समज

Submitted by Snehalata on 13 May, 2020 - 02:12

समज

कसं बोलायचं कसं वागायचं
कधी कधी समजत नाही
प्रत्येक ओळखीला नात्यामध्ये
कसं तोलायचं समजत नाही

कोण काय बोलतं
हे फक्त कळतं
त्या बोलण्याचा अर्थ मात्र
कधी कधी समजत नाही

कधीतरी कोणीतरी आयुष्यात
खूप काहीतरी देऊन जातं
पण देण्याच्या बदल्यात ते काय घेतं
हेच मुळी समजत नाही

जवळची एखादी व्यक्ती
दिलखुलासपणे बोलतं नाही
पण ती नेमकी काय लपवते
हेही कधी कधी समजत नाही

दुसऱ्याची लागते गरज
अनोळखीपने होते सवय
सवय एकटेपणाची का होत नाही?
हे मात्र कधीकधीच समजत नाही

स्नेहलता

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद
मायबोली वरचे लिखाण मी गेली ५ ते ६ वर्षे वाचते आहे पण लिहिण्याची हिम्मत कधी केली नाही.
प्रथमच मी लिखाण टाकले आहे, चुका असतील तर sorry .

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.