनी विरोध करणे कितपत योग्य आहे..
बाकी नंतर ते किती खुश राहतात किंवा अरेंज केले असते तर खरच खुश राहिले असते का..हे सगळ नंतरच झालं..

लग्नानंतर मुली आपोआप नांदतात हे जुनी खोंडं सांगतात. आता नांदणे आणि सुखी होणे यात फरक आहेच.
जोडीदार नाकारताना योग्य कारणे दिली जावीत. जात वेगळी असल्याने तो लायकच असेल असे नाही आणि नालायकच असेल असेही नाही. मुलं लवकर विसरतात. मुली नाही. आणि तो मनमिळाऊ वगैरे असेल , नवरा रूक्ष असेल तर हा फरक ठळक होणार.

मुली नांदतात ते कशा याच्याशी जुन्या खोंडांना घेणं देणं नसतं. त्यांच्या लेखी मुलं बाळं झाली म्हणजे रूळली की... संपलं.
या अशा हिशेबावर संसार चालू असतात.

त्यामुळे कथेच अशा घटनांच्या आडून लेखिकेने भाष्य केलं असावं.

जोडीदार नाकारताना योग्य कारणे दिली जावीत. जात वेगळी असल्याने तो लायकच असेल असे नाही आणि नालायकच असेल असेही नाही.>>>> हेच म्हणायचं होत 100%

प्रेमात पडून लग्न करणारे 100 टक्के सुखी होतात असे कुठे आहे. वर्षानुवर्षे प्रेमात असलेले लोक लग्न केल्यावर वर्षभरात वेगळे झाल्याची उदाहरणे आहेतच की.

मुद्दा हा की प्रेमात पडून लग्न करायचे असे मुले म्हणताहेत तर केवळ जातीच्या मुद्द्यावरून विरोध करावा का?? कित्येकदा प्रेम नसतेच, चुकीच्या जागी जडलेले असते, पुढे काय वाढुन ठेवलेय ते प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सोडून इतरांना दिसत असते अशा वेळी गोड बोलून मन वळवणे वेगळे आणि बाकी सगळे ठीक असताना केवळ जातीसाठी विरोध करणे वेगळे.

लेखिकेच्या मनात कथेचे जसे वळण आहे तसेच ती लिहिणार. दुसरी एक कथाही आहे की माबोवर जिथे नायिका प्रेम विसरून जाते, लग्न करून संसार चालवते आणि नंतर तिला प्रेम आठवते. तिचा नवरा प्रेमळ असता तर तिला कदाचित जुने प्रेम आठवलेही नसते.

असे कित्येक सीनारिओज आपल्या समाजात आहेत. कथा म्हटले की साधारण एकच सीनरिओ येणार ना... सगळेच एकत्र घेतले तर ती कादंबरी होईल Happy Happy

दोन अनुरूप, वेल सेटल आणि वयाची पंचविशी पार केलेली लोक जर लग्न करू इच्छित असेल तर फक्त जात दुसरी आहे म्हणून समाजाच्या भीतीने घरच्यांनी विरोध करणे कितपत योग्य आहे..>>>

सहमत.
मुळात 25वीशि पार केलेल्या मुलांच्या व्यक्तिगत आयुष्यात पालकांनी दखल देणेच चूक आहे. तुम्ही तुमचे आयुष्य जगा, त्यांना त्यांचे जगू द्या.

असे कित्येक सीनारिओज आपल्या समाजात आहेत. कथा म्हटले की साधारण एकच सीनरिओ येणार ना... सगळेच एकत्र घेतले तर ती कादंबरी होईल Happy Happy
नवीन Submitted by साधना on 15 May, 2020 - 10:49
>>>>>

+७८६
बरेचदा हे वाचकांना कळत नाही आणि असेही होते तसेही होते वगैरे चर्चा सुरु होतात. जर लेख असता तर एकांगी बोलू शकतो. कथेबाबत अनेक शक्यतांपैकी एक शक्यता दखवली असे समजून पुढे जायचे.

