चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसा एक मसाला सस्पेन्स मूव्ही (नेटफ्लिक्स) म्हणजे रसेल क्रो आणि बेन अ‍ॅफलेक चा स्टेट ऑफ प्ले. नोटबूक मधली Rachel McAdams पण आहे.

अवांतरः कुठेतरी वाचलं की आधी त्यात ब्रॅड पिट होता, मग त्याच्या ऐवजी रसेल क्रो आला. दोन्ही पर्याय जबरदस्त होते. मला बॉलिवूड आठवलं. पहिला चॉईस जॉन अब्राहम होता, तो जाऊन रितेश देशमुख आला वगैरे. Happy

नेटफ्लिक्सवर 'गांधी' आलेला आहे. (किंवा मला काल दिसला)
फार पूर्वी बघितलेला. काल चालू केला. काय अफलातुन चित्रपट केलाय!
अक्कलेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहुन गेल्याने/ सद्य परिस्थितीमुळे मला खूपच जास्त भावला. एक-एक संवाद आणि प्रसंग किती विचारपूर्वक निवडले आहेत.

वॉव
गांधी आहे का नेटफ्लिक्स वर?भारतात आहे का बघते.
केव्हाही बघावा असा सुंदर पिक्चर.

आत्ता बघितलं तर गांधी चित्रपट (बेन किंगलेचा) यू ट्यूब वर आहे>>>+१ हिंदीतून आहे.
लहानपणी दर गांधी जयंतीला दूरदर्शनवर लागायचा. पण काही कळला नव्हता. रोहीणी हट्टंगडीच्या मुलाखतीत ती या चित्रपटाबद्दल भरभरून बोलली होती. तेव्हापासून बघायचा होता.

गांधी दोन आठवड्यापूर्वीच पाहिला - ओल्ड फॅशन्ड वे - लायब्ररीतून डीव्हीडी आणून. मुलांना दाखवायचा होता आणि मुलांना प्रचंड आवडला. नंतरही दोन-तीन दिवस ते त्या मूव्हीबद्दल बोलत होते. ज्या कलाकृतीचा असा हँगओव्हर रहातो ती कलाकृती आपल्यापुरती बेस्ट असते अशी माझी साधी सोपी व्याख्या आहे आणि त्यात 'गांधी' चपखल बसला. (ह्या आधी शिंडलर्स लिस्ट आणि सिंहासन असेच हँगओव्हर ठेवणारे मूव्हीज होते).

फेफ Happy मी पण 'गांधी' च्या डिव्हिडीसाठी गेले दोन महिने लायब्ररीच्या वेट लिस्टवर होतो. काल अचानक नेफ्लिवर दिसला Happy

The Boy in the Striped Pajamas बघीतल्यावर दोन दिवस झोप आली नव्हती. >> मला बघायचा आहे हा कधीपासून... कुठल्या प्लॅटफॉर्म वर आहे?

HBO max

कोणी Prime वर Nizhal करून सिनेमा पहिला आहे का? "DISCLAIMER "
तेलगू मूवी आहे लीड हिरो ला पाऊस पडताना वाटत असत, ते का? थ्रिलर आहे बऱ्यापैकी पण slow आहे any one seen this movie ?

YouTube वर आहे , निझाल

https://youtu.be/8E8dlOyrYs0

युट्युबर शीणीमाचे नाव घालून explained in hindi टाइप करा

ह्यालो दोसतो , कयसे है आप , आज मई आपको xxxx मुवि की स्टोरी सुनाता हूं , ये मल्ल्याळम भासा की एक मस्त मुवि है .....

राधे वरून आठवलं , ते सीटीमार गाणं किती वाईट आहे. किती किळसवाणे चाळे आणि तोंडं करतायेत दोघेही.
त्या पेक्षा अलु अर्जुन चा डान्स बेस्ट

ह्यालो दोसतो , कयसे है आप , आज मई आपको xxxx मुवि की स्टोरी सुनाता हूं , ये मल्ल्याळम भासा की एक मस्त मुवि है ..>>>>हाहाहाहाहा

राधे... एक नंबर आहे... मस्ट वौच... कोविड चा असला राग येतोय..भाई चा चित्रपट ott वर बघावा लागतोय फॅन्स ना... दुबई वाले लकी आहेत, तिकडे थेटरात रिलीज आहे...

The Vanished (2020) पाहिला. सायकोलॉजिकल, क्राईम थ्रिलर आहे. समहाऊ मला पहिल्या काही मिनिटांतच कळलं काय आहे ते पण तरीही उत्कंठा वाटत राहिली शेवटपर्यंत. काही गोष्टी अतर्क्य वाटतात पण ठीक आहे.

नेटफ्लिक्सवर पाहिला.

राधे बघूच.झी 5 चे आहे बहुधा सबस्क्रिप्शन.आणि जाही जादा चे पैसे लागणार असतील तर नाही बघणार.
हिज क्लायंटस वाईफ पाहिला.त्यातला सस्पेन्स अचाट आहे(हा शब्द कोणत्याही अर्थाने घ्या.)
ज्यांना कौन आणि सायको आवडले होते त्यांना एकदा बघायला चांगला आहे.
त्यातली स्त्री भूमिका चांगली कलाकार आहे.शरीब हाश्मी चांगला आहेच.त्याला अजून चांगले चित्रपट मिळायला हवे.

A Fall from Grace पाहिला . एक बेसिक प्रश्न . म्रुतदेह सापडला नाहि तर खुनाची केस होत नाहि ना? आत्तपर्यन्त पाहिलेल्या सगळ्या सिनेमा आणि मालिकान्मध्ये हेच दाखवलय कि म्रुतदेह नसेल तर केस नाहि बनत.

हिज क्लायंटस वाईफ पाहिला.त्यातला सस्पेन्स अचाट आहे(हा शब्द कोणत्याही अर्थाने घ्या.)
>> अगदी बरोबर अनु... मात्र हिरो आणि हिरविन ने जबर अभिनय केला आहे.. स्पेशली हिरोईन...

मी Netflix वर The Zookeeper's Wife पाहिला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींपासून वाचवण्यासाठी जवळ-जवळ ३०० ज्यू लोकांना एका दांपत्याने घरात लपवून ठेवले होते. त्यांना लपवून घरात आणणे, संधी मिळेल तेव्हा खोटी कागदपत्रे बनवून, वेश बदलून त्यांना शहराबाहेर पाठवणे हे त्यांनी काही वर्षे अगदी शेवटपर्यंत केले. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

Pages