मातृदिनाच्या निमित्ताने - आईला देव बनवणे सोडायची गरज आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 May, 2020 - 04:15

जुना किस्सा आहे. दिवाळीच्या वेळचा. दोन जवळच्या मैत्रीणी. दोन्ही बहिणी. एक विवाहीत एक अविवाहीत. गेल्या पिढीपासून आमचे फॅमिली रिलेशन्स आहेत. घरी कधीतरी जाणे होते. असो मुद्द्यावर येतो.

त्यांच्या आईने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कमावती बाई पण मागील पिढीतील टिपिकल संस्कारी आई. साडीतच राहणे वगैरे.

स्वेच्छानिवृत्तीनंतर मात्र स्वेच्छेनेच ड्रेसेस घालायला सुरुवात केली. व्हॉटसपवर मैत्रीणींचा ग्रूप बनवून फिरायलाही जाते. आम्हीही मजेत चिडवतो काकू मॉडर्न झाल्या. तिच्या दोन मुलींनाही मॉडर्न आईचे कौतुक वाटते.

आणि मग काकूंनी दिवाळीत स्वत:साठी बिनबाह्याचा स्लीव्हलेस, टाईट फिटींग वगैरे तरुणींना शोभेल असा ड्रेस घेतला.
कौतुक ओसरले आणि वादाची ठिणगी पडली. दोन्ही मुलींनी आक्षेप घेतला.

विवाहीत मुलीने तरी "मोठ्या मनाने" कधीतरी एकदा घाल आणि हौस पुरव अशी परवानगी दिली.
छोट्या बहिणीचे मत पडले ताई तुला काय जातेय बोलायला. मला तिच्यासोबत कॉलनीत राहायचे आहे. कसं वाटते ते. चार लोकं बघतील. बोलतील. ब्लाह ब्लाह ब्लाह....

त्यांची चर्चा चालू होती आणि मी फराळ करत होतो. बहुधा मी सुद्धा त्यांच्या हो ला हो मिळवत काकूंना दोन उपदेशाचे बोल सुनवावेत अशी अपेक्षा होती.

पण मी म्हणालो त्यांची लाईफ त्यांची चॉईस. तुम्ही सुद्धा किती मॉडर्न ड्रेस घालता..
अरे हो, त्या दोघी बहिणी बरेचदा गुडघ्याच्या चार बोटे वर स्कर्ट घालतात.

मग त्यांनी मुद्दा बदलायचा प्रयत्न केला. अरे पण तिला शोभायला नको का?

मी मनातल्या मनात म्हटले, तुम्हाला शोभते हे तुमचे तुम्हीच ठरवले कि तिला विचारायला गेलात. आता तिला काय शोभतेय ते त्यांचे त्यांना ठरवू द्या की ....

पण उघड काही बोललो नाही. दिवाळीला वाद नव्हता घालायचा. म्हणून दोन चकल्या उचलल्या आणि निघालो तिथून.

जाताना मात्र एक विचार मनात आला - आईने मॉडर्न कपडे घातले तर त्याची मुलांना लाज का वाटावी?
कदाचित मातृदेवो भव: म्हणताना आपण एक प्रकारचे दैवत्व जपण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकली आहे जी तिची स्वत:ची आवडनिवड स्वत:ची हौसमौज मारून टाकतेय.....

आई सोबत मातृदिनी सेल्फी काढून सोशल साईटवर अपलोड करण्यापासून, आईला स्वयंपाकात मदत करणे, तिचे पाय चेपणे, तिचा वाढदिवस साजरा करणे, तिची म्हातारपणी काळजी घेणे वगैरे सारे काही आपण तिच्या कधी न संपणरया ऋणाची परतफेड वगैरे म्हणून करत असू...

पण एवढे सारे करून जर आपण तिला तिच्या मनाप्रमाणे जगू देत नसू तर काही अर्थ नाही.

या मातृदिनी हा विचारही नक्की करूया
धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई पण टीपिकल संस्कारी होती.. मी मोठी झाल्यावर तिचा पूर्ण मेकोव्हर करून टाकला. तिनेही मग वयाच्या चोपन्नाव्या वर्षी फॅशन डिझायनिंग चा कोर्स पूर्ण केला. आता ती माझ्या पेक्षा मॉडर्न राहते. आणि दिसते पण छान. सुरुवातीला सोसायटी मधल्या सगळ्या बायकांनी नावे ठेवली पण मला माझ्या आईच्या आयुष्यातली सगळी राहिलेली हौस पूर्ण करायची होती. आता त्या नावे ठेवणाऱ्या सगळ्या बायकांनी आईपासून प्रेरणा घेऊन स्वतःला पूर्ण बदलून टाकले आहे आणि तिचा पूर्वीपेक्षा जास्त आदर करायला लागल्या आहेत हे वेगळंच Happy

आणि तिचा पूर्वीपेक्षा जास्त आदर करायला लागल्या आहेत हे वेगळंच
>>>
हे छान झाले

आणि असे नाही झाले. लोकं नावच ठेवत राहिले तरी आपण आपल्या भुमिकेवर ठाम राहायला हवे.
कारण लोकं नुसते प्रवाहासोबत वाहत असतात...