पालकांचे काम सल्ले देणे. अनुभवाचे चार बोल सांगणे. निर्णय मुलांचाच असावा.
एखाद्या मुलीला लग्नानंतर दुसरया जातीत जाऊन त्याच्या एकत्र कुटुंबात राहायचे असल्यास त्यातील खाचखळगे तिच्या लक्षात आणून देणे सुद्धा पालकांची जबाबदारी आहे. दुसरया जातीच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणे वेगळे आणि दुसरया जातीच्या घरात सून म्हणून जाणे वेगळे याची तिला कल्पना द्यावी. मग ती आपले बघेल काय ते...

एखाद्या मुलीला लग्नानंतर दुसरया जातीत जाऊन त्याच्या एकत्र कुटुंबात राहायचे असल्यास त्यातील खाचखळगे तिच्या लक्षात आणून देणे सुद्धा पालकांची जबाबदारी आहे. दुसरया जातीच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणे वेगळे आणि दुसरया जातीच्या घरात सून म्हणून जाणे वेगळे याची तिला कल्पना द्यावी. >>> डेट वर जाणे आणि सून होऊन दुसऱ्या घरी जाणे यात फरक असणारच..पण दुसऱ्या जातीच सासर आहे आणि त्रास होईल म्हणून स्वतःच्या जातीत जबरदस्ती लग्न करणे हे योग्य आहे का..सासर म्हंटल तर सुरवातीला अडजस्ट करायला थोडा वेळ जातोच..तिथे जाती चा जास्त काही संबंध नाही..अस मला वाटतं

पण दुसऱ्या जातीच सासर आहे आणि त्रास होईल म्हणून स्वतःच्या जातीत जबरदस्ती लग्न करणे हे योग्य आहे का
>>>>

माझी पूर्ण पोस्ट वाचा
जबरदस्ती कुठे लिहिलेय
फक्त मुलांना प्रेमात फार पुढचे दिसत नाही त्याची कल्पना द्यावी आणि मग तो जे घेतील तो निर्णय.

काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ वायरल झाला होता ... पळून जाऊन लग्न केलेली मुलगी नवऱ्याच्या बाजूला बसून बोलते आहे जेमतेम 18 वर्षांची वाटते - त्यातल्या ठीक है ? या पालूपदामुळे तो विनोदी झाला होता आणि त्यामुळे व्हायरल . पण ही मुलगी ना शिकलेली ना कमावती ... ती सांगते आहे माझं पुढे काय व्हायचं ते होईल , त्याला मी जबाबदार असेन , हा माझा स्वतःचा निर्णय आहे ... कशीही परिस्थिती आली तरी मी तिला तोंड देईन , ह्याने कशीही ठेवली तरी मी राहीन ...

हे पुढे टिकणार आहे की नाही देव जाणे .. पण स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेण्याचा तिचा ठामपणा मला आवडला ... पुढे पश्चातापाची वेळ आली तरी दुसऱ्याला ब्लेम करण्याची वेळ तिच्यावर येणार नाही ... जे काही होईल ते आपल्या निर्णयाचं फलित आहे हे तिला माहीत असेल .

अय्या! एकाच जातीत लग्न केलेल्या मुलींच्या माहेरचं वळण काढत नाहीत का सासरचे?
आणि अशा कुटुंबांत," आमच्यात असं नसतं बाई!," असं वाटतंय ऐकू येत नाही का?

अरेंज मॅरेजमधे साधारण किती पुढ्चे दिसते?
>>.>
जेवढी माहिती काढाल तेवढे
प्रेमविवाहात पार्टनरव्यतिरीक्त बाकीची माहिती गौण समजली जाते. प्रेम आहे तर बाकीचे सारे निभाऊन नेऊ असा फाजील आत्मविश्वासही बरेचदा असतो.

दुसरा मुद्दा म्हणजे अपेक्षा.
प्रेमविवाहात आपला जोडीदार अमुकतमुकच वागणार हे लग्नाआधीच्या अनुभवावरून गृहीत धरले जाते. आणि तसे तर होत नाही. मग ते पचवता येत नाही.
अरेंज मॅरेजमध्ये अमुकतमुक तडजोड करावीच लागणार दोघांना जे गृहीत पकडले जाते. त्यापेक्षा जास्त करावी लागली तरच प्रॉब्लेम होतो.

आणि अशा कुटुंबांत," आमच्यात असं नसतं बाई!," असं वाटतंय ऐकू येत नाही का?
Submitted by भरत. on 15 May, 2020 - 15:13

>>>>>

जिथे मामेबहिंणीशी लग्न होते तिथे कदाचित असे ऐकू येत नसेल. अन्यथा हे फार कॉमन आहे सासूसुनेच्या टोमण्यांमध्ये..

