Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"सुरूवातीचे ते फाळणी, २६/११
"सुरूवातीचे ते फाळणी, २६/११ चे बॉम्बिंग वगैरे >>> हे सगळे सूर्यवंशी मधे आहे??!! ऱोहित शेट्टीच्या?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
जावेद जाफरीचं कॅरेक्टर
जावेद जाफरीचं कॅरेक्टर फुलावायला कितीसा वाव असणार आहे असा विचार केलास >>>
हो खरे आहे.
हे सगळे सूर्यवंशी मधे आहे??!! ऱोहित शेट्टीच्या? >>> हो मै
अरे रोशे चे पिक्चर हे तुम्ही
अरे रोशे चे पिक्चर हे तुम्ही खुप जास्ती अपेक्षेने पहात आहात असे नाही का वाटत तुम्हाला. आता याच अपेक्षा ठेवून तुम्ही कर्मा, हुकुमत, तिरंगा असे पिक्चर पहाता का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
थिएटरात जाऊन कोन बघत असेल
थिएटरात जाऊन कोण बघत असेल सूर्यवंशी ?
(फर्स्ट डे फर्स्ट शो ला सहकुटुंब थेटरात जाऊन पाहिलेला - शांमा )
जरनल रोहित शेट्टीच्या
जरनल रोहित शेट्टीच्या पिक्चरपेक्षा यात पकाऊपणा जास्त वाटला. सिंघम, थोडाफार बोलबच्चन, आणि चेन्नई एक्सप्रेस हे बघणेबल आहेत. त्यातील बरेच विनोद सुद्धा धमाल आहेत. यात मला अगदीच बंडलगिरी वाटली.
सिंघम मधे सचिन खेडेकरला त्याच्या टोपण नावावरून चिडवणे, बोलबच्चन मधली अजय देवगणची इंग्लिश बोलायची हौस, चेन्नई एक्सप्रेस मधला ट्रेन सीन ई. मजेदार होते. तसे इथे काहीच सापडले नाही.
त्याच्या पिक्चर मधे मुद्दामून घुसडलेले लाउड आणि भंकस विनोद सोडले तर अधूनमधून काही जेन्युइन विनोदी सीन असतात. चेन्नई एक्सप्रेस मधे शाखाने दीपिका पदुकोणला हात देउन गाडीत घेतल्यापासून जे सगळे होते ते त्यातले काहीही त्याच्या कंट्रोल मधे नसते. मग मधे एका स्टेशनावर थांबल्यावर दीपिका त्याला म्हणते की तेथून तिच्या बापाचा एरिया सुरू होतो व त्याला आता तिचे ऐकावे लागेल. तेव्हा शाखा अगदी स्पॉण्टेनियसली म्हंटल्यासारखा "अब तक तो मेरी बहोत चल रही थी ना!" असे अगदी चॅण्डलर मोड मधे म्हणतो.
दुसरा एक परफेक्ट घेतलेला न्युआन्स आहे. जोपर्यंत दीपिका पळून जायच्या प्रयत्नात असते तोपर्यंत ते तिच्या बापाने सोडलेले दैत्य एकदम डेडली, मीनेसिंग वाटतात. पण जेव्हा ती गप्प पणे गाडीत नसते तेव्हा ते तिने सांगितलेले काहीही ऐकतात गरीब गाय होउन - कारण शेवटी ती त्यांच्या मालकाची मुलगी असते.
त्यामुळे मला वाटले जावेद जाफ्रीच्या कॅरेक्टरला तसा काहीतरी रिकरिंग विनोद दिला असेल. अब्बास-मस्तान च्या पिक्चर्स मधे जॉनी लीव्हरला देत तसा.
सूर्यवंशीवर धागा काढायचा
सूर्यवंशीवर धागा काढायचा म्हटला तरी हा इतका पकाऊ पिक्चर आहे कि डोकं चालत नाही.
