मुखवटा

Submitted by Snehalata on 14 May, 2020 - 02:52

मुखवटा

उठ, उभा रहा
पडलास, हरकत नाही
लागलं, हरकत नाही
पण मागे राहू नको-

वाट खाचखळग्यांची आहे
हे तुलाही माहित आहे
अनेक मार्गांचं जाळं
तुझ्यापुढे आहे

निवड, हिमतीने पुढे जा
चुकलास, हरकत नाही
चढणीवरून परत
पायथ्याशीच आलास, हरकत नाही
पण थांबू नको
कारण थांबल्यास कि संपलास

कधी खचून जाऊ नको
कधी निराश होऊ नको
वादळ हे येणारच
त्याला झेलण्यास तयार हो
अडचणी येणारच
त्यांच्याशी दोन हात कर

हे जग जिंकणाऱ्यांचे आहे
हरणाऱ्यांना इथे वाव नाही
डोक्याने चालण्यारांचा
जयजयकार होतो
भावनाशीलतेचे हे गाव नाही

तुला जगायचे आहे ना?
मग याच्याशी मिळवून घे
याच्याप्रमाणे पाउल टाक

तुझं मन दुखावलं, हरकत नाही
तुला नाही पटलं, हरकत नाही
पण भावनांचं प्रदर्शन मांडू नको
अश्रूंना वाहू देऊ नको
ते तुझ्या कमकुवतपणाचे
लक्षण मानले जाईल

बंद खोलीत वाटेल तेव्हडं रड
पण जगाच्या घोळक्यात
मात्र हसतमुख वावर
----अखेर जगात माणसापेक्षा
मुखवट्यांचाच आहे जास्त वावर.........

स्नेहलता

Group content visibility: 
Use group defaults