अभिषेक लवकर नवा धागा काढ
लै कंटाळवाणा विषय घेऊन चर्चा करत बसलाय
काहीतरी धमाकेदार येउ दे आणि तो मित्र कुठं गायब झालाय तुझा?

लै कंटाळवाणा विषय घेऊन चर्चा करत बसलाय
काहीतरी धमाकेदार येउ दे आणि तो मित्र कुठं गायब झालाय तुझा?
नवीन Submitted by आशुचँप >> हा राव. लै बोर झालं आज.

अदिती ... हा मुद्दा महत्वाचा आहे ... जो मुलगा स्टॅन्ड घेऊ शकला नाही त्याच्याशी लग्न झाले पुढे तो तुम्हाला काय सपोर्ट करणार....
ब्रेक अप पर्यंत ची अर्धी गोष्ट तुमची आहे का ? असेल तर तुम्ही नशीबवान आहात...
मस्त चांगला पार्टनर मिळेल... हे तुमचं पहिले सिरीयस प्रेम आहे असे वाटत आहे... म्हणून त्रास होतोय... बाहेर पडाल... थोडा वेळ लागेल....
जोडीदाराबरोबर प्रेम वगैरे काही नसते... असते ती फक्त सवय... हे लक्षात ठेवा...

जात जात नाही तोपर्यंत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही महत्त्व न देऊन काही फायदा नाही.
>>>
आपण महत्व दिले नाही याचाच अर्थ आपल्यापुरते ती गेली ना...

जात वगैरे काही नसते . उगाच का शाहरुख आणि गौरी भाभी इतके सुखी आहेत . वेगळ्या धर्मात लग्न करणे आणि टिकवणे अर्थात फक्त शाहरुख च करू शकतो .
अरबाज, ऋत्विक सारख्यांचे ते काम नाही . ओन्ली किंग खान .


तुझ्याशी चटकन सहमत होतील अशा (खात्रीच्या) स्त्री आयडीच्या धाग्यांवर सल्ले दिले तर उताणे पडावे लागणार नाही.

अजून एक दवणीय

नवीन Submitted by हॅपी on 14 May, 2020 - 21:53

म्हणजे काय
कृपया कोणी सांगेल का

मुली नांदतात ते कशा याच्याशी जुन्या खोंडांना घेणं देणं नसतं. त्यांच्या लेखी मुलं बाळं झाली म्हणजे रूळली की... संपलं.

>> याच्याशी मात्र १००% सहमत.

मुली नांदतात ते कशा याच्याशी

मुली नांदतात ते कशा याच्याशी जुन्या खोंडांना घेणं देणं नसतं. त्यांच्या लेखी मुलं बाळं झाली म्हणजे रूळली की... संपलं.>>>

विवाह संस्था निर्माण करावी लागली किंवा अस्तित्वात आली यामागची मूळ गरज मुलेबाळे जन्माला घालणे ही होती. ही गरज का निर्माण झाली हा वेगळा इतिहास. जातीचा हट्ट आजही धरला जातो त्यामागेही आपल्या डीएनएमध्ये रुजलेली ही बेसिक भावनाच असणार. मुलाबाळांची गरज का निर्माण झाली हा इतिहास बघितला की आपलीच जात हवी याचा उगम कुठे झाला असावा हे लक्षात येते.

आता हजारो वर्षात यात अनेक बदल होत गेले पण डीएनए आजही तोच आहे, त्यावर जे लिहिले गेले ते आजही तसेच आहे. बाह्य शिक्षणाने आपण ते लिखाण झाकून टाकतो पण झाकतो फक्त, पूर्ण पुसून टाकणे अजूनही शक्य झाले नाही. म्हणून जात मनातून जात नाही.