आईला देव म्हणता म्हणता, आपण कधी आईला देव बनवून ठेवतो का?
हा देव देव्हाऱ्यात नसतो, असतो कधी भांड्यांच्या गराड्यात, तर कधी भाज्यांच्या पसाऱ्यात...
या देवाला नैवेद्य मिळतो, तर सगळ्यात शेवटी. उरलेला...
ह्या देवाची गॅरंटी असते, प्रसन्न होईलच याची...
देवाला न केलेल्या कामाचा प्रसाद, आणि या देवाने केलेल्या कामाची किंमतच नाही.
देवाला कधी बोल लावता येत नाही, देव शाप देईल ना? देव हक्काचा, कितीही दुखावलं तरी शाप देत नाही.
आयुष्यात कधी देव भेटेल की नाही, माहीत नाही. पण देवापेक्षाही काहीतरी महत्वाचं भेटलंय हे नक्की! Happy
फक्त या देवाचं देवत्व जपायला बळ दे, हीच देवाकडे प्रार्थना!

छान धागा अभिषेक... प्रतिसाद वाचण्यासाठी येत राहील. Happy

नौटंकी मस्त प्रतिसाद!!! आवडला...
(यावर छान कथा होऊ शकते. Happy

नौटंकी मस्त प्रतिसाद!!! आवडला...
(यावर छान कथा होऊ शकते. Happy. >>> धन्यवाद अज्ञातवासी
Happy

आणि तिचा पूर्वीपेक्षा जास्त आदर करायला लागल्या आहेत हे वेगळंच
>>>
हे छान झाले >>>>>> धन्यवाद ऋन्मेष Happy

माझी मुलगी मला मेक अप करते. मला लिप्स्टीकची शेड सुचवते, माझे फोटो काढते - हे सर्व आपण होउन Happy
बाकी मी (न शोभणारा) स्लीव्हलेस ड्रेस घातला, तर तिने तिचे मत द्यावेच द्यावे कारण तेही महत्वाचे आहेच. तिला वाटणारच ना शोभा होउ नये आईची.
.
तेव्हा माझे मत त्या मुली बोलल्या काहीही असतील, त्यांना आईचीच काळजी असेल.

तुम्ही काहीही करा... "कॅरी" करता आलं पाहिजे.
"शोभा" तेव्हा होते जेव्हा आपण एखादा ट्रेण्ड किंवा एखादी फॅशन डोळे झाकून फॉलो करतो. हा झाला कपड्यांचा विषय.
बाकी ऋन्मेश शी सहमत!!!

बिनबाह्याचा स्लीव्हलेस <<<
>>>
बेफि तो धाग्यासाठी महत्वाचा शब्द होता. सर्वांना समजावा म्हणून दोन भाषेत लिहीला Happy

सामो, बोलण्याच्या टोनवरून समजत होते की तो ड्रेस आईला शोभत नव्हता की आईने तो ड्रेस घालणे शोभत नव्हते.

एक फालतू प्रॉब्लेम डिस्कस करण्याकरिता तद्दन काल्पनिक भंकस कथा हकीगत आहे असे दाखवित लेख पाडणे कधी बंद करणार?

फालतू प्रॉब्लेम Happy

लोकं थप्पड सारख्या फालतू प्रॉब्लेम वर पिक्चर काढतात. मग मी एखाद्या फालतू प्रॉब्लेमवर धागाही जरूर काढू शकतो.

या पोस्टसाठी खरेच धन्यवाद सर. कारण हा धागा गरजेचा होता हे आपल्या पोस्टमुळे पक्के झाले Happy

हल्ली मायबोलीवर काय लिहलंय पेक्षा कोणी लिहिलंय यालाच जास्त महत्व आलेले आहे. असो.

यस.. ऋन्मेषशी १००% सहमत. आई म्हणून तिच्यावर जबरदस्तीने देवपण लादायचे.. तिच्या त्यागाचं उदात्तीकरण करून तिला मखरात ठेवून तिला स्वत:चाही विसर पडावा अशी अपेक्षा तिच्याकडून करायची.

काल-परवा मदर्स डे झाला. 90% लोकांच्या वॉलवर "जेव्हा घरात 4 सफरचंद असतात आणि 5 माणसं.. तेव्हा मला भूक नाही असं सांगते ती आई". WTF.. का बरं? या आईला चारही सफरचंदाचे तुकडे करून किंवा ज्यूस करून समान वाटा घेता येणार नाही का? कश्याला उगाच मखरात बसवून तिला स्वतःला माणूस म्हणून स्वतःच्या बेसिक आवडीनिवडी, तहान-भूक-शी-शू-आराम-झोपेची गरज वगैरे नाहीच्चेत असं धरून चालायचं?