फा - परफेक्ट मांडलंयस. रोहित
फा - परफेक्ट मांडलंयस. रोहित शेट्टीच्या मेथड टू मॅडनेस चा इथे मागमूस ही नाहीये. अक्षयकुमार - द प्रोड्यूसर- चा डॉमिनन्स जास्त दिसतो. त्यातून ते ‘३७० कलम हटवल्यापासून पाकिस्तानला कश्मिरमधे दहशतवाद करता येत नाहीये,’ ‘देश की बेटी’ वगैरे सरकारी जाहिराती तर जुन्या दूरदर्शनवरच्या ‘हम दो हमारे दो,’ ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ ची आठवण करून देतात.(अर्थात त्या जाहिराती, जाहिराती म्हणूनच दाखवायचे).
अरे रोशे चे पिक्चर हे तुम्ही
अरे रोशे चे पिक्चर हे तुम्ही खुप जास्ती अपेक्षेने पहात आहात असे नाही का वाटत तुम्हाला. >>> नाहिच बघितला, १० मिनिटात बन्द केला पण वर फा ने लिहलेले मुव्हिज चान्गले होते.
टायटल्स मध्येच हमेरे
टायटल्स मध्येच हमेरे बुजुर्गोंका फाळणी... का आणखी कुठल्या ब्ला ब्ला ब्ला मे चुक्या... अशी कॉमेंट्री दाखवली आणि मग अक्षयकुमार फेफ म्हणतोय तसा सरकारी जाहिराती करताना दिसल्यावर पेशंस संपले. अजय देवगण आणि रणवीर सिंग आधी आले असते तर बघितला असता जास्त.
अरे कुठे गेला तो हेराफेरी,
अरे कुठे गेला तो हेराफेरी, आवारा पागल दिवाना, मुझसे शादी करोगी मधला अक्की?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विनोदा चा केविलवाणा प्रयत्न करताना अगदीच बिचारा दिसत असेल.. सुर्यवन्शी फुकटात नेफ्लि वर असून बघण्याची ईच्छा होत नाहिये.
त्य ऐवजी इथले वाचून एमिली इन पॅरीस बघायला घेतलिये..
असं पण नुसतं सुंदर चेहरा आणि
असं पण नुसतं सुंदर चेहरा आणि डॅन्स ह्यांच्या जिवावर किती तगणार? तशाही नोरा फतेही, जॅकलीन वगैरे आहेत च जास्त यंग.
>>>>>
कतरीनाचे सौंदर्य वेगळेच आहे. कोणी पोरगी यंग आहे म्हणून तिला टक्कर देऊ शकत नाही. नोरा फतेही कोण माहीत नाही, पण जॅकलीनचे तर एखाद्या बाहुलीसारखे कृत्रिम सौंदर्य वाटते.
तर ईथे कतरीनाच्या सौंदर्यामुळे अक्षय कुमार आणखी म्हातारा वाटतो.
तसे तर शेवटी तीन हिरो एकत्र येतात तेव्हाही अजय देवगण जास्त दमदार वाटतो. आजही तो दोन बाईकचा स्टंट करणारा ॲक्शन हिरोच वाटतो. पण तो मार्शल आर्टवाला अक्षयकुमार हाच का हा प्रश्न पडतो.
बाकी रणवीर सिंग तर धमाल आहे. त्याच्यासाठी पुन्हा बघणार हा पिक्चर..
तो गाड्यांची नावे मराठीत घेतो तो सीन वा बाँब डिफ्युज करताना लावलेले पाल्हाळ एकूणच त्याने पकडलेले बेअरींगही मजेशीर आहे.
लास्ट सीनला समजते की याचा पुढचा भाग येणार आहे जिथे आता हे लोकं दुबईला जाणार आहेत व्हिलनच्या मागे.. तेव्हा रणवीरसिंगला जास्त फूटेज असले तर बरे होईल
सुर्यवन्शी फुकटात नेफ्लि वर
सुर्यवन्शी फुकटात नेफ्लि वर असून बघण्याची ईच्छा होत नाहिये. + १००००००
जावेद जाफ्रीच्या कॅरेक्टरला
जावेद जाफ्रीच्या कॅरेक्टरला तसा काहीतरी रिकरिंग विनोद दिला >> अरे तो विनोद त्याने अक्कीलाच दिला होता की नावं विसरण्याची सवय
जॅकी श्रॉफ च्या मागे आता सगळे जातील तेव्हा मजा येईल. जॅकी आणि गुल्लु अजुनही भारी वाटतात.