गोष्ट स्तीस्मित करणारी आहे, अगदी पहिलाच प्रयत्न म्हणून लेखिकेने हा विषय का घेतला ते कळत नाहीये... विशेषत: ज्या लेखिकेचा वाचनसाठा भरपूर आहे तिने पहिलाच प्रयत्न म्हणून सामाजिक विषय घेणे जरा अनाकलनीय आहे माझ्यासाठी तरी Happy
सागर ची एंट्री उशिराच आणि बळेबळेच झाल्या सारखी वाटली...
To be honest, माझ्या देखील एका मामाच्या प्रेमाला घरून विरोध होता आधी(2008-2009 मधली गोष्ट असेल) ... मग आजीने आजोबान्ना समजावले ते फक्त एकाच वाक़यात "अहो संसार त्याच दोघान्ना करायचा आहे शेवटी.... आपल्याला नाही काही" आणि आजोबा पण मस्तपैकी तयार झाले... माझ्या त्या मामाचे नाव देखील महेश च आहे (I swear) आणि सध्या पुण्यात आहे! म्हणूनच हे लिहितोय मी! कारण तो मामा माझा सक्खा मामा आहे आणि लाहानपणापासून माझ्या अगदी जवळचा आहे!
मी पाचवीत/सहावीत असताना खुद्द त्या मुलीशी बोललो होतो... ट्यूशन ला सोडायाला आला होता तेव्हा, मी खाली उतरल्यावर त्याने फोन लावला होता आणि ते दोघे बोलत होते, माझी ट्यूशन सुरू व्हायला वेळ होता म्हणून मी बाहेरच घुटमळत होतो Proud आणि त्यांचे बोलणे माझ्या कानावर पडले... मामाने दचकुन पाहिलं,... माझ्या चेहर्यावार चोरी पकडल्याचा आनंद अगदी ओसंडून वाहात होता!

मी म्हणालो कोण आहे ? मामा: "तुझी मामी आहे!" (होणारी वगैरे म्हणायची भानगड च नाय डायरेक्ट Declare :G) नंतर मामा तिला म्हणाला एक मिनीट हं, इकडे बोल जरा...
बाकीचे संभाषण आता तेवढे आठवत नसले तरी त्या मुलीची दोन वाक्ये कायम स्मरणात राहिली माझ्या...

मी : मामी तुम्ही कुठे असता
ती: पुण्यात असते! तुझ्या मामासोबत... आम्ही मित्रच आहोत!
मी: मग या की मामी सोलापूर ला !
ती: हं, आता मी तरी काय करू सांग की तुझ्या मामाला माझ्याशी लग्न करून मला सोलापूरात आणायला

त्या मुलीच्या बोलण्यातली वेदना आणि ते माधुर्य आहाहाहा....
मामाला सोडून रहाण हे तिच्या किती घशाशी आलय हे त्या वयात देखील जाणावावं ?!
इकडे आजोबा आज्जि यांनी होकार दिला,
तर तिकडे त्या मुलीचे वडील... अयाया....

"माझ्या मुलीला जन्मभर बिन लग्नाची ठेवेन पण बामणाच्या घरात द्यायचो नाही मी तिला"

(हे सगळे मला अगदीच अत्ता अत्ता (Engineering च्या दुसर्या वर्षात असताना) आज्जिने सांगीतले. ते ही अगदी ओघाओघात तिच्यासोबत भाजी निवडताना आणि आई--बाबा दोघेही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना Proud ... स्टोरी मोठी आहे पण मुदयाच सांगतो)

त्या मुलीचे नाव प्रियंका/प्रिया असे काहीसे असे होते... ते मराठा होते आणि मामाकडचे देशस्थ ब्राम्हण...
तिचे काय झाले हे दुर्दैवाने आज कुणालाही माहीत नाही आणि मामाचा संसार उत्तम सुरू असल्याने, त्याचा मुलगा आता पाचवीत वगैरे असल्याने कुणीही हा विषय काढत नाही...

मुद्दा काय तर उच्च - नीच जातीत लग्न लाऊन देणे हा प्रोब्लेम नाहीये, तर पालकांच्या वा समाजाच्या च उत्तर संस्कारांनी माणसांची (पालकांची) तिकडे आकृष्ट झालेली डोकी ही खरी समस्या आहे...
"संसार त्याच दोघान्ना करायचा आहे शेवटी.... आपल्याला नाही काही"
हे सांगणारा कुणीतरी त्या समस्त विरोध करणार्या लोकांना देवाने भेटवावा हीच कळकळीची आशा...

आणि प्लीज पुढची कथा successful love story घ्या... निदान जे "बोअर" वगैरे झालेत त्यांच्यासाठी तरी Wink