हा मदर्स डे आणि मखरात बसवणे मुलांच्या रिलेटेड सगळ्या जबाबदाऱ्या आणि मनाला मुरड घालणे फक्त बायकांच्याच पदरात घालणार असाल तर नको आम्हाला तुमचे मखर. त्यापेक्षा ज्या ज्या जबाबदाऱ्या वाटून घेणे शक्य आहे तिथे तिथे त्या आईला मदतीचा हात द्या. आई म्हणून तिला कोणी जज करत असेल तर तिथल्या तिथे तिची बाजू घ्या. तिचे मनोधैर्य खच्ची करत असेल तर तिला "ती तिला शक्य ते सगळं उत्तम करतेय" एवढा धीर द्या. तरी उपकार होतील आई आणि बाईजातीवर.

हे असं बोलणे हे पुर्वी ह्याच आईने केलेले "संस्कार" होते ना!!! की कॉलनीत कसं दिसेल? लोक काय म्हणतील? आम्हाला तुमच्या बरोबर रहायचं आहे, लोण्याचा गोळा आणि आग.... इ. इ. इ.
आता भोगा आपल्या कर्माची फळं. मुलींना धड शिकवलं नाही आणि बोटचेपे संस्कार केले. त्या माऊलीला तिच्या साठीत अक्कल स्वभान ... काय म्हणायचं ते आलं. आता मुली झाल्या साठीच्या की त्यांना समजेत. तो पर्यंत त्यांच्या मुलींना त्यांनी पडद्यामागे रहायला शिकवलं असेलच!

पियु छान प्रतिसाद आणि धन्यवाद.

अमितव तुम्ही म्हणता ते तितकेसे पटत नाही. म्हणजे अगदी या केसमध्येही मुली शॉर्ट स्कर्ट घालणारया होत्या. त्यामुळे आईने त्यांना बंधनात ठेवलेय असे वाटत नाही. किंबहुना मुलींना अश्या बंधनात आई ठेवते की वडिल हा वेगळा विषय होईल. पण पुर्वीच्यापेक्षा मुलींना घरून स्वातंत्र्य मिळायचे प्रमाण नक्कीच वाढलेय. पण त्याच मुली ते स्वातंत्र्य आईला देत नाहीयेत. कारण आईला तिचे आई शब्दासोबत जोडले गेलेले पावित्र्य जपायचे आहे.
कदाचित उद्या त्या मुली आईच्या भुमिकेत गेल्यावर स्वेच्छेने हे पावित्र्य जपतील, वा समाजाच्या भितीने आणि मुलांचा विचार करून मन मारून जपतील. किंवा मग बंड करावेसे वाटेल, आणि आपल्या आईची त्यावेळची मनस्थिती समजेल.

आणि ईथे मी लिहिलेल्या किस्स्यात मुलीच्या जागी मुले टाकले तरी कदाचित त्यांची विचारसरणी अशीच असती. ज्यांच्यावर कधी आईने बंधने लादली नसतील...

ऋन्मेऽऽष तुम्ही लिहिलेलं लंगडं समर्थन झालं. ह्या मुली सज्ञान आहेत ना?
मग त्यांना ठणकावुन सांगायची त्या आईची हिम्मत का झाली नाही? (नसावीच झालेली, अन्यथा तुम्ही तो मालमसाला वगळता ना!) सो आईने गप्पपणे ऐकुन घ्यायचे हीच शिकवण त्या घरातील मुलामुलींना त्या घरातील आईने ही दिलेली आहे.
आणि मला वाटत होतं थप्पड बीबी तुम्ही काढलेला आणि तुम्हाला तो चित्रपट ही आवडलेला. असो.

आईला ठणकाऊन सांगता आले नाही म्हणजे आईचीच ती शिकवण होती? हे काहीच समजले नाही..
थप्पड कनेक्शनही यात कुठे आले ते ही नाही समजले...

सो आईने गप्पपणे ऐकुन घ्यायचे हीच शिकवण त्या घरातील मुलामुलींना त्या घरातील आईने ही दिलेली आहे.

>> हे अमितव यांचे म्हणणे पटले. आमच्या आईला असे काही ऐकवले असते तर अंगावरचे कपडे चिंध्या होईपर्यंत अपमान केला गेला असता.

स्त्रियांच्या सबलीकरणासाठी एक पिढी खर्च झाली
परंतु
अशा
सबला स्त्रियांबरोबर वागावे कसे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही ही खरी शोकांतिका आहे.

A whole generation worked to empower women
But
Forgot to teach men how to live with empowered women.

ह्याचा मातृदिनाच्या अन देवतेचा काय संबंध? त्या मातोश्रींना त्यांच्या लेकींना गप बस सांगायची ताकद का नव्हती!!

मातोश्रींना त्यांच्या लेकींना गप बस सांगायची ताकद का नव्हती!!
>>>>

सांगितलेही असेन. मला माहीत नाही.
मी फक्त मुलींची तणतण ऐकून आलो. तेव्हा त्या तिथे उपस्थित नव्हत्या.

आईचा मॉडर्न ड्रेस पाहता मुलींनी घेतलेले ऑब्जेक्शन हा मुद्दा आहे
आई त्यांच्या ऑब्जेक्शनवर कशी रिॲक्ट झाली मुळात हा मुद्दाच नाहीये ईथे.

Pages