तो अरूणोदय सिंग मला अन्नाते मध्ये पण आवडला नव्हता यात पण आवडला नाही. त्यात पण जगपती बाबूच रजनीच्या तोडीचा व्हिलन वाटतो.
सूर्यवंशी एक रोशे पिक्चर
सूर्यवंशी एक रोशे पिक्चर म्हणून पाहिला तर टाईमपास वाटला. हा पीतातला सिनेमा आहे. भंकस करत बघण्याच्या लायकीचा. अक्षय कुमारला जावेद जाफरीची नावे विसरायची सवय देऊन मग त्या एक्स्ट्रा च्या तोंडात तेच घालणे जमवलय. जॅकी आणि गुल्लु कंट्रोल मधे अहेत म्हणून भारी वाटतात. खरी धमाल मात्र क्लायमॅक्स मधे रणवीर नि अजय आल्यावर येते. एकदम हिंदी अॅव्हेंजर झालय तिथे. त्यांच्या एंट्रीवर मारलेला रणवीर चा डायलॉग जमलाय. सिंघम ३ ची अॅड सही घुसडली आहे, अमिताभच्या नंतरच्या गंगा जमना, कुली टाईप्स सिनेमांसारखाच भंकस पण डोके बाजूक्ला ठेवून सुरू ठेवला तर टाईमपास वाटणार्या सिनेमा सारखाच वाटला.
खरी धमाल मात्र क्लायमॅक्स मधे
खरी धमाल मात्र क्लायमॅक्स मधे रणवीर नि अजय आल्यावर येते. >>> +७८६ या पिढीतल्यांचा शाहरूख खान आहे तो.
काल हंगामा - २ पाहिला.
सुरुवातीला का बघतोय कश्याला बघतोय बघायलाच हवे का वगैरे काही कळतच नव्हते.
म्हणजे ते आशुतोष राणा, हेराफेरीवाला बाबुराव कोण तो हां परेश रावल, जॉनी लीव्हर, गेला बाजार राजपाल यादव सारेच वय आणि फॉर्म उलटून गेलेले कलाकार भडक लाऊड आणि ओढूनताणून विनोद करायची ओवरअॅक्टींग करत होते. प्रियदर्शनचे प्रसंगातून खुलवलेले विनोद कुठेही दिसत नव्हते वा फसत होते. त्यात हिरो नवीन आणि सोबतीला त्याची मैत्रीण शिल्पा शेट्टी. यांनाही सहन करावे लागणार असे वाटलेले. पण पिक्चर संपता संपता तेच बरे वाटले.
फर्स्ट हाफला तग धरून पाहिला पण त्या मानाने सेकंड हाफ सुसह्य आणि बरा वाटला. अर्थात बायकोही सोबत बघत असल्याने बघत राहिलो अन्यथा वैतागून अर्ध्या तासात थांबवला असता. पण नंतर जरा ट्रॅकवर आला पिक्चर तर वेळ अगदीच काही फुकट गेला असे वाटले नाही. जर वेळ फुकट जाणार असेल आणि ईतर काही करायला नसेल तर बघू शकता..
फर्स्ट हाफला >> सेकंड हाफ >>
फर्स्ट हाफला >> सेकंड हाफ >> काय!!! तुझा आयडी हॅक झालाय नक्की!
हाल्फ हवे होते ना
हाल्फ हवे होते ना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मौजमजेच्या मूडवर निघतात असले शब्द बाहेर..
असो शुभरात्री.. ईथे मध्यरात्रीचा दुसरा हाल्फ उजाडला
कतरीनाचे सौंदर्य वेगळेच आहे.
कतरीनाचे सौंदर्य वेगळेच आहे. >>> असं तुला आणि काही बाकी फॅन्स ना वाटतअसावं, आम्हाला ही असंच का म्हणुन वाटायला हवं? आम्हा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काहींना ती आता बोटॉक्स करून चेहरा सुजवलेली वाटते..आधी मस्त दिसायची अॅक्टिंग ला बोंब मात्र पहिल्या पासून आता ही कायम आहे
ट्रॅकवर आला पिक्चर तर वेळ
ट्रॅकवर आला पिक्चर तर वेळ अगदीच काही फुकट गेला असे वाटले नाही. जर वेळ फुकट जाणार असेल आणि ईतर काही करायला नसेल तर बघू शकता >>>>> थोडक्यात हा चित्रपट दर्जेदार असू शकतो.
Hungama 2 - तद्दन फालतू.
Hungama 2 - तद्दन फालतू. ओढून ताणून विनोद म्हणणे पण अतिशयोक्ति.
असं तुला आणि काही बाकी फॅन्स
असं तुला आणि काही बाकी फॅन्स ना वाटतअसावं, आम्हाला ही असंच का म्हणुन वाटायला हवं?
>>>
नाही हो, तुम्हाला वाटायला हवेच असे गरजेचे नाही. प्रत्येकाचे आपले मत असू शकते. आणि तुम्ही कर्रेक्टही असाल. पण बहुतांश लोकांना कतरीना कालही आजही केव्हाही सुंदरच वाटते. त्यामुळे कतरीना सुंदर न वाटणार्या थोड्या लोकांचा विचार करण्यापेक्षा ज्या जास्त लोकांना सुंदर वाटते त्यांना लक्षात घेत तिला सिनेमात घेतले जाते. भले कतरीना सुंदर वाटणारेही चुकीचे असतील. पण हा व्यवसाय आहे. जो बिकता है वही टिकता है. माधुरी दिक्षित सुद्धा निव्वळ अभिनयाचा निकष लावता ठिकठाक अभिनेत्रीच होती. पण सौंदर्याच्या जीवावर कुठे पोहोचली पाहतो ना आपण. हिरो-हिरोईन म्हटले की सौंदर्याला खूप किंमत आहे आपल्याकडे. कमालीचा उत्तम अभिनय असेल पण दिसायला जेमतेम असेल तर त्या व्यक्तीला हिरो हिरोईन म्हणून नाही स्विकारले जात. हे फॅक्ट आहे. योग्य वा अयोग्य ते नको ठरवूया तुर्तास...
माधुरी दिक्षित सुद्धा निव्वळ
माधुरी दिक्षित सुद्धा निव्वळ अभिनयाचा निकष लावता ठिकठाक अभिनेत्रीच होती. >> निषेध निषेध निषेध !!! आपल्याला कत्रिना आवडते म्हणून उगीच कारण नसताना माधुरीला नावं ठेवू नयेत.
माधुरी दिक्षित सुद्धा निव्वळ
माधुरी दिक्षित सुद्धा निव्वळ अभिनयाचा निकष लावता ठिकठाक अभिनेत्रीच होती >>> आँ????? माधुरीचे पिक्चर पाहिलेच नाहीत की काय? अंजाम, देवदास वगैरे कधीतरी शाहरूख करता न पाहता माधुरीसाठी पाहून बघ. मृत्युदंड पहा. गेलाबाजार जमाईराजा पिक्चरची नुसती गाणी पाहिलीस तरी एक्सप्रेशन्सची लयलूट दिसेल.
गागुचका
गागुचका
धनी,रमड तुम्ही कितिही उरस्फोड
धनी,रमड तुम्ही कितिही उरस्फोड केली तरी त्याला पटणार आहे का? हे मला वाटत्,ते तुम्हाला वाटत,चला अजुन डिस्कस करायला एक नविन धागा काढुयात म्हंणुन नविन घागा काढेल लगेच, त्याच्या कुठल्याही आर्ग्युमेन्टला इग्नोर करुन ओलाडुन पुढे जायच हेच सोल्युशन मला तरी सापडलेले आहे त्याच्या अशा स्वभावामुळे अनेकदा त्याने क्वचित काही चान्गल लिहल असेल तरी त्यावरही काही प्रतिक्रिया द्याविशी वाटत नाही.
धनि, अशा वेळी पुलं चे म्यु.
धनि, अशा वेळी पुलं चे म्यु. मधे उंदीर मारायच्या विभागात काम करणार्याचे अणुयुद्ध टाळण्याचे कोट आठवायचे रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असामी
असामी![smiley2.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/smiley2.gif)
असाम्या
असाम्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्राजक्ता:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असामी
असामी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सूर्यवंशी मध्ये अजय च्या
सूर्यवंशी मध्ये अजय च्या एन्ट्री वर "देव गन लेके आया" असा अफाट जोक आहे
Pages